पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी श्रीभगवानुवाच- इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १ ॥ सम० - हें तों गुह्याहुनी गुह्य सांगतों तुज सज्जना । विज्ञानासहित ज्ञान ज्या ज्ञान मोक्ष पावसी ॥ १ ॥ आर्या - विज्ञानज्ञानसहित कथितों तुज गुह्य ऐकुनी बाधा । ईर्ष्याविरहित ज्यात जाणुनि न पवसि कदा अशुभबाधा ॥१॥ ओवी - अर्जुनासी म्हणे कृष्ण । हें गुह्य असे परम पावनं । तूं भक्त माझा म्हणोन । सांगेन ज्ञान विज्ञानसहित ॥ १ ॥ ना तरि अर्जुना है वीज | पुढती सांगिजेल तुज । जें हें अंतःकरणींचें गुज | जीवाचिये ॥ ३४ ॥ येणें मानें जीवाचें हियें फोडावें । मग गुज कां पां मज सांगावें । ऐसें कांहीं स्वभावें । कल्पिशी जरी ॥ ३५ ॥ तरी परियेसीं गा प्राज्ञा । तूं आस्थेचीचि संज्ञा । बोलि लिये गोष्टीची अवज्ञा । नेणसी करूं ॥ ३६ ॥ म्हणोनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलणेंहि बोलावें घडो । परि आमुचिये जीवींचें पडो | तुझ्या जीवीं ॥ ३७ ॥ अगा थानीं कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे कीं गोड । म्हणोनि सरो कां सेवितयाची चाड । जरी अनन्य मिळे ॥ ३८ ॥ मुडाहून बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमी पेरिलें । तरि तें सांडीविखुरी गेलें । म्हणों ये काइ ॥ ३९ ॥ यालागीं सुमन आणि शुद्धमति । जो अनिंदकु अनन्य- गति । पैं गा गौप्यही परी तयाप्रती । चाळविजे सुखें ॥ ४० ॥ तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं । तूंवांचून आणिक नाहीं । म्हणोनि गुज तरी तुझ्या ठायीं । लपवूं नये ॥ ४१ ॥ आतां किती नावानावा गूज | म्हणतां कानडें वाटेल तुज | तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसीं ॥ ४२ ॥ परि अर्जुना, माझ्या अंतःकरणाच्या अगदीं आंतल्या कप्यांतलें हें सर्व ज्ञानाचें आदिकारण असें गुप्त रहस्य तुला पुन्हां सांगण्यांत येत आहे. ३४ आतां तुझ्या मनांत जर असें आलें, कीं, अंतःकरणाचे गुप्त दार अशा प्रकारें फोडून रहस्य उघडें करण्यासारखा प्रसंग तरी कोणता उपस्थित झाला आहे ? ३५ तर, सुज्ञ अर्जुना, मी सांगतों तें श्रवण कर. तूं भक्तिभावनेचा प्रत्यक्ष अवतारच आहेस. आम्ही सांगूं त्या गोष्टीची कधींही हेळसांड करणार नाहींस. ३६ म्हणून मनाचें गूढपण मोडलें तर मोडो, आणि न बोलण्यासारखेही बोलणें घडलें तरी घडो, पण आमच्या अंतःकरणांत जें आहे, तें तुझ्या अंतःकरणांत एकदाचें उतरो, असें मला झालें आहे. ३७ अरे, स्तनामध्यें दूध दडलेलें असतें, पण तें स्तनाला गोड वाटत नाहीं, म्हणून एकनिष्ठ जीव मिळाला म्हणजे त्याची रससेवन करण्याची इच्छा तृप्त होवो, असें सहजच वाटते. ३८ धान्याच्या मुड्यांतून काढले आणि तें रावभुजावळ करून कमावलेल्या जमिनींत मुठीवरी फेंकलें, तर तें फुकट दवडलें असें म्हणतां येईल काय ? ३९ यासाठीं ज्याचें मन चांगलें आहे आणि बुद्धि स्वच्छ आहे, तसाच जो अनिंदक व एकनिष्ठ आहे, त्याला आपल्या जीवींचें गूज खुशाल सांगावें. ४० आणि प्रस्तुत प्रसंगी या गुणांनी युक्त असा तुझ्यावांचून दुसरा कोणी दिसत नाहीं, म्हणून तुझ्यापासून कोणतेही रहस्य लपविणें योग्य होणार नाहीं. ४१ आतां वारंवार ' गूज, गूज' हा शब्द ऐकून १ पुन्हां