पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा २४९ जयासी अदृष्टाचें वैसणें । जें शतमखाही आंगवणें । नोहेचि एका ।। ६५ ।। तयातें योगीश्वर अलौकिकें । दिठीचेनि हाततुकें । अनुमानती कौतुकें । तंव हळुवार आवडे ।। ६६ ।। मग तया सुखाची किरीटी | करूनियां गा पाउटी | परब्रह्माचिये पाटीं । आरूढती ॥ ६७ ॥ ऐसें चराचरैकभाग्य । जें ब्रह्मेश आराधनेयोग्य । योगियांचें भोग्य । भोगधन जें ॥ ६८ ॥ जो सकळ कळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा । जो जिवाचा जिव्हाळा । विश्वाचिया ॥ ६९ ॥ जो सवर्झतेचा वोलावा । जो यादवकुळींचा कुळ दिवा | तो श्रीकृष्णजी पांडवा | प्रति बोलिला ॥ २७० ॥ ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतु । संजयो रायासी असे सांगतु । तेचि परियेसा पुढारी मातु । ज्ञानदेव म्हणे ॥२७१॥ ६७ जागीं बसण्यास योग्य गणले जातें, जें स्वर्गसुख एखाद्या शंभर यज्ञ करणा-यासही लाभत नाहीं; ६५ अशा त्या स्वर्गसुखालाही श्रेष्ठ योगी जेव्हां आपल्या ब्रह्मज्ञानाने दिव्य झालेल्या दृष्टीच्या हातावर घेऊन तोलतात आणि त्याच्या वजनाचा अदमास करतात, तेव्हां तें अगदींच हलकट आहे, असें त्यांस आढळून येतें. ६६ मग हैं स्वर्गसुख मातीमोलाचें ठरवून ते योगी त्याला आपल्या पायांखाली पायरीसारखे घालतात, आणि या पायरीवर उंचावून ते परब्रह्माच्या पीठावर चढतात. अशा प्रकारचें जं स्थावरजंगमात्मक सृष्टीचें एकवटलेले वैभव आहे, ज्याची आराधना प्रत्यक्ष ब्रह्मदेव व शंकर यांनीही करावी, व जें योगीजनाची भोग्य वस्तु असून तीपासून लाभणारं भोगसुखही आहे, ६८ तें रहस्य, सर्व कलांना कला देणारें, परमानंदाची मूर्तीच, विश्वाच्या जीवाचें जीवन, सर्वज्ञतेचे मूळ उगम, यादवकुळाचे दिव्य कुलदीपक, असे श्रीकृष्ण त्या पांडुपुत्र अर्जुनाला सांगते झाले. ६९,२७० अशा रीतीनें कुरुक्षेत्रांत घडलेल्या प्रसंगाची वार्ता संजय धृतराष्ट्र राजास सांगत आहे, तीच आतां पुढें श्रवण करा, असें मी ज्ञानदेव तुम्हां श्रोत्यांस विनवीत आहे. २७१ 0.0.0.0.0.0.0.0.0.0.0.0.00