पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी सोपारें । वरि परब्रह्म ॥ ५१ ॥ पैं गा आणिकही एक याचें । जें हाता आलिया तरी न वचे । आणि अनुभवितां कांहीं न बेचे । वरि विटेहि ना ॥ ५२ ॥ येथ जरी तूं तार्किका । ऐसी हन घेसी शंका | ना येवढी वस्तु हे लोकां । उरली केविं पां ॥ ५३ ॥ जे एकोत्तरेयाचिया वाढी । जळतिये आगी घालिती उडी । ते अनायासें स्वगोडी । सांडिती केवीं ॥ ५४ ॥ तरि पवित्र आणि रम्य । तेवींचि सुखोपाय गम्य । आणि स्वसुख परम धर्म्य । वरि आपणां जोडे ।। ५५ ।। ऐसा अवघाचि हा सुरवाड आहे । तरी जनाहातीं विं उरों लाहे । हा शंकेचा ठाव कीर होये । परि न धरावी तुवां ॥ ५६ ॥ अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परंतप । अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ३ ॥ सम० - ज्ञानी रिघोनिही श्रद्धा या धर्माची न ज्या नरां । मातें न पावतां मार्गी निघाले जन्ममृत्युच्या ॥ ३ ॥ आर्या-पुरुष श्रद्धाविरहित न भजति जे धर्ममार्ग कंसारी। जो मी या मज न पउनि फिरती ते मृत्युव संसारीं ॥३॥ ओवी - या धर्मी श्रद्धा नाहीं । तो मज न पावे कांहीं । जन्मसंसारीं वर्ते पाहीं । जीवरूपें ॥ ३ ॥ पाहें पां दध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड | परि तें अव्हेरून गोचिड | अशुद्ध काय न सेविती ॥ ५७ ॥ कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणूक एकेचि घरीं । परि परागु सेविजे भ्रमरी । येरां चिखलुचि उरे ॥ ५८ ॥ ना तरी निदैवाच्या परिवरीं । लोह्यां रुतलिया आहाति सहस्रवरी । परि तेथ बसोनि उपवास करी । कां दरिद्रे जिये ॥ ५९ ॥ तैसा 1 प्रत्यक्ष परब्रह्म आहे; ५१ खेरीज ज्या ज्ञानाचें एक विशेष लक्षण असें आहे, कीं तें एकदां हस्तगत झाले म्हणजे केव्हांही हरवत नाहीं किंवा त्याची गोडी कमी होत नाहीं. ५२ आतां, अर्जुना, कदाचित् तूं आपला तर्क चालवून, अशी शंका घेशील, कीं, ही जर एवढी अप्रतिम, अमोल, वस्तू असेल, तर ती आजपर्यंत लोकांच्या हातून सुटली तरी कशी ? ५३ जे लोक आपल्या द्रव्याची एकोन्याने वाढ करण्यासाठीं जळत्या आगींतही उडी घालण्याचें साहस करतील, ते आयासावांचून प्राप्त होणाऱ्या या आत्मसुखाच्या गोडीला कां बरें गमावतील ? ५४ मग, जें पवित्र, रम्य, व सुखलभ्य, असें आत्मसुख असून, शिवाय जें धर्मानुकूल असून आत्मतत्त्वाची प्राप्ति करून देते, ५५ असे सर्व प्रकारें ज्यांत सुख सांचून राहिलें आहे, तें लोकांनी हातचें दवडलें तरी कसें असेल ! अशा रीतीची शंका उद्भवणं अगदीं साहजिक आहे. परंतु तूं या शंकेला स्थान देऊं नयेस. ५६ अरे, असे पहा, दूध हें फार पवित्र व स्वादिष्ट असतें; आणि तें गाईच्या ओटींत पातळ त्वचेच्या पदराआड जवळच सांठवलेलें असतें; परंतु त्याला टाळून, ओटीस लागलेले गोचीड रक्ताचं सेवन करीत नाहींत काय ? ५७ किंवा, कमळाचे कांदे आणि बेडूक हे एकाच ठिकाणीं नांदत असतात; परंतु कमलपरागांचा फराळ भ्रमर करतात, आणि बेडकांच्या वांट्यास चिखलच येतो. ५८ किंवा, एकाद्या दुर्दैवी माणसाच्या घरांत हजारों मोहरांनी भरलेल्या कढया पुरून ठेवलेल्या असतात, पण तो त्याच घरांत राहून उपासमार सोसतो किंवा अत्यंत दरिद्रावस्थेत आयुष्य कंठतो ५९ त्याप्रमाणेंच अंतरंगामध्यें १ शंकेखोर, २ घरांत ३ मोहरांनी भरलेल्या कढया.