पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी कुंडा । आंतु ज्ञानामि धेडफुडा । साम्य तेचि सुहाडा | वेदिका जाणें ||२१|| सविवेकमतिपाटव । तेचि मंत्रविद्यागौरव । शांति स्रुक्स्रुव । जीवु यज्वा ॥ ४२ ॥ तो प्रतीतीचेनि पात्रं । विवेकमहामंत्र | ज्ञानाग्निहोत्रें | भेद नाशी ॥ ४३ ॥ तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हैं ठाये । आत्मसमरसीं न्हाये | अवभृथीं जेव्हां ॥ ४४ ॥ तेव्हां भूतें विषय करणें । हें वेगळालें कांहीं न म्हणे । आघवें एकचि ऐसें जाणे | आत्मबुद्धि ||१५|| जैसा चेहला तो अर्जुना । म्हणे स्वींची हे विचित्र सेना । मीचि जाहालों होतों ना । निद्रावशें ॥ ४६ ॥ आतां सेना ते सेना नव्हे । हैं मीच एक आघवें । ऐसें एकत्वें मानवे । विश्व तया ॥ ४७ ॥ मग तो जीव हे भाप सरे । आत्रह्म परमात्मबोधें भरे । ऐसे भजती ज्ञानाध्वरें । एकत्वें येणें ॥ ४८ ॥ अथवा अनादि हें अनेक । जें आनासारिखें एका एक । आणि नामरूपादिक । तेंही विपम ॥४९॥ म्हणोनि विश्व भिन्न भिन्न । परि न भेदे तयाचें ज्ञान । जैसे अवयव तरी आन आन । परि एकेचि देहींचे ॥ २५० ॥ कां शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचि तरुवरा । बहु रश्मि परि दिनकरा | एकाचे जेवीं ॥५१॥ झाला, आणि बुद्धि यांच्या कुंडांत ज्ञानाग्नि धडधड भडकतो; आणि साम्यभावना हीच, सख्या अर्जुना, या ज्ञानयज्ञांतील वेदी समजावी. ४१ विवेकबुद्धीची कुशलता हीच मंत्रविद्येची शक्ति, शांति हीच यज्ञपात्रें आणि जीव हा यज्ञकर्ता यजमान जाणावा. ४२ हा यजमान जीव ब्रह्मानुभवाच्या भांड्यांतून, विवेकरूपी महामंत्राचा घोष करीत, ज्ञानाग्निहोमांत द्वैताची आहुति देतो. ४३ मग अज्ञानाचा नाश म्हणजे यज्ञकर्ता व यज्ञविधि हें सर्वत्र संपते. आणि जेव्हां आत्मैक्याच्या जलांत यज्ञसमाप्तीचें अवभृथ स्नान जीव करतो, ४४ तेव्हां भूतें, विषय, व इंद्रियें, यांचा निरनिराळेपणा भासमान होत नाहीं; आत्मैकबुद्धि पूर्णपणे विंबल्यामुळे सर्व एक ब्रह्मरूपच होऊन जाते. ४५ अर्जुना, जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो, कीं, 'झोपंत गुंगल्यामुळे स्वप्नांतील अद्भुत सैन्य मीच झालों होतों. ४६ आतां मी जागा झालों आहें. तें स्वप्नांतलें सैन्य निव्वळ भ्रमजात होतें. आतां मीच हे सर्व आहे.' याप्रमाणेंच त्या ज्ञानयज्ञकर्त्याला समस्त विश्व एक अभिन्न ब्रह्मरूपच आहे, हें तत्त्व पटतं. ४७ मग त्याचा जीवभावच नष्ट होतो. परमात्मबोधानें ओतप्रोत भरून तो ब्रह्मत्वाला पांचतो. अशा रीतीनें या एकभावानें ज्ञानयज्ञानं मला भजतात. ४८ अथवा दुसरे कोणी भक्त विश्व हें अनादि आहे असें गृहीत धरतात; आणि या विश्वांत एकासारखें दुसरें असतें, परंतु नामरूपादिकांनी भिन्न भिन्न वाटतें, ४९ आणि या कारणास्तव विश्वांत भेदभाव भासमान होतो, तरीपण या भेदभावानें त्यांच्या ज्ञानांत भेद होत नाहीं. जरी अवयव निरनिराळे असले, तरी ते जसे एकाच देहाचे असतात, २५० अथवा लहान मोठ्या फांद्या झाल्या तरी त्या जशा एकाच झाडाच्या असतात, किंवा असंख्य किरण खरे पण ते जसे सारे एकाच सूर्याचे, ५१ १ धडकणारा. २ यज्ञपात्रें.