पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी दुःखें । अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ २०० ॥ ते पाहांटेवीण पाहावित । अमृतेंवीण जीववित | योगेंवीण दावित | कैवल्य डोळां ॥ १ ॥ परी राया रंका पीड धरूं । नेणती सानेयां थोरां कडंसणी करूं । एकसरें आनंदाचे औवारु । होत जगा ॥ २ ॥ कहीं एकाधेनि बैकुंठा जावें । तें तिंही वैकुंठचि केलें आघवें । ऐसें नामघोप गौरवें । धवळलें विश्व ॥ ३ ॥ तेजें सूर्य तैसे सोज्वळ । परि तोहि अस्तवे हैं किंडाळ | चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा पुरते ॥ ४ ॥ मेघ उदार परी बोसरे। म्हणऊनि उपमेसी न पुरे । हे निःशंकपणें सपांखरे | पंचानन ॥ ५ ॥ जयांचे वाचेपुढां भोजें । नाम नाचत असे माझें । जें जन्मसहस्री वोळगिजे । एकवेळ यावया ॥ ६ ॥ तो मी वैकुंठीं नसें | वेळ एक भानुविंवींही न दिसें । वरी योगियांचीही मानसें । उमरडोनि जाय ॥ ७ ॥ परी तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिवसावा । जेथ नामघोषु वरवा । करिती माझा ॥ ८ ॥ कैसे माझ्या गुणीं धाले । देशकाळातें विसरले । कीर्तनें सुखी झाले । आपणपांचि ॥ ९ ॥ कृष्ण विष्णु हरि गोविंद | या नामांचे निखळ प्रबंध | माझी आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥ २१० ॥ हें बहु असो यापरी । कीर्तित मातें अवधारीं । एक सर्व जग आत्मसुखाने दुमदुमून सोडतात. २०० ते पहांदेशिवाय ज्ञानदिवसाला उजडवितात, अमृतावांचून अमर करतात, आणि योगसाधनावीण डोळ्यांना मोक्ष दाखवितात. १ राजा आणि रंक यांमध्ये योग्यतेचा भेदभाव कल्पिणें, किंवा लहानथोरांत निवडानिवड करणे, हें त्यांच्या गांवींही नसतें. ते पंक्तिप्रपंच न करतां सर्व जगाला आनंदाचे आवार सपशेल उघडे ठेवतात. २ क्वचित् एखादा मनुष्य कधीं तरी वैकुंठाला जातो, परंतु यांनी हें सर्व विश्वच बैकुंठ करून सोडलें. अशा प्रकारे केवळ नामकीर्तनाच्या घोषानें ते सर्व जग स्वच्छ प्रकाशमय करतात. ३ ते सूर्यासारखे तेजस्वी असतात, परंतु सूर्याला अस्तकाळाचा दोष लागतो, तो दोष त्यांना स्पर्शतही नाहीं. चंद्र हा पौर्णिमेला संपूर्ण मंडळयुक्त दिसतो, परंतु हे नेहमींच पूर्णत्व धारण करतात. ४ मेघ उदार खरा पण त्याचाही सांठा केव्हांतरी संपतो, म्हणून तोही यांच्या बरोबरीला उतरूं शकत नाहीं. हे खरोखरच उडते सिंह म्हटले पाहिजेत. ५ जे माझे नांव एक वेळ तोंडी येण्याला हजारों जन्म घ्यावे लागतात, तें नांव यांच्या जिभेवर आवडीनें निरंतर नाचत असतें. ६ मी असा आहें, कीं, मी वैकुंठांत नसतो, भानुमंडळांतही दृष्टीस पडत नाहीं, इतकेंच नव्हे, तर योग्यांचीं मनेही डावलून जातो, ७ तरीपण, अर्जुना, ज्या ठिकाणीं माझे अनन्य भक्त प्रेमानें माझे नामसंकीर्तनाचा घोष करीत असतात, तेथे मी, इतरत्र कोठेही न सांपडणारा, सहज सांपडतों. ८ ते माझ्या गुणांत कसे गर्क होऊन जातात, पहा. त्यांना स्थळकाळाचा विसर पडून ते माझ्या नामकीर्तनांत आत्मसुख पावतात. ९ 'कृष्ण, विष्णु, हरि, गोविंद, ' या नामांची अखंड गुंफण चालू असते, आणि मजविषयींची अध्यात्मचर्चा मोकळेपणाने करून, ते पोटभर माझ्या गुणांचीं गीतें गात असतात. २१० पण हा विस्तार पुरे. अर्जुना, ते भक्त याप्रमाणं माझं कीर्तन 6 १ तुलना करू. २ आवडनिवड ३ आवार ४ दोष. ५ आवडीनें,