पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी नाहीं । इया उपपत्ति तुज पाहीं । सांगितलिया मागां ।। ६९ ।। म्हणऊनि बोलिलिया बोलाचा अतिसो । न कीजे यालागीं हें असो । परि मजआंत पैसो । दिठी तुझी ॥ ७० ॥ न च मत्स्थानि भूतानि पश्य में योगमैश्वरम् । भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ ५ ॥ सम० - तीं हीं न मज रज्जूंत पाहे हे युक्ति ऐश्वरी । भूर्ती नसोनि धरितों कीं माझी बुद्धि कल्पिते ॥ ५ ॥ आर्या - मजमाजिं न भूतें हीं माझा ऐश्वर्यं योग बा पाहा । भूतकर भूतभावन माझा आत्मा जगीं न बापा हा ॥५॥ ओवी - माझे ठार्थी न राहती भूतें । माझें ऐश्वर्य तें निरुतें । भूतांतें मी घरीं आरुतें । भूतांवेगळा असोनि ॥ ५ ॥ आमुचा प्रकृतीपैलीकडील भावो । जरी कल्पनेवीण लागसी पाहों । तरी मजमाजीं भूतें हेंही वावो । जे मी सर्व म्हणउनी ॥ ७१ ॥ ए-हवीं संकल्पाचिये सांजवेळे । नीवेक तिमिरेजेती बुद्धीचे डोळे । म्हणोनि अखंडितचि परि झांवळें । भूतभिन्न ऐसें देखे ॥ ७२ ॥ तेचि संकल्पाची सांज जें लोपे । तैं अखंडितचि आहे स्वरूपें । जैसे शंका जांत वो लोपे । सापपण माळेचें ॥ ७३ ॥ एन्हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ | काय घडेयागाडगेयांचे निघती कोंभ । परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले कीं ॥ ७४ ॥ ना तरी सागरींच्या पाणी । काय तरंगांचिया आहाती खाणी । ते अवांतर करणी | वारयाची नव्हे ॥ ७५ ॥ पाहें पां कापसाच्या पोटीं । काय कापडाची होती M पेटी । तो वेदितयांचिया दिठी । कापड जाहला ॥ ७६ ॥ जरी सोनें लेणें बसत नसतो. हा तत्त्वविचार मीं यापूर्वी तुला एकदा सांगितलाच आहे. ६९ तेव्हां एकदां सांगितलेल्याचा पुन्हां विस्तार करणें योग्य नाहीं, म्हणून हे इतकेंच पुरे. परंतु तुझी दृष्टि माझ्या स्वरूपांत प्रवेशून विस्तारली पाहिजे. ७० महामायेच्यापलीकडे असणाऱ्या माझ्या स्वरूपाचा, कार्यकारणकल्पना टाळून, जर तूं विचार करूं लागलास, तर हीं भूतें माझ्या ठायीं आहेत, हा सिद्धांतही मिथ्या ठरेल, कारण सर्व कांहीं मीच आहें, मजहून भिन्न असें दुसरें कांहींच नाहीं. ७१ परंतु परब्रह्माच्या ठिकाणी प्रथम संकल्पानें जेव्हां ज्ञानाज्ञानाचा अंधुक संधिकाळ उत्पन्न झाला, तेव्हां बुद्धीचे ज्ञानचक्षु अंधाराने कांहीं से व्याप्त झाले, म्हणून परब्रह्म वस्तु विकाररहित व आकारहीन असतांही त्या अविद्यारूपी सांजवेळेनें हें भूतमात्र परब्रह्माहून भिन्न भासूं लागलें. ७२ पण तीच संकल्पजन्य अविद्येची सांजवेळ संपली, म्हणजे, ज्याप्रमाणे शंका दूर होतांक्षणींच पुष्पमाळेवरील अर्धवट प्रकाशांत उत्पन्न झालेला सर्पाभास नाहींसा होतो, त्याप्रमाणें भूतमात्राचा भास लोपून एकटें परब्रह्मच आपल्या अखंड, अविष्कृत, व शुद्ध, स्वरूपाने राहाते. ७३ खरं पाहिलें तर जमिनींतून गाडग्यांमडक्यांचे कोंब बाहेर पडतात का ? कुंभाराच्या कल्पनागर्भातून हीं गाडगींमडकीं उत्पन्न होतात, असंच नव्हे काय ? ७४ अथवा समुद्राच्या पाण्यांत लाटांच्या खाणी असतात का ? लाटा उत्पन्न करणें ही त्या वाऱ्याचीच स्वतंत्र करणी नव्हे काय ? ७५ तसेच कापसाच्या गाभ्यांत कापडाची पेटी होती का ? त्यास परिधान करणान्याच्या इर्ष्टीनंच कापूस कापड बनतो, असेंच नव्हे काय ? ७६ जरी सोन्याचा अलंकार १ कांहींसे, अंशतः २ अंधाराने व्यापतात. ३ जातांक्षणीच ४ निराळी ५ नेसणाराच्या.