पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी व्यासादिकांच्या मती । तेचि मेखळा मिरवती | चोखाळपणें झळकती । पलवैसडका ॥ ९॥ देखा पड्दर्शनें म्हणिपती । तेचि भुजांची आकृति । म्हण- ऊनि विसंवादें धरिती । आयुधें हातीं ॥ १० ॥ तरी तर्क तोचि परशु । नीतिभेदु अंकुशु | वेदांतु तो महारसु | मोदक मिरवे ॥। ११ ॥ एके हातीं दंतु । जो स्वभावतां खंडित । तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥ मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु | अभयहस्तु || १३ || देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंड सरळ । जेथ परमानंद केवळ । महासुखाचा ॥ १४ ॥ तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्ण । देवो उन्मेषेसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥ मज अवगंमलिया दोनी । मीमांसा श्रवण- स्थानीं । बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥ १६ ॥ प्रमेयवालसुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभै । सरिसर्पणे एकवटत इभ - | मस्तकावरी ।। १७ ।। उपरि दशोप- निपदें । जियें उदारें ज्ञानमकरंदें । तियें मुगुटीं कुसुमें सुगंधें । शोभती भलीं ॥ १८ ॥ अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल | मकारु महामंडल | मस्तकाकारें ॥ १९ ॥ हे तिन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें । तें मियां शेल्याचा कंबरबंध होय, आणि या शेल्याच्या पदराचे सोगे (या घुंगुरांच्या) वरच्या बाजूस झळकत असतात. ९ आणि ज्या सहा भिन्नभिन्न तत्त्वसंप्रदायांना षड्दर्शने म्हणतात, तेच (या गणेशमूर्तीचे ) सहा हात आहेत; याच कारणास्तव ( या संप्रदायांच्या मतभेदानुसार ) या सहा हातांतील आयुधेंही परस्परांशी विसंवादी अशीं आहेत. १० तर्कशास्त्र हाच फरश, न्यायशास्त्र हाच अंकुश, आणि वेदान्त- शास्त्र हात्र गोड रसभरित मोदक होय. ११ न्यायसूत्रावरील वृत्तिकारांनी निर्दिष्ट केलेला, पण स्वभाव- तःच खंडित झालेला जो बौद्धमताचा संकेत, तोच एका हातांतील मोडका दांत होय. १२ या क्रमानें वर्णन चालविलें, तर ओघानेच असें येतें, कीं, सत्तर्कवाद म्हणजेच ( या गणेशाचा ) वरदहस्त, आणि धर्मप्रतिष्ठा म्हणजेच ( त्याचा ) अभयहस्त. १३ निर्मळ सुविचार हाच या गणेशाचा महासुखाच्या निर्भेळ परमानंदाची जोड करून देणारा सरळ शुंडादंड आहे. १४ तसाच मतभेदांचा परिहार करणारा जो संवाद, तोच याचा अखंडित व शुभ्रवर्ण दांत होय. उन्मेष ( म्ह. ज्ञानतेजाचें स्फुरण) हेच या विघ्नराज गणेशदेवाचे किलकिले सूक्ष्म नेत्र होत. १५ तसेच, मला असे भासतें कीं, पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा हे याचें कर्णद्वय आहे, आणि या कर्णद्रयावर मुनिरूपी भ्रमर (गंडस्थ- लांतून वाहणारा ) बोधरूपी मदरस सेवीत असतात. १६ तत्त्वार्थरूप पोवळ्यांनी झळकणारी द्वैत व अद्वैत हींच दोन गंडस्थळें होत. हीं दोन्ही या गणेशाच्या गजमस्तकावर जवळ जवळ अगदीं खंडून भिडल्यामुळे बहुतेक एकवटच झालीं आहेत. १७ शिवाय ज्ञानरूप मकरंदाने ओतप्रोत भरलेलीं दहा उपनिषद हींच मधुर वासाची फुलें मुकुटावर फारच शोभिवंत दिसतात. १८ या गणेशाचे अकार हें चरणद्वय, उकार हैं विशाळ उदर, आणि मकार हें मस्तकाचें महामंडळ आहे. १९ या अकार उकार व मकार अशा तिहींचा एक मेळ झाला, कीं जो ॐकार होतो, त्यांतच सर्व वाङ्मयविश्व समावतें; १ पदराचे सोगे, २ ज्ञानरूपी बारीक डोळे आहेत ज्याचे असा. ३ वाटल्या. ४ प्रवाल-पोंवळीं. ५ गंडस्थळे. ६ सलगपणानें.