पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २७५ हा अनवसरु सर्वथा । परि बोलवित से आस्था । तुझी मातें ॥ ३२ ॥ तंव अर्जुन म्हणे हें काइ | चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं । जगचि निवविजे हा तयाच्या ठायीं । स्वभावो कीं जी ||३३|| येरें चकोरें तिये आपुलिये चाडे । चांचू करिती चंद्राकडे । तेविं आम्ही विनवं तें थोकडें । देवो कृपासिंधु ॥ ३४॥ जी मेघु आपुलिये प्रौढी | जगाची आतिं दवडी । वांचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षाव पाहुनी ॥ ३५ ॥ परि चुळा एकाचिया चाडे । जेविं गंगेतेंचि ठाकणें पडे । तैविं आर्त बहु कां थोडें । तरि सांगावें देवें ॥३६॥ तेथें देवें म्हणितलें राहें । जो संतोष आम्हां जाहला आहे । तयावरी स्तुति साहे । ऐसें उरलें नाहीं ॥ ३७ || पें परिसतु आहासि निकियापरी । तेंचि वक्तृत्वा वन्हाडीक करी । ऐसें पुरस्करोनि श्रीहरी । आदरिलें बोलीं ॥ ३८ ॥ ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते । एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥ १५ ॥ सम० - वृत्तिहो मेंचि ऐक्येंची कीं ध्याती विश्वतोमुखा । पृथक्वें ऐक्यजिज्ञासु बहुधा देवयाजक ॥ १५ ॥ आर्या-कोणी उपासिती ते ज्ञानमखानें सदा मला यजुनी । एकस्वें पृथकत्वें बहुधा मज विश्वतोमुखा भजुनी ॥ १५ ॥ ओवी — कितीएक ज्ञानयज्ञकरून । माझी उपासना करिती जाण । पृथक्त्वें एक जाणून । मी असें विश्वतोमुखीं ॥१५॥ तरी ज्ञानयज्ञ एवंरूपु | तेथ आदिसंकल्प हा ग्रुपु । महाभूतें मंडपु । भेदु तो पशु ॥ ३९ ॥ मग पांचांचे जे विशेष गुण । अथवा इंद्रियें आणि प्राण । हेचि यज्ञोपचारभरण | अज्ञान घृत ॥ २४० ॥ तेथ मनबुद्धीचिया तुझ्याबद्दल जो स्नेहादर माझ्या अंतःकरणांत वसत आहे, तो मला बोलावयास लावीत आहे." ३२ हैं ऐकून अर्जुन म्हणाला, “महाराज, असें कसें ? चकोर नसेल, तर चांदणेच पडत नाहीं कीं काय ? अहो, जगाचा ताप निववावा हा तर चांदण्याचा सहज स्वभावच नाहीं का ? ३३ ते चकोरपक्षी आपल्या आवडीनें चंद्राकडे चोंच उघडून वळवतात, तसे आम्हीही तुमच्याजवळ अल्पशी विनंति करतों; पण आपण तर महाराज, प्रत्यक्ष कृपेचे सागरच आहां. ३४ अहो, मेघ आपल्या सामर्थ्यानें जगाची इच्छा पुरवतो; नाहींतर, त्या मेघाच्या जलवर्षावाशी तुलना केली, तर त्याच्याकरितां टाहो फोडणाऱ्या चातकाची तहान ती किती अल्प ! ३५ परंतु एक चूटभर पाण्याकरितां ज्याप्रमाणें गंगानदीवर जाणें भाग पडते, त्याप्रमाणें आमचे मागणें थोडें असो कीं फार असो, परंतु तुम्हीं महाराजांनीं मात्र सर्व विचार सविस्तर सांगावा. " ३६ हे ऐकून भगवंत म्हणाले, “ आतां हें बोलणें पुरे. आम्हांला एकंदर जो संतोष झाला आहे, त्यावर तुझ्या तोंडची स्तुति सहन करण्याची आतां सोयच राहिली नाहीं. ३७ खरोखरच तूं माझे शब्द खऱ्या भावानें ऐकतोस, हीच गोष्ट माझ्या वक्तृत्वास उत्साहक होत आहे." अशी प्रस्तावना करून श्रीकृष्ण पुढे बोलते झाले. ३८ "आतां ज्ञानयज्ञाची संपादणी कशी होते ? तर, परब्रह्माच्या ठिकाणीं स्फुरण पावणारा 'अहं बहु स्याम् प्रजायेय ' हा मूळ संकल्प यज्ञस्तंभ होय. महाभूतें म्हणजे यज्ञमंडप, आणि द्वैत हाच यज्ञपशु होय. ३९ मग पंचमहाभूतांचे जे विशिष्ट गुण, किंवा इंद्रिये आणि प्राण, हीच या ज्ञानयज्ञांतील उपचारविधानांची सामग्री होय; आणि अज्ञान हें आहुति देण्याचें तूप होय. २४० या ज्ञानयज्ञांत मन १ आदरसत्कार. २ प्रस्तावना करून ३ यज्ञांतील पशु बांधण्याचा खांब.