पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २६९ यालागीं जन्मलेचि ते मोघ । जैसे वार्षियेवीण मेघ । कां मृगजळाचे तरंग । दुरुनीचि पाहावे ।। ७२ ।। अथवा कोल्हेरीचे असिवार । ना तरी वोडवैरीचे अळंकार । कीं गंधर्वनगरीचे आवार । आभासती कां ॥ ७३ ॥ सावरी वाढिन्नल्या सरळा । वरी फळ ना आंतु पोकळा । कां स्तन जाले गळां । शेळिये जैसे ॥ ७४ ॥ तैसें मूर्खाचे तयां जियालें । आणि धिग कर्म तयांचें निपजलें | जैसें सांवरी फळ आलें । घेपें ना दीजे ॥ ७५ ॥ मग जें कांहीं ते पढिन्नले । तें मर्कटें नारेळ तोडिले । कां आंधळ्या हातीं पडिलें । मोतीं जैसें ॥ ७६ ॥ किंबहुना तयांची शास्त्रें । जैशीं कुमारीहातीं दिवली शस्त्रें । कां अशौचा मंत्र | वीजें कथिलीं ॥ ७७ ॥ तैसें ज्ञानजात तयां । आणि जें कांहीं आचरलें गा धनंजया । तें आघवेंचि गेलें वायां । जे चित्तहीन ॥ ७८ ॥ पैं तमोगुणाची राक्षसी । जे सद्बुद्धीतें ग्रासी । विवेकाचा ठावोचि पुसी । निशाचरी जे ॥ ७९ ॥ तिये प्रकृती वरैपडे जौले । म्हणऊनि चित्ताचे कंपाळे गेले । वरि तामसीयेचि पडिले । मुखामाजीं ॥ १८० ॥ जेथ आशेचिये लाळे | आंतु हिंसा जीभ लोळे । तेवींचि असंतोषाचे चाँकळे । या कारणास्तव अशा पुरुषांचें जीवित निष्फळ ठरते. जसे पावसाळ्याशिवाय इतर ऋतूंतील ढग किंवा मृगजळाच्या लाटा केवळ दुरूनच पाहाव्या, जवळ जाऊन त्यांची परीक्षा करण्यांत अर्थ नसतो; कारण अशा परीक्षेत तीं दोन्ही फोलच ठरणार; ७२ किंवा कोल्हाट्यांच्या खेळांतील घोडेस्वार, किंवा जादूगारानें उत्पन्न केलेले अलंकार, अथवा आकाशांतील ढगांचे वाडेहुडे, जसे मूळांत नसतां भासमान होतात; ७३ किंवा सावरीचीं झाडें सडक सरळ वाढलीं तरी त्यांवर जसें फळ येत नाहीं आणि त्यांची खोडेंही आंतून पोकळच असतात; किंवा शेळीच्या गळ्यास फुटलेले अचळ जसे निव्वळ दिखाऊ ठरतात; ७४ तसें त्या मूढ पुरुषांचें जीवित होते; त्यांनीं केलेलें कर्म सांवरीच्या फळाप्रमाणे देण्याघेण्याच्या कामी निरुपयोगी होऊन धिक्कार करण्यासच योग्य ठरते. ७५ मग ते जें ज्ञान शिकले असतील, तें माकडानें तोडलेल्या नारळांसारखें किंवा आंधळ्याच्या हातीं पडलेल्या मोत्यासारखं वायफळ होते. ७६ सारांश, त्यांचीं शास्त्रे म्हणजे मुलीच्या हातांतील शस्त्रांसारखी किंवा अशुद्ध पुरुषांला मंत्रबीजाप्रमाणे केवळ निरुपयोगी होतात. ७७ त्याप्रमाणेच, अर्जुना, त्यांचा सर्व ज्ञानसंग्रह आणि कर्मसंग्रह, हे दोन्ही वायांच होत, कारण त्यांच्या चित्तांत यथार्थज्ञानाचा अभाव असतो. ७८ चांगल्या बुद्धीला ग्रासून टाकणारी व विवेकाचें ठावठिकाण नाहींसें करणारी जी अज्ञानाच्या अंधारांत संचरणारी तामसी राक्षसी प्रकृतिमाया, ७९ तिच्या तावडीत ते सांपडलेले असतात, म्हणून त्यांच्या चित्ताच्या ठिकऱ्या उडून ते तमोगुणयुक्त राक्षसीच्या तोंडांत पडतात. १८० या तामसी राक्षसीच्या तोंडांत आशेच्या लाळेच्या आंत १ कोल्दाट्यांच्या खेळांतील. २ स्वार ३ जादूच्या खेळांतील ४ आकाशांतील दगांचे. ५ तावर्डीत सांपडले, ६ कपळे, तुकडे, ७ चोथे,