पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २६५ म्हणोनि मी हेतु हे उपपत्ति | घडे यया ॥ ३२ ॥ आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळी पां ऐश्वर्ययोगातें । जे माझ्या ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें ॥३३॥ अथवा भूतें ना माझ्या ठायीं । आणि भूतांमाजीं मी नाहीं । या खुणा तूं कहीं । चुकों नको ॥ ३४ ॥ हें सर्वस्व आमुचें गूढ । परि दाविलें तुज उघड | आतां इंद्रियां देऊनि क्वीड | हृदयीं भोगीं ॥ ३५ ॥ हा दंशु जंब न ये हाता । तंव माझें साचोकारपण पार्था । न संपडे गा सर्वथा । जेविं तुषीं कण ॥ ३६ ॥ न्हवीं अनुमानाचेनि पैसें । ऑवडे कीर कळलें ऐसें । परि मृगजळाचेनि वोलांशें । काय भूमी तिमे ॥ ३७ ॥ जें जाँळ जळीं पांगिलें। तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें । परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां विंव के सांगें ॥ ३८ ॥ तैसे बोलवरि वाचावळें । वायांचि झकविजती प्रतीतीचे डोळे | मग साचोकारें वोधावेळे । आथी ना होइ ॥ ३९ ॥ अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् । परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ११ ॥ सम० - तो मी महा ईश त्यातें हे मूढ अवमानिती । मनुष्यतनु देखोनी मी परंज्योति नेणती ॥ ११ ॥ आर्या - जो मी भूत महेश्वर त्या माझा भाव परम जो गूढ । नेणुनि मनुष्य मातें मानुनि अवमानिती महामूढ ११ ऑवी - मज मनुष्य मूढलोक म्हणती । मनुष्यांची अज्ञान गति । मी ईश ऐसे नोळखती । ते मूर्ख जाण पैं ॥११॥ किंबहुना भवा विहाया । आणि साचें चाड आधी जरी मियां । तरि न्हवीं दिठी वेधली कवळें । तूं गा उपपत्ती इया | जतन कीजे ॥ १४० ॥ मी मूळ प्रकृतीला धारण केल्यामुळेच हे चराचर विश्व उद्भवते; म्हणून या विचारपद्धतीनें या विश्वोत्पत्तीला मीत्र कारण आहे. ३२ तेव्हां या दिव्य ज्ञानाच्या प्रकाशानें हें माझ्या 'ऐश्वर्ययोगाचें ' तत्त्व पहा; तें तत्त्व हे कीं, हें भूतमात्र माझ्याठायी आहे, पण मी भूतमात्रांत नाहीं; ३३ किंवा हे भूतमात्र माझ्याठायीं नाहीं, आणि मीही भूतमात्रांत नाहीं. बा अर्जुना, ही मुख्य मख्खीची गोष्ट तूं कधीही विसरूं नकोस. ३४ हें गूढ ज्ञान आमचें सारसर्वस्व आहे; तें तुला आज उघड करून सांगितलं आहे; तर आतां भरकटणाऱ्या इंद्रियांची दारे बंद करून आपल्या अंतरंगांत आत्मचिंतनानें या रहस्याच्या गोडीचा तूं उपभोग घे. ३५ अर्जुना, हें रहस्य जोपर्यंत हातीं आलें नाही, तोपर्यंत जसा तुसामधला धान्यकण सांपडत नाहीं, तसें माझें यथार्थ स्वरूप या नामरूपात्मक जगाच्या गाबाळांत कळून येत नाहीं. ३६ सामान्यतः तर्काच्या मार्गानें हें मर्म कळलें असें वाटतें, पण अनुभूतीवांचून तें व्यर्थ होय, कारण मृगजळाच्या ओलाव्यानें कधीं जमीन भिजून मऊ होते काय ? ३७ पाण्यांत पसरलेल्या जाळ्यांत चंद्राचे विंव अडकल्यासारखं दिसतें, परंतु ते जाळें तटावर ओढून झाडलं, तर तें कांठें असतं ? सांग पाहू. ३८ तसे लोक वाचाळपणा करून बोलघेवड्यांनी अनुभवाच्या डोळ्यांत धूळ फेंकतात, अनुभव न येतांच अनुभव आला असे वाचाटपणाने सांगतात, आणि यथार्थ बोधाच्या वेळाला ठावठिकाणच राहात नाहीं. ३९ एकंदरीत जर संसाराची भीति वाटत असेल आणि माझ्याविषयीं खरी खरी आवड असेल, तर हा तत्त्वविचार तूं काळजीपूर्वक स्मरणांत ठेविला पाहिजे. १४० नाहींतर, काविळीनें दृष्टी १ दार बंद करून २ मर्म. ३ वाटेने ४ वाटते. ५ भिजून मऊ होते. ६ जाळे, ७ पसरलें. ८ काविळीनें, ३४