पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ती | देखिये वस्तु उजू लुंठिती। मीचि म्हणोनि ॥ २२ ॥ आपुलें उत्तमत्व नाठवे | पुढील योग्यायोग्य नेणवे । एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें । नर्मूचि आवडे || २३ || जैसें उंचीं उदक पडिलें । तें तळवटवरी ये उगेलें । तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २४ ॥ कां फळलिया तरूची शाखा । सहजें भूमीस उतरे देखा । तैसें जीवमात्रां अशेखां । खालावती ते ।। २५ ।। अखंड अगर्वता होऊनि असती । तयांची विनय हेचि संपत्ति । जे जयजयमंत्र अर्पिती | माझ्या ठायीं ॥ २६ ॥ नमितां मानापमान गळाले । म्हणोनि अवचितां मीचि जहाले। ऐसे निरंतर मिसळले । उपासिती ॥ २७ ॥ अर्जुना हे गुरुवी भक्ति । सांगितली तुजप्रती । आतां ज्ञानयज्ञे यजिती । ते भक्त आइकें ॥ २८ ॥ परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी | जे मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं ॥ २९ ॥ तंव आथी जी अर्जुन म्हणे । हें दैविकिया प्रसादाचें करणें । तरि काय अमृताचें ओरोगणें । पुरे म्हणवे ॥ २३० ॥ या बोला श्रीअनंतें । लागटा देखिलें तयातें । कीं सुखावलेनि चित्तें। डोलतु असे ॥ ३१ ॥ म्हणे भलें केलें पार्था । एन्हवीं जी जी वस्तु दृष्टीस पडेल, ती ती मनूप म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे असें उमजून तिचा सरळपणें आदर करतात. २२ त्यांना आपल्या श्रेपणाची आठवण नसते, दुसऱ्यांच्या योग्यायोग्यतेची भावना नसते; एकदम सरसकट सर्व व्यक्तींचा नम्रपणें आदर करणें हेंच त्यांस आवडते. २३ जसे उंच जागेवर पडलेले पाणी आपोआप निमूट पुन्हां तळाला येतें, तसें भूतमात्र पाहतांच नम्र व्हावें, हा या भक्तांचा स्वभावच असतो. २४ किंवा फळांचा बहर आलेल्या झाडाची फांदी जशी आपोआप लवते, तसे ते सर्व भूतमात्रापुढें स्वाभाविकपणें नम्र होतात. २५ ते निरंतर गर्वरहित असतात. नम्रपणा त्यांचें सर्व वैभव, आणि हें आपलें सर्व वैभव ते ' जयजय ' मंत्रपूर्वक मला अर्पण करतात. २६ असे ते नेहमींच भूतमात्राला नमन करीत असल्यामुळे त्यांची मानापमानाची भावना लोपलेली असते, म्हणून ते आपोआपच मद्रूप होऊन निरंतर समरसून राहातात व उपासना करतात. २७ अर्जुना, याप्रमाणें तुला खऱ्या थोर भक्तीचा विचार सांगितला. आतां ज्ञानयज्ञानें जे मला उपासतात, त्यांचे विवेचन ऐक. २८ पण, अर्जुना, भजन करण्याचें कौशल्य तुला माहीतच आहे, कारण हा विषय मागें एकदां तुला कथन केला आहे. " २९ असें श्रीकृष्ण बोलले, तों अर्जुन म्हणाला, होय महाराज, आहे. हा सुदैवाचा प्रसाद मजवर एकदां झाला आहे. तरीपण अमृता वाढप पुन्हां पुन्हां झालें, तर त्याला ' पुरे आतां ' असें म्हणवेल काय ? " २३० या बोलावरून श्रीकृष्णांनीं ताडलें, कीं, हा आतां या विषयाला लालचावला आहे आणि ज्ञानसुखानें अंतरंगांत डोलत आहे. ३१ श्रीकृष्ण मग म्हणाले, “वाहवा, अर्जुना, चांगलें बोललास नाहीतर वास्तविक पाहातां या विषयाच्या विवेचनाला हा प्रसंग कांहीं योग्य नव्हता; पण १ वाकप, वाढणे,