पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २५७ हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु । कीं भ्रांतासी कामु । विषयावरी ॥ ६० ॥ बहु मृगजळ देखोनि डोळां । थुकिजे अमृताचा गिळितां गळाळा । तोडिला परिमु बांधिला गळां । शुक्तिकाला ॥ ६१ ॥ तैसी अहंममतेचिये लवडसवडी । मातें न पवतीचि वापुडीं । म्हणोनि जन्ममरणाचे दुथडीं । हुळितें ठेलीं ॥ ६२ ॥ एन्हवीं मी तरी कैसा । मुखाप्रति भानु कां जैसा । कहीं दिसे न दिसे ऐसा । वाणीचा नोहें ॥ ६३ ॥ . मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥ ४ ॥ सम० - हा विश्वसर्प म्यां दोरें व्यापिला स्वअमूर्तिनं । सर्व भूतें मजमधे त्या सप दोर मी नसें ॥ ४ ॥ आर्या - अव्यक्तमूर्तिनं म्यां व्यापियलें नित्य जाण सर्व जगा । भूतें माझ्या ठायीं भूतांमाजीं न तूं पहा मज गा ॥ ४ ॥ ओंबी—मी सर्व जगाचे ठायीं । व्यापक सर्व भूर्ती पाहीं । सर्व भूतें माझे ठायीं । मज आश्रयो नसे ॥ ४ ॥ माझेया विस्तारलेपणाचेनि नांवें । हें जगचि नोहे आघवें । जैसे दूध मुरालें स्वभावें । तरि तेंचि दहीं ॥ ६४ ॥ कां वीजचि जाहलें तरु | अथवा भांगारचि अळंकारु | तैसा मज एकाचा विस्तारु । तें हें जग ॥ ६५ ॥ हें अव्यक्तपण थिजलें । तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें । तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें । त्रैलोक्य जाणें ।। ६६ ।। महदादि देहांतें । इयें अशेपेंही भूतें । पैं माझ्याठायीं विंवतें । जैसें जळीं फेण ॥ ६७ ॥ परि तया फेणांआंतु पाहतां । जेवीं जळ न दिसे पांडुसुता । ना तरी स्वप्नींची अनेकता । चेइलिया नोहिजे ॥ ६८ ॥ तैसीं भूतें इयें माझ्या ठायीं । विवती तयांमाजी मी सर्व सुखाचा ठेवा असा मी आत्माराम प्रत्यक्ष असतां, मायामोहित पुरुषांची वासना विषयभोगाकडे ओढ घेते, ६० अपार मृगजळ पाहून, तोंडांतला अमृताचा घोट थुंकून टाकावा, अथवा परीस तोडून टाकावा आणि शिंपी गळ्यांत बांधावी, ६१ त्याप्रमाणे अहंममतेच्या गडबडीत हे विचारे हे जीव माझ्यापर्यंत येऊन पोचत नाहींत, म्हणून जन्ममरणाच्या दोन थडीला डळमळत बसतात. ६२ नाहीं तर मी कसा आहे, तर अगदी डोळ्यांपुढे आहे; जसा सूर्य कधीं दिसतो तर कधीं मेघपटलानें किंवा रात्रिसमयाने दिसत नाहीं, तसा मी नव्हें; तर निरंतर तेवणारा व निर्मळ आहे. ६३ माझ्या विस्ताराची गोष्ट म्हटली, तर हे सर्व जग म्हणजे मीच असें नव्हे काय ? जसें दूध आपल्या स्वभावानुसार बिरजलें म्हणजे तेंच दहीं होते, ६४ किंवा, बीजच तरुरूपाने प्रकट होतें, अथवा जसें सोनेच अलंकाररूप बनतें, तद्वत् माझ्या एकाचाच विस्तार म्हणजे हें जग होय. ६५ माझें निराकार तत्त्व थिजून, नामरूपात्मक विश्वाकारांत ओतलें गेलें, आणि तत्काळ अमूर्त अशा मींच हा त्रिलोकीचा विस्तार विस्तारला. ६६ जसा पाण्यांत फेंस व्यक्तरूपानें भासमान होतो, तसे महत्तत्त्वादि नामरूपात्मक भूतजात माझ्या ठायीं भासमान होते. ६७ परंतु त्या फेसाच्या आंत पाहिले तर जसे पाणी दिसत नाहीं, किंवा स्वनस्थितींतील भासणारे नाना आकार जागृतींत दिसत नाहींत, ६८ तशीं जरी हीं भूतं माझ्या ठिकाणीं भासमान होतात, तरी त्या भूतांमध्ये मी १ विरजले २ सोने, ३३