पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ॐ नमो भगवते वासुदेवाय' सार्थ श्रीज्ञानेश्वरी अध्याय नववा तरी अवधान एकलें दीजे । मग सर्वसुखासि पात्र होइजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड आइका ॥ १ ॥ परी प्रौढी न बोलों हो जी । तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं । देयावें अवधान हे माझी | विनवणी सलगीची ॥ २ ॥ कां जे लळेयाचे लळे सरती । मनोरथांचे मनोरथ पुरती । जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हांऐसीं ॥ ३ ॥ तुमचेया दिठिवेयाचिये वोलें । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे | ते साउली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥ ४ ॥ प्रभु तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्हीं आपुलिया स्वेच्छा वोलावो लाहों । येथही जरी सलगी करूं विहों । तरी निवों के पां ॥ ५ ॥ ना तरी बाळक बोवडा बोलीं । वांकुडा विचुका पाउलीं । ते चोज करूनि माउली । रिझे जेवीं ॥ ६ ॥ तेवीं तुम्हां संतांचा पढियावो । कैसेनि तरी आम्हांवरी हो । या बहुवा आळुकिया जी आहों । सलगी करित " श्रोते हो, तुम्हीं केवळ एकाग्र मनानें माझें प्रवचन ऐका, म्हणजे आपल्यास सर्व सुख लाभेल, हें माझें उघड उघड प्रतिज्ञावचन आहे. १ परंतु हे मी अभिमानानें सांगत नाहीं, तर तुम्ही सर्वज्ञ श्रोते आहां तेव्हां माझ्याकडे लक्ष द्यावें, अशी माझी आपणांस सलगीची म्हणजे लडिवाळपणाची विनंति आहे. २ याचें कारण असें आहे, कीं, जर श्रीमंत माहेरघरासारखा मला तुमचा आश्रय लाभला, तर माझे सर्व लाड पुरे होतील आणि मनोरथ सिद्धीला जातील. ३ तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्यानें प्रसन्नतेचे मळे अगदीं भरास आले आहेत, आणि मळ्यांची शीतल सांवली पाहून तिच्या खालीं संसारतापाने तापलेला माझा जीव तापाचा उपशम पावून लोळत आहे. ४ महाराज, तुम्ही सुखामृताचे खोल डोह आहां, म्हणून आम्हांला त्यामध्यें पाहिजे तेवढें सुखाचें अमृत लाभू शकतं; मग अशी संधि आली असतां जर लडिवाळपणे बोलण्याचें मी भय मानलें, तर मी सुखशांत तरी कधीं व्हावें ? ५ खरें म्हटलें तर आपल्या बाळाच्या बोबड्या बोलांचें चवांकड्या तिकड्या पडणाऱ्या पावलांचे कौतुक करून जशी आई आनंदित होते, ६ त्याप्रमाणें तुम्हां १ भरति आले, तरारले. २ प्रेम. ३ उत्कंठेनें.