पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी कल्पक्षयीं ॥ ४ ॥ मग कल्पादीं पुढती । मीचि सृजीं ऐसी वदंती । तरी इयेविषयीं निरुती । उपपत्ति आइ ॥ ५ ॥ प्रकृर्ति स्वामवस्य विसृजामि पुनः पुनः । भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८ ॥ सम० - पुनःपुन्हा विश्वसर्प मायादृष्टि अधिष्ठुनी । निर्मितों स्वात्मदोरीं कीं भूतग्राम तिला वश ॥ ८ ॥ आर्या—बा कुरुकुलावतंसा आर्धी प्रकृतीस आपुल्या वरितों । परवश भूतसमूह प्रकृतिवशे मग पुनः पुन्हा करितों ॥ ८ ॥ ओवी - प्रकृतीचे बळेंकरूनी । सृर्जी मागुतेनी । हा सर्व भूतग्राम आदिकरोनी । प्रकृतीचे आधीन असती ॥ ८ ॥ तरी हेच प्रकृति किरीटी । मी स्वकीया सहजें अधिष्टीं । तेथ तंतुसमवाय पटीं । जेविं विणावणी दिसे ॥ ६ ॥ मग तिये विणावणीचेनि आधारें । लहाना चौकडियां पटत्व भरे । तैसी पंचात्मकें आकारें । प्रकृतीचि होय ॥ ७ ॥ जैसें विरजणियाचेनि संगें । दूधचि आटेजों लागे । तैसी प्रकृति आंगा रिंगे । सृष्टिपणाचिया ॥ ८ ॥ वीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखी होये । तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ॥ ९ ॥ अगा नगर हैं रायें केलें । या म्हणणया साचपण कीर आलें । परि निरुतें पाहतां काय सिणले | रायाचे हात ॥ ११० ॥ आणि मी प्रकृति अधिष्टीं तें कैसें । जैसा स्वप्नीं जो असे । मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥ ११ ॥ तरी स्वप्नौनि जागृती येतां । काय पाय दुखती पांडुसुता । कीं स्वनामाजीं असतां । प्रवासु होय ॥ १२ ॥ या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हैं भूतसृष्टीचें कांहीं । मज एकही करणें नाहीं । ऐसाचि अर्थ ॥ १३ ॥ जैसी रायें अधिष्टिली प्रजा । कल्पाच्या आरंभी 'मीच पुन्हां भूतसृष्टि उत्पन्न करतों, ' असें म्हणतात, त्याचं स्पष्ट विवरण करतों, त्याकडे लक्ष दे. ५ अरे, तंतूंचा समूह जसा आडवाउभा गुंफून स्वतःच पटरूप धारण करतो, त्याप्रमाणें मी या आपल्या मायेला सहज लीलेनें धारण करतों. ६ मग धाग्यांची आडवीउभी गुंफण होऊन त्यांच्या लहान लहान चौकांनीं पटाकार बनतो, तसेंच ही माझी प्रकृतीच नामरूपात्मक पांचभौतिक सृष्टि बनते. ७ जसें विरजणाचा स्पर्श झाला म्हणजे दूध गोडूं लागतें तसें मूळ प्रकृतीच्या ठिकाणीं सृटिपण चिंबूं लागतें. ८ बीजाला पाण्याचा संग होऊन ओलावा लाभतो आणि त्यामुळे त्याला कोंब फुट्न त्याला शाखोपशाखांच्या वृक्षाचें स्वरूप येते, त्याप्रमाणें प्रकृतिजन्य भूतसृष्टि माझ्यापासूनच प्रसार पावते. ९ अरे, राजानें नगर वसविलें असें म्हणतात, व एका अर्थी तें खरेंही आहे, पण वस्तुतः पाहिले तर नगराच्या बांधकामांत त्या राजाचे हात शिणतात काय ? ५१० तेव्हां मी प्रकृतीचा स्वीकार कसा करतो, तर जसा स्वप्नस्थितींत असणारा जागृतीत प्रवेश करतो, तसा. ११ स्वप्नांतून जागृतीत येतांना कधीं पायांना श्रम होतात की स्वप्नांतून प्रवास करावा लागतो ? सांग पाहू. १२ या सर्व विवरणाचा सारांश काय, तर ही भूतसृष्टि घडत असतां, मला कांहींच क्रिया करावी लागत नसते, १३ ज्याप्रमाणे राजाच्या नियंत्रणाखालीं प्रजाजन असतात, पण जो तो आपापला व्यापारव्यवहार यथारुचि करतो, त्याप्रमाणें प्रकृतीचा १ स्वीकारतों. •