पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६० सार्थ श्रीज्ञानेश्वरी आमुचा ऐश्वर्ययो । तुवां देखिला कीं चांगु । आतां सांगें कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे ॥ ८७ ॥ यालागी मजपासूनि भूतें । आनं नव्हती हें निरुतें । आणि भूतांवेगळिया मातें । कंहींच न मनीं हो ॥ ८८ ॥ यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् । तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६ ॥ सम०—नभींच सर्वत्र वायु कळे मोठा नभींच तो । आत्मयांत तसे सर्व मान तूं स्मृत अस्मृत ॥ ६ ॥ आर्य – जैसा सर्वग वायू गगनाधारें असे जगत्प्राण । तैसें माझे ठायीं सर्वहि भूर्ते अर्से बर्रे जाण ॥ ६ ॥ - ओवी - वायु सर्वांचे ठायीं । अव्यक्त मूर्ति पाहीं । भूत सर्व माझे ठायीं । वायूचपरी ॥ ६ ॥ पैं गगन जेवढें जैसें । पवनुहि गगनीं तेवढाच असे । सहजें हालविलिया वेगळा दिसे । एन्हवीं गगन तेंचि तो ॥ ८९ ॥ तैसें भूतजात माझ्या ठायीं । कल्पिजे तरी आभासे कांहीं । निर्विकल्पी तरि नाहीं । तेथ मीचि मी आघवें ॥ ९० ॥ म्हणऊनि नाहीं आणि असे । हैं कल्पनेचेनि सौरसें । जें कल्पनालोप भ्रंशे । आणि कल्पनेसवें होय ॥ ९१ ॥ तेंचि कल्पितें मुद्दल जाय । तैं असे नाहीं हैं कें आहे । म्हणऊनि पुढती तूं पाहें | हा ऐश्वर्ययोगु ||१२|| ऐसिया प्रतीतिबोधसागरीं । तूं आपणेयातें कल्लोळु एक करीं । मग जंव पाहासी चराचरीं । तंव तूंचि आहासी ॥ ९३ ॥ या जाणणेयाचा चेवो । तुज आला ना म्हणती देवो । तरी आतां द्वैतस्वन बांवो । जालें कीं ना ॥ ९४ ॥ तरी पुढती जरी विपयें । बुद्धीसि कल्पनेची झोंप ये | तरी अभेद- या तत्त्वविचारपद्धतीला ' ऐश्वर्ययोग ' हें नांव आहे. हा तुला नीट समजला ना? आतां सांग पाहूं, येथे भेदभावाला कोठें तरी तिळमात्र जागा आहे का ? ८७ म्हणून, भूतमात्र माझ्याहून भिन्न नाहीं, हा सिद्धांत खरा; आणि मला भूतांपासून वेगळा असा तूं कधींच समजूं नकोस. ८८ अरे, आकाशाचा जेवढा विस्तार आहे, तितकाच विस्तार वाऱ्याचाही आहे, आणि पवनाला पंख्याने वगैरे हालविल्यास त्याचें वेगळेपण भासतें, नाहीं तर तो गगनाशीं एकरूपच असतो. ८९ तसे, कल्पना केली तर भूतमात्र माझ्या ठिकाणीं भासमान होते; नाहींतर, निर्विकल्प स्थितींत, हे भूतमात्र नाहींसें होऊन मीच एकटा अविकृत उरतों. ९० म्हणून 'नाहीं ' आणि ' आहे' हें सर्व कल्पनेचं कसब ! कल्पना लोपली म्हणजे नामरूपात्मक विश्व नाहीं, आणि कल्पना संचारली म्हणजे हे सर्व कांहीं आहे. ९१ पण हें मूळांतच कल्पनेचं भांडवल बेंचलें, मग ' असे -नसे ' या भाषेला आधारच कोठें राहातो ? म्हणून हा 'ऐश्वर्ययोग' पुन्हां नीट समजावून घे. ९२ या परमज्ञानाच्या समुद्रांत तूं तरंगाकार हो, आणि मग तूं पाहूं लागलास म्हणजे तूंच हें सर्व चराचर आहेस, असें तुझ्या दृष्टीस पडेल. " ९३ श्रीकृष्ण म्हणतात, 'अर्जुना, या परमज्ञानानें तूं जागा झालास ना ? आतां या जागेपणानें द्वैताचे स्वप्न संपून नाहींसें झालें ना ? ९४ आतां, पुन्हां एखाद्या वेळेस बुद्धीस कल्पनेची गुंगी आली, तर हें अभेदज्ञान मावळेल, कारण तूं मग १ कसबानें, बळाने २ मूळचें भांडवल ३ पुन्हां. ४ जागृति, ५ व्यर्थ, मिथ्या. ६ यदा कदाचित्,