पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा २५१ ॥ ७ ॥ वांचूनि माझिये वोलतिये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते । काय धड्यावरी सारस्वतें । पढों सिकिजे || ८ || अवधारा आंवडे तेसणा धुंधुरु | परि महातेजी न मिरवे का करूं । अमृताचिया ताटीं बोर्गेरूं। ऐसी रससोय कैंची ॥ ९ ॥ हां हो हिमकरासी विजेणें । कीं नादापुढें आइकवणें । लेणियासी लेणें । हैं कहीं आथी ॥ १० ॥ सांगा परिमळे काय तुरंवावें । सागरें कवणे ठायीं नाहावें । हें गगनचि आडे आघवें । ऐसा पवाँड कैंचा ॥ ११॥ तैसें तुमचें अवधान धाये । आणि तुम्ही म्हणा हैं होये । ऐसें वक्तृत्व कवणा आहे । जेणें रिझा तुम्ही ॥ १२ ॥ तरी विश्वप्रगटितिया गर्भस्ती | काय हातिवेन न कीजे आरती । कां चुळोदकें आंपांपती । अर्घ्य नेदिजे ॥ १३ ॥ प्रभु तुम्ही महेशाचिया मूर्ति । आणि मी दुबळा अर्तितु भक्ती | म्हणोनि वोल जन्ही गंगावती । तन्ही स्वीकाराल कीं ॥ १४ ॥ बाळक वापाचिये ताटीं रिगे । आणि वापातेंचि जेवऊं लागे । कीं तो संतोपलेनि वेगें । मुखचि वोढेवी ॥ १५ ॥ तैसा मी जरी तुम्हांप्रती | चावटी करीतसें संतजनांचे प्रेम आम्हांला कसें तरी लाभावें, या उत्कंठेनें हें लडिवाळपणाचें भाषण मीं केलें आहे. ७ नाहीं तर माझ्या वक्तृत्वाच्या योग्यतेशीं तुलना केली तर तुम्हांसारखे श्रोते केवळ सर्वज्ञच आहेत, मग मी तुमच्यापुढे प्रवचन करणें व तें तुम्हीं ऐकणें म्हणजे सरस्वतीपुत्राने पाटीवर धडा घेऊन शिकण्यासारखंच आहे ! ८ हें पहा, पाहिजे तेवढा मोठा काजवा झाला, तरी सूर्याच्या महातेजापुढें त्याचें कांहींएक चालणार नाहीं. अमृताच्या ताटांत वाढण्यास योग्य होईल, असा रसपरिपाक ' कोठें बरें आढळेल ? ९ अहो, शीतकरण चंद्राला पंख्यानें वारा घालणें, नादतत्त्वाला गाणें ऐकविणें, किंवा अलंकाराला अलंकार चढवणें, ह्या गोष्टी कधीतरी संभवतात का ? १० सुगंधानें स्वतःच काय हुंगावें, समुद्रानें स्वतः कोणत्या डोहांत स्नान करावें, आणि ज्यांत सर्व आकाश समावलें जाईल असा स्थळविस्तार कोणता, तें सांगा पाहूं ? ११ त्याप्रमाणेंच जेणेकरून तुमचें चित्त संतोपित होईल, आणि 'वक्तृत्व असावें तर असें असावें !' असा तुमच्या तोंडून धन्योद्वार बाहेर पडेल, इतकें तुम्हांला आनंदित करणारे वक्तृत्व कोणाच्या ठायीं आढळेल बरें ? १२ पण, विश्वाला प्रकाशित करणाऱ्या सूर्याला कांकडवातीनें ओवाळूं नये कीं काय ? किंवा पाण्याचा अपरंपार सांठा जो समुद्र त्याला चुटकाभर पाण्याने अर्ध्य समर्पण करूं नये कीं काय ? १३ महाराज, आपण ते श्रीशंकराच्या मूर्ति आहांत, आणि मी आराधना करणारा भक्त जरी दुबळा आहे, आणि माझा बोल जरी निगडीचा पाला आहे, तरी तुम्ही त्याचा सादर स्वीकार करालच. १४ मूल बापाच्या ताटांत हात घालतें आणि बापालाच घांस भरवूं लागतें आणि तोही घांस घेण्याला मोठ्या आनंदाने तोंड पुढे करतो ! १५ त्याप्रमाणेंच जरी मी पोरबुद्धीनं व लाडिकपणानें बाष्कळ १ सरस्वतीपुत्राने २ पाहिजे तेवढा ३ काजवा ४ बाई. ५ पंख्याने वारा घालणे. ६ हुंगावें. ७ स्थळ विस्तार. ८ सूर्याला. ९ समुद्र. १० निगडीचा पाला बेलाच्या अभावी निगडीचें त्रिदळ शंकरास वाहण्याची चाल आहे. ११ पुढे करतो.