पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २६७ तैसा कृतनिश्वय वायां गेला । जैसा कोण्ही एक कांजी प्याला । मग परिणाम पाहों लागला । अमृताचा ॥ ५१ ॥ तैसें स्थूलाकारी नाशिवंतें । भरंवसा बांधोनि चित्तें । पाहती मज अविनाशातें । तरी कैचा दिसें ॥ ५२ ॥ अगा काइ पश्चिममुद्राचिया तटा । निगिजत आहे पूर्विलिया वाटा । कां कोंडा कांडितासुभा । कणु आतुडे ॥ ५३ ॥ तैसें विकारलें हैं स्थूळ । जाणितलेया मी जाणवत केवळ | काइ फेण पितां जळ । सेविलें होय ॥ ५४ ॥ म्हणोनि मोहिलेनि मनोध में । हेंचि मी मानूनि संभ्रमें । मग येथींचीं जियें जन्मकर्मै । तियें मजचि म्हणती ।। ५५ ।। येतुलेनि अनामा नाम । मज अक्रियासि कर्म | विदेहासि देहधर्म । आरोपिती ।। ५६ ।। मज आकारशून्या आकारु । निरुपाधिका उपचारु । मज विधिवर्जिता व्यवहारु | आचारादिक ॥ ५७ ॥ मज वर्णहीना वर्णु । गुणातीतासि गुणु । मज अचरणा चरणु । अपाणिया पाणी ॥ ५८ ॥ मज अमेया मान । सर्वगतासी स्थान | जैसें सेजेमाजीं वन । निदेला देखे ॥ ५९ ॥ तैसें अश्रवणा श्रोत्र | मज अचक्षूसी नेत्र | अगोत्रा गोत्र । अरूपा रूप ।। १६० ।। मज अव्यक्तासि व्यक्ति । अनार्तासी आर्ति । स्वयंतृप्ता तृप्ति । भाविती गा ॥ ६१ ॥ मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण | मज सकळकारणा कारण । देखती ते॥६२॥ पाण्यांत पडलेलें प्रतिबिंब कवटाळलें, असें समजावें. १५० अशा प्रकारचा बुद्धीचा भ्रमित निश्चय केवळ व्यर्थ होय. एकाद्याने पेज प्यावी आणि मग अमृताच्या गुणाची अपेक्षा करावी, त्याप्रमाणेंच या नाशवंत नामरूपात्मक स्थूळावर मनानें पूर्ण विश्वास ठेवावयाचा, आणि मग त्यांत माझें शाश्वत स्वरूप पाहूं जायचें ! अशा प्रयत्नानें मी कसा बरं दिसणार ? ५१, ५२ अरे, पश्चिम समुद्राच्या तीरावर पूर्वेकडे जाणाऱ्या वाटेने चालून कधीं तरी पोचतां येईल का ? किंवा, अर्जुना, कोंडा कितीही कांडला तरी धान्यकण हातीं लागेल का ? ५३ त्याप्रमाणेंच विकारानें आकारलेलें हें स्थूळ विश्व जाणून माझे केवळ, निराकार, निर्गुण, स्वरूप कसें जाणवेल ? फेंस प्यायला असतां, 6 पाणी प्यायले, असे कसे होईल ? ५४ म्हणून, मनाला मोह पडल्यामुळे भ्रांतीनें 'हे विश्व म्हणजे मीच परमात्मा, 'असे लोक कल्पितात, आणि मग येथील जीं जन्ममरणादि कर्मों तीं मला लागू आहेत, असं समजतात. ५५ अशा रीतीनें मज नामरहितावर नामाचा, क्रियाहीनावर कर्माचा, विदेहावर देहधर्माचा आरोप ते करतात. ५६ मी निराकार असतां, आकाराचा आरोप मजवर करतात, मी उपाधिहीन असतां उपचारविधीचा, निष्क्रिय असतां व्यवहाराचा, वर्णहीन असतां वर्णाचा, निर्गुण असतां गुणाचा, हस्तपादरहित असतां हस्तपादांचा अपरिमित असतां परिमाणाचा, आणि सर्वव्यापि असतां स्थानविशेषाचा आरोप ते माझ्या ठायीं करतात. जसा निजलेला मनुष्य स्वप्नामध्ये अंथरुणांतच अरण्य पाहतो, ५७,५८,५९ तसे ते श्रवणहीन अशा मला श्रवण आहेत असं समजतात, मला डोळे, गोत्र, रूप, आकार, इच्छा, तृप्ति, वस्त्र, भूषण, व कारण हीं नसतांही, तीं माझ्याठायीं आहेत अशी भावना करतात. १६०,६१,६२, मी स्वयंसिद्ध असतां, माझ्या मूर्ति