पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ॐ नमो भगवते वासुदेवाय सार्थ श्रीज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीगोपालकृष्णाय नमः ॥ ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥ देवा तूंचि गणेशु | सकलार्थमतिप्रकाशु | म्हणे निवृत्तिदासु । अवैधारिजो जी ॥ २ ॥ हें शब्द अशेष । तेचि मूर्ति सुवेप । तेथ वर्णवपु निर्दोष | मिरवत असे ||३|| स्मृति तेचि अवयव । रेखा आंगीकभाव । तेथ लावण्याची ठेवै । अर्थशोभा ||४|| अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें । पदपद्धती खेवणें । प्रमेयरत्नांचीं ॥ ५ ॥ पद्यबंध नागर । तेंचि रंगौथिलें अंवर । जेथ साहित्य वाँणें सपूर | उजाळाचें ॥६॥ देखा काव्य नाटका | जे निर्धारितां सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥ ७ ॥ नाना प्रमेयांची परी । निपुण- पर्णे पाहतां कुसरी । दिसती उचित पढ़ें माझारी । रनें भलीं ॥ ८ ॥ तेथ हे कारस्वरूप परमात्म्या ! वेदांनाच ज्याचें प्रतिपादन करितां येतें, अशा तुला मी नमस्कार करितों. केवळ स्वानुभवानेच ज्याचें ज्ञान होऊं शकतें, अशा आत्मस्वरूपा ! मी तुझा जयजयकार करितों. १ देवा, सर्वाच्या अर्थग्रहणशक्तीचा प्रकाश जो गणेश, तो तूंच आहेस, असें हा श्रीनिवृत्ति- नाथांचा नम्र शिष्य प्रतिपादित आहे, तें सावधपणे ऐकावें. २ हें संपूर्ण वाङ्मय तुझी मनोहर मूर्ति असून, तिचे अक्षररूप शरीर निर्दोषपणे झळकत आहे. ३ स्मृति हेच ( या मूर्तीचे ) अवयव, काव्य- पंक्ति हेच त्या अवयवांचे हावभाव, आणि अर्थसौंदर्य हीच लावण्याची ढब होय. ४ अठरा पुराणे हे रत्नजडित अलंकार होत, आणि तत्त्वसिद्धान्त हीं रत्ने असून, शब्दांची जडण हीं रत्नाचीं कोंदणं झाली आहेत. ५ सभ्य व सुंदर काव्यप्रबंध हेंच रंगीबेरंगी वस्त्र होय, आणि या वस्त्राचें साहित्य- रूपी सणंग मोठें पल्लेदार व तकतकीत आहे. ६ आणखी पहा, कीं, या काव्यनाटकांची रसिकपणें योजना केली, तर त्यांचे घुंगूर होतात व ते अर्थरूपी ध्वनीची रुणझुण सुरू करितात. ७ आणि ( या काव्यनाटकांतील ) तत्त्वसिद्धान्तांची मोठ्या चाणाक्षपणानें छाननी केली, तर त्यांत जीं मार्मिक पदे आढळतात, तीच (घुंगुरांवरची ) रत्ने होत. ८ आणि व्यासादिक कवींचा जो प्रतिभागुण, तोच १ ऐकावें. २ शब्दात्मक विश्व, वेव, ३ तब. ४ कोंदणे. ५ रंगीत ६ वस्त्र, ७ माल, जिन्नस, रंग, वर्ग.