पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी तैं चांदणियातें म्हणे पिंवळें । तेविं माझ्या स्वरूपीं निर्मळे । देखती दोप ॥ ४१ ॥ ना तरी ज्वरें विटाळलें मुख । तें दुधातें म्हणे कडू विख । तेविं अमानुपा मानुप । मानिती मातें ॥ ४२ ॥ म्हणऊनि पुढतपुढती धनंजया । झणें विसंवसी या अभिप्राया । जे इया स्थूलदृष्टि वायां । जाइजेल गा || ४३ || पैं स्थूलदृष्टी देखती मातें । तेंचि न देखणं जाण निरुतें । जैसें स्वप्नींचेनि अमृतें । अमरा नोहिजे ॥ ४४ ॥ एन्हवीं स्थूलदृष्टि मूढ । मातें जाणती की दृढ । परि तें जाणणेंचि जाणणेया आड । रिगोनि ठाके ॥ ४५ ॥ जैसा नक्षत्राचिया आभासा - । साठीं घातु झाला तया हंसी । माजी रत्नबुद्धीचिया आशा । रिगोनियां ॥ ४६ ॥ सांगें गंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचें कवण फळ । काय सुरतरु म्हणोनि बाबुळ । सेविली करी ॥ ४७ ॥ हार निळयाचाचि दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । कां रत्नें म्हणोनि गारा । वेंचि जेवीं ॥ ४८ ॥ अथवा निधान हैं प्रगटलें । म्हणोनि खदिरांगार खोळे भरिले । कां साउली नेणतां घातलें । कुहां सिंहं ॥ ४९ ॥ तेविं मी म्हणोनि प्रपंचीं । जिहीं बुडी दिली कृतनिश्चयाची । तिहीं चंद्रासाठीं जेविं जळींची । प्रतिभा धरिली ।। १५० ।। व्यापिली असतां, जसें पिठासारखे स्वच्छ चांदणेंही पिंवळें दिसूं लागतं, तसें माझें निर्मळ स्वरूपही सदोष भासूं लागतें. ४१ किंवा तापाने तोंडाची चव गेली असतां, जसें दूधही कडू लागतें, त्याप्रमाणें मी मनुष्य नसतांही मला मनुष्य मानण्यांत येतें. ४२ म्हणून, वा अर्जुना, मी पुन्हां पुन्हां तुला बजावतों कीं, बाबा, या रहस्यज्ञानाला विसरूं नकोस, कारण या रहस्यावांचून नुसती वरपांगी दृष्टी कांहींएक कामाची नाहीं. ४३ वरपांगी दृष्टीने मला पाहाणें, हें यथार्थपणे पाहाणेंच नव्हे, कारण स्वप्नांतल्या खोट्या अमृतानं कधींही अमर होतां येणार नाहीं. ४४ सामान्यपणे वरवर स्थूल दृष्टीनें मला लोक जाणतात, पण जसा नक्षत्रांच्या पाण्यांत पडलेल्या प्रतिबिंबाच्या चकाकीला फसून, हीं रत्नच आहेत अशा बुद्धीनें आशाळभूत झालेल्या हंसाचा नाश होतो, त्याप्रमाणें ही वरपांगी जाणीवच यथार्थ ज्ञानाला दृष्टीआड करते. ४५, ४६ मृगजळाला गंगा मानून जर त्याच्याजवळ आपण गेलों, तर कोणते फळ पदरी पडेल ? बाभळीला कल्पवृक्ष मानून हातीं धरली तर काय लाभ होईल ? ४७ हानी मण्यांचा दुलडी हार आहे, असें कल्पून काळसर्पाला हातीं धरला, किंवा रत्ने म्हणून गारा वेचल्या, ४८ किंवा हा गुप्त धनाचा ठेवा उघडला आहे अशा समजुतीनें खैराचे जळजळीत निखारे झोळींत घातले, किंवा एकाद्या सिंहाने आपली पडछाया विहिरींत पाहून, हा खरा सिंह आहे की काय, याचा विचार न करतां त्या विहिरींत झांप टाकली, तर त्याचा परिणाम काय होईल ? ४९ त्याप्रमाणे ज्यांनी 'मी परमात्मा खरोखरच साकार होऊन संसारांत अवतरतों, ' असा मनाचा पक्का ग्रह करून या प्रपंचांत बुडी मारली, त्यांनी जणूं काय चंद्रबुद्धीनें त्याचें १ हंस रत्नमोती भक्षण करतो अशी समजूत आहे.