पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७० सार्थ ज्ञानेश्वरी अखंड चघळी ॥ ८१ ॥ जे अनर्थाचे कानवेरी | आवाळु चाटीत निघे बाहेरी । जे प्रमादपर्वतींची दरी । सदाचि मातली ॥ ८२ ॥ जेथ छेपाचिया दाढा । खसखसां ज्ञानाचा करिती रगडा । जे त्वगस्थी गवसणी मूढां । स्थूलबुद्धि || ८३ | ऐसे आसुरिये प्रकृतीचे तोंडीं । जे जाले गा भूतोंडी । ते बुडोनि गेले कुंडीं । व्यामोहाच्या ॥ ८४ ॥ एवं तमाचिये पडिले गर्ते । न पविजतीचि विचाराचेनि हातें । हें असो गेले जेथें । ते शुद्धीचि नाहीं ॥ ८५ ॥ म्हणोनि असोत इयें वायाणी । कायशी मृखांची बोलणीं । वायां वाढवितां वाणी । शिणेल हन ॥ ८६ ॥ ऐसें बोलिलें देवें । तेथ जी जी म्हणितलें पांडवें । आइकें जेथ वाचा विसंवे । ते साधुकथा ॥ ८७ ॥ महात्मानस्तु मां पार्थ देवीं प्रकृतिमाश्रिताः । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥१३॥ सम० - महा सुबुद्धि ते पार्था दैवी प्रकृतिने मला । अद्वैतें भजती आधीं अंतीं जाणोनि एक मी ॥ १३ ॥ आर्या - एकाग्रमन महात्मे त्या देवी प्रकृतिचे अधिष्ठाते । अव्यय मी भूतादिहि मज जाणुनि भजति धरुनि निष्ठा ते ॥ १३॥ ओवी - महा सुबुद्ध निगुतीं । अर्जुना ते सदाश्रित होती । मनोभावें तत्पर असती । अंर्ती एक म्हणोनियां ॥ १३ ॥ तरी जयांचिये चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी । जयां निजेलियातें उपासी । वैराग्य गा ॥ ८८ ॥ जयांचिया आस्थेचिया सद्भावा । आंतु धर्म करी राणिवा । जयांचे मनीं ओलावा | विवेकाचा ॥ ८९ ॥ जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले । जे शांतीसि आले | पालव नवे हिंसेची जीभ लळलळ करीत असते आणि असमाधानाचे चोथे ती सारखी चघळीत असते. ८१ ही हिंसेची जीभ ओंठ चाटीत अनर्थाच्या कानापर्यंत बाहेर निघते. ही राक्षसी दोषाच्या पर्वतांतील दरींत निरंतर मत्त होऊन भटकते. ८२ द्वेष ह्या तिच्या दाढा आहेत आणि त्यांनी ती ज्ञानाचा खसाखस चुराडा करून टाकते. आणि जी स्थूल बुद्धीच्या मूर्खाना त्वचा आणि अस्थी यांच्या वेष्टनाप्रमाणं आहे. ८३ अशा प्रकारच्या या तामसी मायाराक्षसीचे तोंडांत भूतास दिलेल्या बळीप्रमाणें जे पडले, ते अज्ञानभ्रांतीच्या डोहांत बुडून गर्क होतात. ८४ असे जे तमोगुणाच्या खळग्यांत धडाडले, त्यांना विचाराचा हात मदत देण्याला पोचतच नाहीं. त्यांची मुळीं गोष्टच बोलावयास नको, कारण ते कोठें गेले याचादेखील पत्ता नाहीं. ८५ म्हणून, या मूढ लोकांची ही वायफळ कहाणी आतां पुरे झाली. हिची लांबण लावल्यानें वाणीला मात्र उगीच शीण होईल. " ८६ असें भगवान् श्रीकृष्ण म्हणाले आणि अर्जुनही, “महाराज, आपण म्हणतां तेंच खरें, "7 असें बोलला. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, “अर्जुना, आतां मी साधुपुरुषांची स्थिति सांगतों, ती श्रवण कर. ८७ पवित्र स्थळीं निरंतर राहण्याचा संकल्प करणारा मी क्षेत्रसंन्यासी ज्यांच्या शुद्ध अंतःकरणांत राहात असतों; ज्यांना झोपेतही वैराग्य सोडून जात नाहीं; ८८ ज्यांच्या श्रद्धायुक्त शुद्ध भावनेंत धर्माचें साम्राज्य असते; ज्यांच्या मनांत नेहमी विवेकाचा ओलावा राहातोः ८९ ज्यांनी ज्ञानगंगेत स्नान केले आहे, जे पूर्ण ब्रह्मस्थितीला पोंचून समाधान पावले आहेत; जे शांतिवेलीला जणूं काय नवे १ भूतावळीस दिलेला बळी २ डोहांत, ३ व्यर्थ.