पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २६१ बोधु जाये । जे स्वप्न पडिजे ॥ ९५ ॥ म्हणोनि ये निद्रेची वाट मोडे । निखिळ उद्घोधाचेंचि आपण घडे । ऐसें वर्म जें आहे फुडें । तें दावों आतां ॥ ९६ ॥ तरी धनुर्धरा धैर्या । निकें अवधान देई बा धनंजया । पैं सर्व भूतांतें माया । करी हरी गा ॥ ९७ ॥ सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् । कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥७॥ सम० - द्रष्टा रज्जूचि मी माया माझी दृष्टी निजे लयीं । तींत लीन जगत्सर्प मी कल्पादींस जो सृजीं ॥ ७ ॥ आर्या- कल्पारंभीं भूतें करितों निर्माण मीच निष्पापा । कल्पक्षर्थी पुन्हा तीं येती प्रकृतींत माझिया बापा ॥ ७ ॥ ओवी - सर्व भूर्ते अर्जुन । प्रकृति पावती जाण । कल्पांतीं सांठवून । कल्पादीं सृजीं मी ॥ ७ ॥ जिये नांव गा प्रकृति | जे द्विविध सांगितली तुजप्रती । एकी अष्टधा भेदव्यक्ति । दुजी जीवरूपा ॥ ९८ ॥ हा प्रकृतिविखो आघवा । तुवां मागां परिसिलासे पांडवा । म्हणोनि असो काइ सांगावा | पुढतपुढती ॥ ९९ ॥ तरी ये माझिये प्रकृती | महाकल्पाच्या अंतीं । सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासि येती ॥ १०० ॥ ग्रीष्माच्या अतिरसीं । सवीजें तृणें जैसीं । मागुती भूमीसी । सुलीनें होती ॥ १ ॥ कां वार्षिये दें ढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे । तेव्हां घनजात आटे । गगनींचें गगनीं ॥ २ ॥ ना तरी आकाशाचे खोंपे । वायु निवांतुचि लोपे । कां तरंगता हारपे । जळीं जेवीं ॥ ३ ॥ अथवा जागिनलिये वेळे । स्वप्न मनींचें मनीं मावळे | तैसें प्राकृत प्रकृतीं मिळे । स्वप्नस्थितींत पडशील. ९५ म्हणून, या अविद्याझोपेचा पायरव अजिबात नाहींसा होईल, आणि आत्मज्ञानाची जागृति निरंतर राहील, असें जें रहस्यज्ञान तें आम्ही आतां तुला स्पष्ट दाखविणार आहों. ९६ म्हणून हे धनुर्धरा पार्था, धैर्याने माझ्या बोलण्याकडे चित्त दे. अरे, प्रकृतिमाया हीच भूतमात्राला घडते व मोडते. ९७ जिला 'प्रकृति' म्हणतात आणि जिचे दोन प्रकार तुला मागें सांगितले आहेत, पैकीं पहिली 'अपरा प्रकृति' आठ भिन्न स्वरूपांनी व्यक्त होते, तर दुसरी 'परा प्रकृति' ही जीवरूपानें व्यक्त होते. ९८ हा ' प्रकृतीचा ' विचार तुला एकदां मागें ऐकविला आहे; तेव्हां तो पुन्हां पुन्हां सांगण्यांत काय अर्थ आहे ? ९९ एकंदरीत महाप्रलयाच्या वेळीं या माझ्या प्रकृतींतच निराकार अभेदानें सर्व भूतमात्र एकरूपानं विलीन होते. १०० उन्हाळ्याच्या ऐन कडाक्यांत बीजासह गवतें भूमीमध्यें पूर्ण लय पावतात, १ किंवा, पावसाळ्यांतील मेघांचे घोळके नाहींसे होऊन, जेव्हां शरहतूचा निर्मळ शांततेचा गुप्त ठेवा उघडा होतो, तेव्हां सर्व मेघमात्र आकाशांतल्या आकाशांत विरघळून जातें; २ किंवा, आकाशाच्या गाभान्यांत वारा निवांत होऊन लय पावतो, अथवा पाण्यांत तरंग लुप्त होतो; ३ किंवा जागृतीचे काहीं स्वप्नांतील देखावे मनांतल्या मनांतच मावळतात; त्याप्रमाणे कल्पांतसमयीं सर्व प्रकृतिजन्य, म्हणजे मायेनें भासमान होणारें भूतमात्र प्रकृतींत समरसून जाते. ४ मग नव्या १ अध्याय ७, श्लोक ४-५ २ मायेचा वृत्तांत ३ पुन्हा पुन्हां. ४ ढगांचे ढीग. ५ गुप्त ठेवा. ६ मायेने केलेलें भूतमात्र.