पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २५३ सिद्धि मती पिके । ए-हवीं कोंभेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥ २५॥ सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं । २६ || अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावोचि अभिप्रायातें विये । भावाचा फुलोरा होत जाये । मतीवरी ॥ २७ ॥ म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तन्ही हृदयाकाश सारस्वतें वोळे । आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे | मांडला रसु ॥ २८ ॥ अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये परि ते हातवटी चंद्रीं कीं आहे । म्हणऊनि वक्ता तो वक्ता नोहे । श्रोतेनिविण ॥ २९ ॥ परी आतां आमुतें गोड करावें । ऐसें तांदुळीं कासया विनवावें । साईखडियानें काइ प्रार्थीवें । सूत्रधारातें ॥ ३० ॥ तो काय वालियांचिया काजा नाचवी । कीं आपुलिये जाणिवेची कळा वाढवी । म्हणऊनि आम्हां या ठेवाठेवी | काय काज ॥ ३१ ॥ तंव श्रीगुरु म्हणती का जाहलें । हें समस्तही आम्हां पावलें । आतां सांगें जें निरोपिलें | श्रीकृष्णदेवें ।। ३२ ।। येथ संतोपोनि निवृत्तिदा । जी जी म्हणौनि उल्हासें । अवधारा श्रीकृष्ण ऐसें । बोलते जाहले ॥ ३३ ॥ ओलावा लाभला नाहीं, आणि तुम्ही उदासीनच राहिलां, तर ज्ञानाचा फुटलेला कोंबही सुकून जातो. २५ महाराज, हें ध्यानीं ध्या, कीं, वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्याचें सावधानपण हाच स्वाभाविक खुराक आहे, आणि तो मिळाला म्हणजे सिद्धांत प्रतिपादक शब्द भरीवपणानें बाहेर पडतात. २६ शब्द बाहेर फुटण्याची खोटी, तोंच अर्थप्रतिपत्ति घडते, आणि मग अभिप्रेत अर्थाची परंपरा सारखी जुळून सुरू होते, आणि बुद्धीवर फुलांचा ऐन बहार येतो. २७ म्हणून वक्ता व श्रोता यांच्या मेळाचा अनुकूल वारा वाहू लागला, म्हणजे हृदयाकाशांत वक्तृत्वाच्या रसमेघाचा संचार होतो; पण, श्रोते जर उदासीनतेने दुर्लक्ष करतील, तर वक्तृत्वरसाचा मेघ बनला असतांही तो वितळून जाईल. २८ अहो, चंद्रकांताला पाझर फुटतो ही गोष्ट खरी- पण हे पाझर फोडण्याचें सामर्थ्य आहे चंद्राच्या अंगीं ; त्याचप्रमाणे योग्य श्रोत्यावांचून वक्ता हा वक्ताच होऊं शकत नाहीं. २९ पण आतां, 'आम्हांला गोड मानून घ्या,' असें तांदुळांनीं विनविण्याची आवश्यकता काय आहे ? कळसूत्री बाहुल्यांनी त्यांना नाचविणाऱ्या सूत्रधाराची कोठें प्रार्थना का करावी लागते ? ३० तो सूत्रधार जो बाहुल्या नाचवितो, तें काय बाहुल्यांच्या हिताकरितां कीं आपल्या ज्ञानाची थोरवी लोकांत प्रख्यात व्हावी म्हणून ? तेव्हां आम्हीं या प्रश्नाची नसती काथ्याकूट कशाला करावी ? " ३१ इतकें वक्ता बोलला, तोंच श्रीसद्गुरु म्हणाले, “अरे, यांत काय आहे ? आम्ही तुझा सर्व अभिप्राय जाणून आहों. आतां श्रीकृष्णदेव काय म्हणाले, तें कथन कर. " ३२ हे ऐकून मोठ्या आनंदानें व उल्लासित मुद्रेनें श्रीनिवृत्तिनाथांच्या शिष्यानें उत्तर "कलें, ' जशी आज्ञा, महाराज, ऐकावें श्रीकृष्ण काय बोलते झाले तें. ३३ a १ बाहेर निघतात. २ सिद्धान्ततत्त्वाची ३ फुलांचा बहर. ४ अनुकूल वारा. ५ वक्तृत्वरसाच्या मेघानें, ६ सिद्ध झालेला, ७ कसब, ८ कळसूत्री बाहुल्याने,