पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २५९ होउनि घडे । तरी तयाचें सोनेंपण न मोडे । येर अळंकार हे वरेचिलीकडे | लेतयाचेनि भावें ॥ ७७ ॥ सांगें पडिसादाचीं प्रत्युत्तरें । कां आरिसां जें आविष्करे । तें आपुलें कीं साचोकारें । तेथेंचि होतें ॥ ७८ ॥ तैसिये निर्मळ माझ्या स्वरूपीं । जो भूतभावना आरोपी । तयासि तयाच्या संकल्प । भूताभासु असे ।। ७९ ।। तेचि कैल्पिती प्रकृती पुरे । तरि भूताभासु आधींच सरे । मग स्वरूप उरे एकसरें । निखळ माझें ॥ ८० ॥ हें असो आंगीं भरलिया भवंडी । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी । तैशीं आपलिया कल्पना अखंडी । गमती भूतें ॥ ८१ ॥ तेोच कल्पना सांडूनि पाहीं । तरि मी भूतीं भूतें माझिया ठायीं । हें स्वमींही परि नाहीं । कल्पावयाजोगें ॥ ८२॥ आतां मीच एक भूतां धर्ता | अथवा भूतांमाजी मी असता । या संकल्पसन्निपाता । आंतुलिया बोलिया ॥ ८३ ॥ म्हणोनि परियेसीं गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्वेंसीं विश्वात्मा । जो इया लटकिया भूतग्रामा । भाग्य सदां ॥ ८४ ॥ रश्मीचेनि आँधारें जैसें । नव्हे तेंचि मृगजळ आभासे । माझ्या ठायीं भूतजात तैसें । आणि मातेंही भावी ॥ ८५ ॥ मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु । जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥ ८६ ॥ हा ८१ झाला तरी त्याचें सोनेंपण मोडत नाहीं; त्यांच्या ठिकाणीं बाह्यतः अलंकारपण येतें, तें केवळ अलंकार वापरणाराच्याच दृष्टीनें नव्हे काय ? ७७ प्रतिध्वनि जें उत्तर देतो किंवा आरसा जें दाखवतो, तें आपलेच असतें कीं खरोखर त्या प्रतिध्वनीच्या किंवा आरशाच्या अंगचें असतें, सांग पाहू ? ७८ त्याप्रमाणे माझ्या मूळच्या अविकृत शुद्ध स्वरूपावर जो भूतसृष्टीचा आरोप करतो, त्याच्याच संकल्पांत ती भूतसृमि असते. ७९ तीच कल्पना करणारी माया संपली, तर भूताभास मूळचाच मिथ्या असल्यामुळें माझें निव्वळ, शुद्धबुद्ध, अविकृत, स्वरूपमात्र एकटेच उरतें. ८० असो; आपल्याला भोवळ आली म्हणजे ज्याप्रमाणें डोंगर व दरडी गरगर फिरतात असे भासतें, त्याप्रमाणें आपल्याच कल्पनेनें अखंड विकारहीन परब्रह्माचे ठिकाणीं भूतमात्राचा आभास होतो. पण तीच कल्पना बाजूस टाकून दिली, म्हणजे 'मी भूतमात्रांत आहें, आणि भूतमात्र माझ्याठायीं आहे, ' ही गोष्ट स्वप्नांतही खरी मानण्याजोगी नाहीं, असे दिसून येते. ८२ म्हणून, 'मीच एक या भूतमात्राला धारण करतों, किंवा ' मी या भूतमात्राचे ठायीं राहात असतां, ' या सर्व बोली म्हणजे संकल्पवाताच्या भ्रमिष्ठ स्थितीतील बडबड होय. ८३ म्हणून, परम सख्या अर्जुना, ध्यानीं, घे कीं, मला विश्व मानणें किंवा विश्वात्मा मानणं, ही सर्व या लटक्या भूतमात्राची लटकी कल्पना आहे. ८४ जसें सूर्यकिरणामुळे नसतंच मृगजळ भासमान होते, तसे भूतमात्र माझ्याठायीं भासमान होते, इतकेंच नव्हे, तर मलाही आपल्यामध्यें तें भासमान करवतें ! ८५ याप्रमाणें मी 'भूतभावन' म्हणजे भूताभासाला आधार आहे, पण, प्रभा आणि सूर्य हीं जशीं एकच, तसा मी सर्व भूतमात्राशीं एकरूपच आहे. ८६ १ बाह्यतः २ दाखवितो. ३ कल्पना करणारी, ४ लोपते. ५ एकटे ६ कल्पित ७ सूर्यकिरणामुळे. ८ नसतें, खोदेंच. ,