पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २५५ तेंचि ऐसेनि निवाडें । जैसें भेसळलें खरें कुडें । मग काढिजे फाडोवाडें । पारखूनियां ॥ ४३ ॥ कां चांचूचेनि सांडसें । खांडिजे पय पाणी राजहंसें | तुज ज्ञान विज्ञान तैसें । वांहूनि देऊं ॥ ४४ ॥ मग वारयाचिया धारसा । पडिन्नला कोंडा कां नुरेचि जैसा । आणि कणांचा पैसा । राशिवा जोडे ॥ ४५ ॥ तैसें जें जोणितलेयासाठीं । संसार संसाराचिये गांठी । लाऊन बैसवी पोटीं । मोक्षश्रियेच्या ॥ ४६ ॥ राजविद्याराजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २ ॥ सम० - विद्या गुह्यांत हें राजा धर्म्य पावन उत्तम । प्रत्यक्षीं ये अनुभवा नित्य जें सुखसाध्य जें ॥ २ ॥ आर्या-उत्तम साक्षात्कारी धर्म्यहि अणि पूत राजविद्येचें । जें राजगुह्य उत्तम शक्य कराया रिपू अविद्येचें ॥ २ ॥ ओवी - राजविद्या जाण । उत्तम तें पवित्रपण । हें प्रत्यक्ष धर्म जाण । सुख देतसे नाशरहित ॥ २ ॥ जें जाणणेया विद्यांच्या गांवीं । गुरुत्वाची आचार्यपदवी । जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ॥ ४७ ॥ आणि धर्माचें निजधाम । तेविंचि उत्तमाचें उत्तम । पैं जया येतां नाहीं काम | जन्मांतराचें ॥ ४८ ॥ मोटैकें गुरुमुखें उदैत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावों लागे तैसें । आँपसयाचि ।। ४९ ।। तेवींचि गा सुखाच्या पाउटीं । चढतां येईजे जयाच्या भेटी । मग भेटल्या कीर मिठी । भोगणे याहि पडे ॥ ५० ॥ परि भोगाचिये ऐलीकडिलिये मेरे । चित्त उभे ठेलें सुखा भरे । ऐसें सुलभ आणि तुला कंटाळवाणें झालें असेल, म्हणून विज्ञानासह ज्ञान तुला उघड सांगतों. ४२ खरी खोटी नाणीं एकत्र भेसळलीं असतां जशी त्यांची निरनिराळे फाडे लावून निवड करण्यांत येते, त्याचप्रमाणें ज्ञान आणि विज्ञान हीं मी निरनिराळीं पारखणार आहे. ४३ किंवा चोंचीच्या चिमट्यानें जसा राजहंस पाणी व दूध निरनिराळीं करतो त्याप्रमाणें ज्ञान व विज्ञान हीं वेगळीं करून तुला दाखवू. ४४ मग ज्याप्रमाणे वाऱ्याच्या सोसाट्यांत सांपडलेला तूस ठरत नाहीं, आणि निव्वळ धान्यकणाचीच तेवढी रास मागें राहते, ४५ त्याप्रमाणं ज्ञान व विज्ञान यांची समजूतदारपणें निवडानिवड झाली म्हणजे जन्ममरणाचा संसार या नामरूपात्मक संसाराशीं गांठला जातो, आणि तें परम ज्ञान आपल्यास अक्षय मोक्षपदाच्या पीठावर नेऊन वसवितें. ४६ जें ज्ञान सर्व विद्यांमध्यें महाश्रेष्ठ आचार्य पदवीला चढलें आहे, जें सर्व रहस्यज्ञानाचे स्वामित्व भोगतें, जें सर्व पवित्रांमध्ये धुरंधर आहे; ४७ त्याप्रमाणेच जें ज्ञान धर्माचें माहेरघर आहे, आणि जें सर्वोत्तम असून ज्याचा लाभ घडला असतां, जन्ममरणाला जागाच राहात नाहीं; ४८ जें ज्ञान गुरुमुखानें किंचित् उदय पावल्यासारखें वाटतें, परंतु वस्तुतः जें ज्याच्या त्याच्या अंतरंगांत स्वयंभूच असतें, आणि त्यास पाहिजे तसें आपसूकच लाभू शकते; ४९ शिवाय आत्मसुखाच्या पायरीवर चढतांच ज्या ज्ञानाची गांठ पडते, आणि मग तत्काळ भोक्ता, भोग्य, व भोग ही त्रिपुटी मावळल्यामुळे, भोगणाराचें भोक्तृत्वही त्याच्यांतच लय पावून जातें ५० परंतु या लयस्थितीच्या अलीकडील मेरेवरही अंतरंग परम सुखानें भरून जातें, असें जें ज्ञान सुलभ व साधें असूनही १ ज्ञान विज्ञान समजल्याने, २ पाठावर, आसनावर. ३ घोडे, किंचित्. ४ भोगणेपणाला.