पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २६३ व्यापारे आपुलालिया काजा । तैसा प्रकृतिसंगु हा माझा । येर करणें तें इयेचें ॥। १४ ।। पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्रीं अपार भरतें दाटी । तेथ चंद्रासि काय किरीटी । उपेखा पडे ।। १५ ।। जड परि जवळिका | लोह चळे तरि चळो कां । तरि कवणु शीणु भ्रांमका | सन्निधानाचा ॥ १६ ॥ किंवहना यापरी । मी निजप्रकृति अंगिकारी । आणि भूतमृष्टि एकसरी । प्रसवचि लागे ॥ १७ ॥ जो हा भूतग्रामु आघवा । असे प्रकृती अधीन पांडवा । जैसी बीजाचिया वेलपालवा । समर्थ भूमी ॥ १८ ॥ ना तरी बौळादिकां वयसा | गोसावी देहसंगु जैसा । अथवा घनावळी आकाशा | वॉर्पिये जेवीं ॥ १९ ॥ कां स्वप्नासि कारण निद्रा । तैसी प्रकृति है नरेंद्रा । या अशेपाहि भूतसमुद्रा । गोसाविणी गा ॥ १२० ॥ स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा | हे असो भूतग्रामा । प्रकृतिचि मूळ ॥ २१ ॥ म्हणोनि भूतें हन सृजावीं । कां सृजिलीं प्रतिपाळावीं । इयें करणीं न येती आघवीं । आमुचिया आंगा || २२ || जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रे नाहीं केली । तेवं मातें पावोनि ठेलीं । दूरी कर्मे ॥ २३ ॥ न च मां तानि कर्माणि निवघ्नन्ति धनंजय । उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९ ॥ सममा सृष्ट्यादि कर्मे तीं न बांधिति धनंजया । कीं मी उदासीन जसा असे कर्मी न लंपट ॥ ९ ॥ आर्या-परि तीं कमै मातें बांधुनि नेती कदा न अंधतमीं । त्या कमीही असतों औदासीन्यें असक्त संतत मी ॥ ९ ॥ ओवी - म्हणोनि कर्म तयांचिया । मला न बाधे धनंजया । उदास होऊनियां । आसक्त तेथें नन्हें ॥ ९ ॥ स्वीकार मात्र मजकडे येतो, बाकी सर्व व्यापारविहार त्या प्रकृतीचे आहेत, त्यांत माझा प्रत्यक्ष संबंध नाहीं. १४ अरे असें पहा, पौर्णिमेच्या चंद्राशी भेट झाली, म्हणजे समुद्राला अपरंपार भरत दाटते; अर्जुना, हें भरते आणण्याला चंद्राला काय समुद्राची उपसणी काढावी लागते ? १५ लोखंड जड असूनही, लोहचुंबक समीप असल्यास त्याला चळ भरतो; पण हे चलन घडविण्याला लोहचुंबकाला कांहीं श्रम करावे लागतात काय ? १६ एकंदरीत, याप्रमाणें मी मूळमायेला धारण करतों, आणि तत्काळ भूतसृष्टि आपोआप अस्तित्वांत येऊ लागते. १७ बीजाला वेल, पानें, वगैरे फुटण्याला जशी जमीन साहाय्यभूत होते, तशी, अर्जुना, ही सर्व भूतसृष्टि प्रकृतीच्या साहाय्यानं उदय पावते. १८ अथवा, वाल्यादि अवस्थांना जसें देहसंग हें मुख्य कारण आहे, किंवा आकाशाला वर्षणक्रिया करण्यास जशी मेघमंडळी मूळ कारण होते; १९ किंवा स्वप्नाला कारण जशी झोंप; तशी, हे नरश्रेष्ठा पार्था, या समस्त भूतसृमीला ही प्रकृतीच समर्थ कारण आहे. १२० सर्व चराचर, स्थूलसूक्ष्म, भूतमात्राचें मूळकारण ही प्रकृतीच आहे. २१ म्हणून भूतसृष्टि उत्पन्न करावी किंवा तिचा प्रतिपाळ करावा, इत्यादिक क्रियांचा संपर्क आमच्या अंगाला मुळींच लागत नाहीं. २२ पाण्यामध्ये चंद्राची किरणं वेलांसारखी लांबलेली दिसतात, पण ही वाढ कांहीं चंद्राने घडवून आणलेली नसते, त्याचप्रमाणे सर्व कर्मों मजप्रत पांचूनही माझ्यापासून अलग दूर राहातात. २३ १ उपसा, उपराणी. २ लोखंडास चाळविणाऱ्या लोहचुंबकास ३ बाळपण वगैरे वयाच्या अवस्थांस ४ समर्थ कारण. ५ वर्षावाला.