पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु । न शके धरूं सेंधवाचा घांटु । तेविं सकळ कर्मा मीच शेवटु । तीं काय वांधिती मातें ॥ २४ ॥ धूम्ररजांची पिंजरी | वाजतिया वायूतें जरी होकारी । कां सूर्यविनामाझारी । आंधारें शिरे ।। २५ ।। हें असो पर्वताचिये हृदयींचें । जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचे। तेविं कर्मजात प्रकृतीचें । न लगे मज ॥ २६ ॥ एन्हवीं इये प्रकृतिविकारी । एक मीचि असें अवधारीं । परि उदासीनाचिया परी । करीं ना करवीं ॥ २७॥ जैसा दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी । आणि कवण कवणिये व्यापारीं । रहाटे तेंहि नेणे ॥ २८ ॥ तो जैसा कां साक्षीभूतु । गृहव्यापारप्रवृत्तिहेतु । तैसा भूतकर्मी अनासक्तु । मी भूतीं असें ।। २९ ।। मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् । हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ १० ॥ सम० - मी द्रष्टा दृष्टिने माझ्या विते माया चराचर । या हेतुने विश्व-सर्प मज दोरींच होतसे ॥ १० ॥ आर्या - मी अध्यक्ष म्हणोनी प्रकृतीही निर्मितों चराचर ती । या हेतूनें विश्व संसारामाजिं नित्य संचरती ॥ १० ॥ अवी—प्रकृति माझ्या अधिष्ठानेंकरून । चराचरातें प्रसवे जाण । याकारणें हे अर्जुन । जगास जन्ममरण होतसे ॥१०॥ हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती । काय सांगों बहुतां उपपत्ति । येथ एकहेळां सुभद्रापति । येतुलें जाण पां ॥ १३० ॥ जे लोकचेष्टां समस्तां । जैसा निमित्तमात्र कां सविता । तैसा जगत्प्रभवीं पांडुसुता । हेतु मी जाणें ॥ ३१ ॥ कां जे मियां अधिष्ठिलिया प्रकृति । होती चराचराचिया संभूति । ज्याप्रमाणें मिठास विरविणाऱ्या समुद्राच्या पाण्याचा प्रचंड लोंढा सुटला म्हणजे त्याला मिठाचा बांध आडवू शकत नाहीं, त्याप्रमाणे ज्या कर्माचा अखेर लय माझ्यांतच होतो, तीं कर्मै मला बंधक होऊं शकत नाहींत. २४ धुरांतल्या क्षुद्र कणाचा पिंजरा जर वाऱ्याला 'हं, थांब' असें म्हणून आडवूं शकेल, किंवा जर काळोखाला सूर्याच्या प्रभामंडलांत प्रवेश करतां येईल; २५ तरच हीं कमैं मला बांधूं शकतील. पावसाच्या धारांनीं जसें पर्वताचें अंतरंग विद्ध होत नाहीं, तसें प्रकृतीनें आचरलेले कर्म मला बांधूं शकत नाहीं. २६ वास्तविक पाहिलें, तर या प्रकृतीनें आणलेल्या नामरूपादि विकारांना माझा आधार आहेच, परंतु मी उदासीन - तटस्थ असल्यामुळे कोणतीही क्रिया करीत नाही किंवा करवीत नाहीं. २७ एकाद्या घरांत दिवा उजळून ठेवला, म्हणजे तो कोणाला आवरीत नाहीं कीं निवारीत नाहीं; कोणकोण कोणकोणता व्यवहार करतात, हेंही तो पहात नाहीं ; २८ तो दिवा जसा केवळ तटस्थ असतो, तरी पण घरांतील माणसांच्या क्रियांस कारण होतो, तसाच मी भूतमात्रांत असूनही भूतमात्राच्या कर्माशीं माझा संबंध नाहीं. २९ हे सुभद्रानाथा अर्जुना, हा एकच विचार निरनिराळ्या प्रकारांनी पुन्हापुन्हां किती सांगावा ? तूं आतां एकदां इतकेंच लक्षांत ठेव, १३० कीं, लोकांच्या व्यापारास जसा सूर्य केवळ निमित्त होतो, तसा मीही जगताच्या उत्पत्तीस केवळ तटस्थपणे निमित्त होतों; ३१ कारण, १ पिंजरा, सांपळा. २ घरांत.