पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला श्रीगुरुकृपा नमिलें । आदिवीज ॥ २० ॥ आतां अभिनववाग्विलासिनी । जे चातुर्य कलाकामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥ २१ ॥ मज हृदयीं सद्गुरु । जेणें तारिलों हा संसारपुरु । म्हणऊनि विशेष अत्यादरु | विवेकावरी ॥ २२ ॥ जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळी दृष्टीसी फांटा फुटे। मग वास पाहिजे तेथ प्रगटे । महानिधी ॥ २३ ॥ कां चिंतामणि आलिया हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं । तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति | ज्ञानदेवो म्हणे ॥ २४ ॥ म्हणोनि जाणतेन गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होइजे । जैसे मूळसिंचनें सहजें । शाखापलव संतोपती ।। २५ ।। कां तीर्थै जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनी । ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥ २६ ॥ तैसा पुढत- पुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि । जो अभिलापित मनोरथुचि । पुरविता ॥ २७ ॥ आतां अवधारा कथा गहन । जे कळा कौतुकां जन्मस्थान | कीं अभिनव उद्यान । विवेकतरूंचें ॥ २८ ॥ ना तरी सर्व सुखाची आदि । जे प्रमेयमहानिधि । नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण है ।। २९ ।। कीं परमधाम प्रकट | सर्व विद्यांचें मूळपीठ । शास्त्रजातां वमोटं । अशेषांचें ॥ ३० ॥ ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचें जिव्हार । लावण्यरत्नभांडार । शारदेचें ॥ ३१॥ म्हणून मी सद्गुरुकृपेनें त्या अखिल विश्वाच्या मूळ बीजाला नमन करतों. २० आतां, जी वाणीचे नवनवे विलास प्रगट करिते व जिला चातुर्य आणि कला यांचा विशेष छंद आहे, त्या विश्वमोहिनी शारदेला मी वंदन करितों. २१ मला या संसाररूपी पुराच्या पार ज्याने उतरलें आहे, तो सद्गुरु माझ्या अन्तःकरणांत ठसला असल्यामुळे माझ्या मनांत विवेकाविषयीं फार आदर आहे. २२ ज्याप्रमाणें दिव्याञ्जन डोळ्यांना लावलें, म्हणजे दृष्टीला अपूर्व बळ येतें, आणि मग जें जें स्थळ पहावें, तेथे तेथे द्रव्याचे भूमिगत प्रचंड ठेवे प्रकट दिसूं लागतात. २३ किंवा ज्याप्रमाणें चिंतामणि हातीं आला म्हणजे नेहमीच मनोरथ सिद्धीला पावतात, त्याप्रमाणेच मी श्रीनिवृत्तिनाथांच्या योगानें पूर्णकाम झालों आहें असें मी ज्ञानदेव म्हणतों. २४ म्हणून शहाण्यानें गुरूची भक्ति करावी व तेणें- करून कृतकार्य व्हावें. कारण, जसें झाडाच्या मूळावर पाणी शिंपलें असतां आपोआप फांद्यापानांना वडवी येते. २५ किंवा जसें सागरांत स्नान केलें असतां त्रिभुवनांतील सर्व तीर्थस्नाने घडतात, किंवा अमृतरसाच्या सेवनांत जसा सर्व रसांचा अन्तर्भाव होतो. २६ त्याप्रमाणेंच जो माझे इष्ट मनोरथ सिद्धीला पाववितो, त्या श्री गुरुला मी पुन्हां पुन्हां वंदन करितों. २७ आतां एक प्रौढ व गंभीर कथा श्रवण करावी. ही कथा सर्व कलाविलासांची जन्मभूमि, किंवा विवेकवृक्षांचें अपूर्व उपवन आहे. २८ किंवा सर्व सुखाचे मूलस्थान असे जे महासिद्धान्तांचे ठेवे, किंवा नवरसामृताचे तुडुंबलेले जे सागर, ते हीच कथा होय. २९ अथवा ही कथा म्हणजे प्रत्यक्ष परमगतीचे ठिकाण, सर्व विद्यांचं आदिपीठ, किंवा समग्र शास्त्रसमूहांचे वसतिस्थानच आहे. ३० अथवा ही कथा धर्मविचारांचं माहेरघर, सज्जनांचा जिव्हाळा व सरस्वती देवीच्या सौंदर्यसंपत्तीचं भांडार आहे. ३१ किंवा व्यासाच्या १ किंवा २ रावतिस्थान,