पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी नाना कथारूपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं । आविष्करोनि महामती । व्यासाचिये ।। ३२ ।। म्हणोनि हा काव्यां रावो । ग्रंथगुरुवतीचा ठावो । एथोनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥ ३३ ॥ तेवींचि आइका आणीक एक । एथोनि शब्दश्री सशास्त्रिक । आणि महाबोधी कोंवळीक | दुणावली ॥ ३४ ॥ एथ चातुर्य शाहणें झालें । प्रेमें रुचीस आलें । आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ॥ ३५ ॥ माधुर्या मधुरता । शंगारी सुरेखता । रूढपण उचितां । दिसे भलें ॥ ३६॥ एथ कळाविदपण कळां । पुण्यासि प्रतापु आगळा । म्हणऊनि जनमेजयाचे अवलीळा | दोष हरले ॥ ३७ ॥ आणि पाहतां नौवेक । रंगी सुरंगतेची आगळिक | गुणां सुगुणपणाचें विकेँ । बहुवस एथें ॥ ३८ ॥ भानुचेनि तेजें धवळलें । जैसें त्रैलोक्य दिसे उजळिलें । तैसें व्यासमती कवळिलें । मिरवे विश्व ।। ३९ ॥ कां सुक्षेत्रीं वीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें । तैसें भारतीं सुरवडलें । अंर्थजात ॥ ४० ॥ ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नांगरच होजे । तैसें व्यासोक्तितेजें । धवळत सकळ ॥ ४१ ॥ hi प्रथमवयसाकाळी | लावण्याची नव्हाळी । प्रकटे जैसी आगळी । अंगना- अंगीं ॥ ४२ ॥ ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे । I विशाळ मतीला स्फुरण देऊन या कथेच्या रूपानें प्रत्यक्ष वाणीदेवीच त्रिभुवनांत प्रकट झाली आहे. ३२ म्हणून ही कथा सर्व महाकाव्यांची राज्ञी व ग्रंथगौरवाचें सांठवण आहे, आणि हिच्यापासून शृंगारादि नवरसांना रसाळपणाची प्राप्ती झाली आहे. ३३ त्याप्रमाणेंच या कथेचं आणखी एक लक्षण श्रवण करा. या कथेपासूनच शब्दवैभव शास्त्रशुद्ध झालें आणि आत्मबोधांतील कोमलपणा दुणावला. ३४ या कथेमुळेंच चातुर्याला शहाणपण लाभलें, भक्तिरस स्वादाला चढला, आणि सुखाचें सौभाग्य पुट झालं. ३५ हिच्यामुळेच माधुर्याला गोडींची, शृंगाराला सुरेखपणाची, आणि योग्य गोष्टींना लोकप्रियतेची जोड लागून शोभा आली आहे. ३६ या कथेपासून कलांना कलाज्ञान लाभलें, पुण्याला अपूर्व वैभव मिळालें, आणि म्हणूनच जनमेजय राजाच्या पापकृत्यांच्या दोषांचें सहज क्षालन झालें. ३७ आणि जरासा खोल विचार केला तर असें निश्चित होतें, कीं, रंगांना सुरंगितपणाचं सामर्थ्य व गुणांना सद्गुणत्वाचं तेज याच कथेनें विपुल दिले आहे. ३८ एकंदरीत, ज्याप्रमाणें सूर्याच्या तेजानें त्रिभुवन उजळ होतें, त्याप्रमाणेंच व्यासाच्या बुद्धीनें व्यापल्यामुळे विश्व प्रकाशित झालें आहे. ३९ अथवा, सकस जमिनींत वीं टाकलें म्हणजे तें आपोआप वाढून विस्तारतें, तद्वत् या भारत ग्रंथांत संपूर्ण विषय सुखानं डवरले आहेत. ४० किंवा जसा मनुष्य नगरांत राहिला म्हणजे बहुश्रुत व सभ्य साहजिकच होतो, तसें सकल वस्तुजात व्यासवाणीनें उजळ व स्पष्ट झालें आहे. ४१ अथवा, तारु- ण्याच्या आरंभी जशी स्त्रियेच्या अंगीं लावण्याच्या नव नवतीची अपूर्व शोभा प्रगट होते. ४२ किंवा १ गुलती = गौरव, प्रौढी २ आकार, रूप. ३ कोमलता. ४ भगवत्प्रेम ५ विशेष, अधिक. ६ क्षणभर. ७ तेज, ८ सुखावलें, ९ अर्धमात्र, सर्व अर्थ. १० सभ्य व बहुश्रुत, ११ तारण्याच्या पहिल्या भरत