पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी बाळमती । तरी तुम्ही संतोपिजे ऐसी जाती । प्रेमाची असे ॥ १६ ॥ आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्ही संत घेतले असा बाहें । म्हणोनि केलिये सलगीचा नोहे । भारु तुम्हां ॥ १७ ॥ अहो तान्हयाचें लागतां झटें । तेणें अधिकचि पान्हा फुटे । रोपें प्रेम दुणवटे । पढियंर्तयाचेनि ॥ १८ ॥ म्हणऊनि मज लेंकुरवाचेनि वोलें । तुमचें कृपाळूपण निदेलें । तें चेइलें ऐसें जी जाणवलें । यालागीं बोलिलों मी ॥ १९ ॥ एहवीं चांदि पिकविजत आहे चेपणी । कीं वारया घात हे वाणी । हांहो गगनासि गवसणी । घालिजे केवीं ॥ २० ॥ आइका पाणी वोथिजावें न लगे | नवनीतीं माथुला न रिगे । तेविं लाजिलें व्याख्यान निगे । देखोनि जयातें ॥ २१ ॥ हें असो शब्देन जिये वीजे । शब्द मावळलेया निवांतु निजे । तो गीतार्थ महाटिया वोलिजे । हा पौडु काई ॥ २२ ॥ परि ऐसियाही मज धिवैसा । तो पुढतियाचि येकी आशा । जेवा करूनि भवादृशां । पढियंतया होआवें ॥ २३ ॥ तरि आतां चंद्रापासोनि निववितें । जें अमृताहूनि जीववितें । तेणें अवधानें कीजो वाढतें । मनोरथा माझिया ॥ २४ ॥ कां जैं दिठिवा तुमचा वरुखे । तैं सकळार्थ सलगी केली, तरी तुम्हांला संतोषच व्हावा, असा प्रेमाचा स्वाभाविक धर्म आहे. १६ आणि तुम्ही संतजन आश्रिताविषयीं आपलेपणानें बहुपरीनें भारून जातां, म्हणून मी केलेल्या या लडिवाळ सलगीचें तुम्हांस ओझें भासणार नाहीं. १७ अहो, तान्ह्या मुलाच्या मुखाचा ढका मातृस्तनाला लागला असतां, जसा त्याला अधिकच पान्हा फुटतो, तसें आवडत्याच्या रागाच्या झटक्यानेंच प्रेम दुप्पट उसळी घेतें ! १८ म्हणून माझ्यासारख्या लेकराच्या बडबडीनें तुमचें निजलेलें कृपाळूपण जागे झालें आहे, हें जाणूनच मी असें बोललों आहें. १९ खरें पाहिलें, तर चांदणें पक्के होण्याकरितां तं कधीं आढींत घालून चेपून ठेवतात का ? किंवा वाऱ्याला 'तूं असाच वाहा म्हणून कोणी वाहण्याचे नियंत्रण लाविलें आहे का ? अथवा गगनाला कोणी गवसणी घालूं शकतो का ? २० अहो, जसें पाणी पातळ करावें लागत नाहीं, किंवा लोणी घुसळण्यासाठीं त्यांत कोणी रवी घालीत नाहीं, त्याप्रमाणें ज्या गीतार्थाला पाहून माझं दुर्बळ व्याख्यान लाजून आपोआपच परत मुरडतें; २१ इतकेंच नव्हे, तर शब्दब्रह्म जो वेद तोही शब्दाची गति खुंटल्यामुळे ज्या खाटेवर स्तब्ध होऊन झोपी जातो, तो गीतार्थ मराठींत उतरण्याची योग्यता मला कसली बरें असणार ! २२ परंतु अशा माझ्यासारख्या दुबळ्याने हा जो हिय्या केला आहे, त्यांत हेतु इतकाच कीं, या धिटाईनें तुमच्यासारख्यांच्या प्रेमास पात्र व्हावें. २३ तेव्हां आतां, ज्यामध्ये चंद्रापेक्षांही जास्त शीतळाई आहे, आणि अमृतापेक्षांही जास्त वांचविण्याचें सामर्थ्य आहे, त्या अवधानदानानें तुम्ही माझ्या मनोरथाचें पोषण करावें. २४ कारण तुमच्या कृपाकटाक्षाचा वर्षाव झाला म्हणजे सर्व मनोरथ सिद्धीचं पात्र पदरी पडते; परंतु तो कृपाकटाक्षाचा १ स्वभावधर्म. २ बहुत प्रकारांनी ३ ओझें. ४ आवडत्याच्या ५ दडपण घालून, ६ घातली जाते. ८ मंथा ९ वेद १० खाटेवर ११ सामर्थ्य. १२ धैर्य, ७ पातळ करावें. ,