पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २७१ ॥ १९० ॥ जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ । जे आनंदसमुद्रीं कुंभ । चुबकळोनि भरिले ॥ ९९ ॥ जयां भक्तीची येतुली प्राप्ति । जे कैवल्यातें परौतें सर म्हणती । जयांचिये लीळेमाजीं नीति | जियाली दिसे ॥ ९२ ॥ जे आघवांचि करणीं । लेइले शांतीची लेणीं । जयांचें चित्त गवसणी | व्यापका मज ॥ ९३ ॥ ऐसे जे महानुभाव । दैविये प्रकृतीचे दैव । जे जाणोनियां सर्व । स्वरूप माझें ॥ ९४ ॥ मग वाढतेनि प्रेमें । मातें भजती जे महात्मे । परि दुजेपण मनोध में । शिवतलें नाहीं ॥ ९५ ॥ ऐसे मीच होऊनि पांडवा । करिती माझी सेवा । परि नवलावो तो सांगावा । असे आइक ॥ ९६ ॥ सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः । नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ १४ ॥ सम० - मरकीर्तनीं नित्य रत प्रयत्नीं जे दृढव्रत । वंदिती आत्मभक्तीनें स्वरूपीं नित्ययुक्त जे ॥ १४ ॥ आर्या - संतत कीर्तित मार्ते दृढव्रती यत्नशीळ अनुरक्त । नमुनी मज भक्तीनें उपासिती नित्ययुक्त मद्भक्त ॥ १४ ॥ ओवी - माझें कीर्तन सदा करी । हेंच व्रत मन दृढ धरी । आणि भक्ति उपासना करी । मन तत्पर होवोनी ॥ १४ ॥ तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे । जे नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ।। ९७ ।। यमदमा अवकळा आणिली । तीर्थे ठायावरूनि उठविलीं । यमलोकींची खुंटली | राहटी आघवी ॥ ९८ ॥ यमु म्हणे काय यमावें । दम म्हणे कवणातें दमावें । तीर्थे म्हणती काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥ ९९ ।। ऐसे माझेनि नामघोखें । नाहींचि करिती विश्वाचीं पल्लव फुटले आहेत; १९० जे जगाची परिणति - परिसमाप्ति - ज्यांत होते त्या परब्रह्मास फुटलेले जणूं काय कोंभच आहेत, जे धैर्याचे आधारस्तंभ वाटतात, जे आनंदसमुद्रांत बुडवून भरून काढलेल्या भांड्यांप्रमाणें आहेत; ९१ ज्यांना भक्तीची इतकी आवड आहे, कीं, जे भक्तीपुढें मुक्तीलाही 'दूर हो, तूं आम्हांस नको,' असें म्हणतात, ज्यांच्या सहज आचरणांतही नीति जिवंतपणें नांदते; ९२ ज्यांची सर्व इंद्रियं शांतीनें शृंगारलेलीं असतात, आणि ज्यांचें चित्त इतकें विशाळ असतं कीं तें सर्वव्यापक अशा मलाही पूर्णपणें गुरफटून टाकतें; ९३ अशा प्रकारें जे महासमर्थ महात्मे, केवळ दैवी संपत्तीचं सौभाग्यच असे जे माझें सत्य स्वरूप सर्वशः जाणून, मग चढत्या वाढत्या प्रेमानें मला भजतात, परंतु ज्यांना द्वैतभाव काडीमात्रही स्पर्श करीत नाहीं; ९४, ९५ अर्जुना, ते मत्स्वरूपच होऊन राहातात. ते माझी सेवा करतातच, परंतु त्या सेवेचें एक नवल आहे, तें ऐक. ९६ अशा भक्तांनी कीर्तनप्रसंगी भक्तीच्या भरांत नाचून प्रायश्चित्ताचा व्यापार बंद पाडलेला असतो, कारण त्यांचे ठायीं पापाचें नांवही नसतें. ९७ ते यमदमाला निस्तेज करतात, तीर्थक्षेत्रांची ठाणी ओस पाहून उठवतात, आणि यमलोकाचा रस्ता खुंटवून टाकतात. ९८ कारण यम म्हणतो, 'यांनी इंद्रियं पूर्वीच आवरली आहेत, मग मला नियमनाची कामगिरी आतां उरली तरी कोठें ? ' यांचा मनोनिग्रह पाहून दम म्हणतो, 'मी आतां कोणाचे दमन करायें ? ' तीर्थे म्हणतात, " यांच्या अंगीं औषधालाही दोष नाहीं, मग आम्हीं आपल्या पावनगुणानें कोणते मळ खाऊन टाकावे ? ' ९९ अशा रीतीने केवळ माझ्या नामकीर्तनाच्या घोषाने हे महात्मे विश्वाचें दुःख नाहींसें करून,