पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २७३ विचरती चराचरीं । पांडुकुमरा ॥ ११ ॥ मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना । पंचप्राण मना । पाढीउ घेउनी ॥ १२ ॥ बाहेरी यमनियमांची कटी लाविली | आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली । वरी प्राणायामाचीं मांडिलीं । वाहाती यंत्रे ॥ १३ ॥ तेथ उल्हाटशक्तीचेनि उजिवडें । मनपवनाचेनि सुरवाडें । सतरावियेचें पाणियाडें । वळियाविलें ॥ १४ ॥ तेव्हां प्रत्याहारें ख्याति केली । विकारांची संपिलीं वोहिलीं । इंद्रियें बांधोनि आणिलीं | हृदयातु ॥ १५ ॥ तंव धारणावारू दाटिन्नले । महाभूतांतें एकवटलें । मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें ॥ १६ ॥ तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचें निशाण वाजत । दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥ १७ ॥ पाठीं समाधिश्रियेचा अशेखा । आत्मानुभवराज्यसुखा । पट्टाभिषेको देखा । समरसें जाहला ॥ १८ ॥ ऐसें हें गहन | अर्जुना माझें भजन । आतां ऐकें सांगेन । जे करिती एक ॥ १९ ॥ तरी दोन्ही पालववेरी । जैसा एक तंतु अंबरी । तैसा मीवांचूनि चराचरीं । जाणती ना ॥ २२० ॥ आदि ब्रह्मा करुनी । शेवटी मशक धरुनी । माजीं समस्त हें जाणोनी । स्वरूप माझें ॥ २१ ॥ मग वाड धाकुटें न म्हणती । सजीव निर्जीव करीत चराचरांत संचार करतात. ११ आणखी, बा अर्जुना, ते भक्त अत्यंत काळजीपूर्वक पंचप्राण व मन यांचा पूर्णपणे पाडाव करून त्यांना स्वाधीन राखतात. १२ बाहेरून यमनियमाचे वेढे देऊन, आणि आंत वज्रासनाचा कोट करून ते प्राणायामांच्या तोफांनी मोर्चेबंदी करतात. १३ त्या स्थितींत उसळणाऱ्या कुंडलिनी शक्तीच्या चकचकाटांत, मन व प्राणवायु यांच्या अनुकूलतेनें, सतराव्या कलेचें म्हणजे परिपूर्ण आत्मज्ञानामृताचें तळें कलंडलें जातें. १४ तेव्हां अंतर्मुख इंद्रियांच्या एकाग्रतेची परमावधि होऊन विकारांची भाषा खुंटते, आणि सर्व इंद्रिये खेचून हृदयांत दडपली जातात. १५ इतक्यांत धारणेचें म्हणजे ध्यानाच्या परिपक्क दशेचें घोडदळ दौड करून गर्दी करतें, आणि पंचमहाभूतें एकवटून आकाशांत लय पावतात, आणि संकल्पविकल्पाचें चतुरंग सैन्य नामशेष होतें. १६ मग विजय झाला रे विजय झाला, अशा प्रचंड जयघोषांत ध्यानधारणेचा नगारा गाजूं लागतो आणि ब्रह्मैक्याचें एकछत्र झळकूं लागतें. १७ नंतर संपूर्ण आत्मानुभवाच्या साम्राज्याचा अभिषेक समाधिलक्ष्मीला एकदम होतो. १८ अर्जुना, असें हें माझें भजन फार खोल व गूढ रहस्यात्मक आहे. असें माझें भजन जे भक्त करतात, १९ ते जसा वस्त्रांत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकजात तंतु असतो, तसा मी सर्व चराचरांत ओतप्रोत भरलेला आहे, माझ्यावांचून अन्य असें कांहीं नाहीं, असें जाणतात. २२० ब्रह्मदेव व मशक हीं दोन्ही टोके आणि यांच्या मध्यंतरीं असणारी सर्व भूतसृष्टि, हें सर्व माझेंच स्वरूप आहे, असें ह्यांस ज्ञान झालेलें असतें. २१ मग ते मोठा धाकटा, सजीव निर्जीव, असा भेदभाव करीत नाहीत; तर, १ सर्वथा. २ फार काळजीपूर्वक ३ पाडाव. ४ कांटेरी कुंपण, ५ भिंत. ६ तोफा. ७ ३५ , अनुकूलतेनें. ८ तळें.