पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी होआवें योगयुक्ता । येतुलेनि सर्वकाळीं साम्यता | ऑपेसया होईल ॥५६॥ मग भलतेथ भलतेव्हां । देहबंध असो अथवा जावा । परि अवंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं ॥५७॥ तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांती मरणें नालवे | माजी स्वर्गसंसाराचेनि लाघवें । झकवेना ॥ ५८ ॥ येणें बोधें जो योगी होये । तयासीचि या बोधाचें नीटपण आहे । कां जे भोगातें पेलूनि पायें । निजरूपा ये ।। ५९ ।। पैं गा इंद्रादिकां देवां । जयां सर्वस्वें गाजती राणिवा । तें सांडणें मानूनि पांडवा | डावली जो ॥ २६० ॥ वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् । अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥ २८ ॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः ॥ सम० - वेदांमधे यज्ञतपांमधेही । दानांतही जें फळपुण्य कांहीं ॥ अतिक्रमी जाणुनि सर्व मातें । योगी चढे आद्यपरंपरा ते ॥ २८ ॥ आर्या-तप-यज्ञ वेद-दानीं जें हें फळपुण्य ध्यासि आक्रमुनी । हें जाणुनियां पावे आद्य परमपद सुयुक्त तोचि मुनी ॥ २८ ॥ ओवी - वेदयज्ञ तपदान । यांचें जें बोलिजे पुण्य । ज्या असे शुक्लकृष्णगतींचें ज्ञान । तो पुण्यवंत परमगतीतें पावे ॥२८॥ जरी वेदाध्ययनाचें जालें । अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें । कीं तपोदानांचें जोडलें | सर्वस्व हन जें ॥ ६१ ॥ तया आधवां पुण्याचा मळा । भार आंतौनि जया ये फळा । तें परब्रह्मा निर्मळा । सांटी न सरे ॥ ६२ ॥ जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचा कांटाळा न दिसे सानें । पाहा पां वेदयज्ञादि साधनें । जया सुखा ॥ ६३ ॥ जें विटे ना सरे । भोगितयाचेनि पवाडें पुरे । पुढती महासुखाचें सोयरें | भावंडचि ॥ ६४ ॥ ऐसें दृष्टीचेनि सुखपणें । योगयुक्त व्हावेंस, म्हणजे या उपायानें तुला आपोआप ब्रह्मस्वरूप प्राप्त होईल. ५६ मग हा देहाचा बंध केव्हांही राहो अथवा जावो, तुझ्या अनिर्बंध - स्वतंत्र - ब्रह्मस्वरूपाला तिळमात्रही बाध येणार नाहीं. ५७ तें ब्रह्मस्वरूप विश्वरचनेच्या काळीही जन्माच्या तडाख्यांत सांपडत नाहीं, किंवा विश्वप्रय झाला तरीही तें मरणाच्या पकडींत पडत नाहीं; आणि कल्पादि व कल्पांत यांच्या मधील काळांतही तें, हा स्वर्ग आणि हा संसार, अशा प्रकारच्या मोहानें भुलून जात नाहीं. ५८ हा बोध लाभून जो योगी झाला, त्यालाच या बोधापासून खरा उपयोग होतो, कारण तो विषयभोगांना लाथेनं उडवून, आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. ५९ अरे, इंद्रादिक देवांच्या ज्या साम्राज्यसत्ता स्वर्गात चौफेर गाजतात, त्या केवळ ओवाळून टाकण्याच्या कवडीमोल वस्तू आहेत, असें मानून, त्यांचा तो अव्हेर करतो. २६० जरी संपूर्ण वेदपठनानं वेदोनारायण झाला, किंवा शास्त्रोक्त यज्ञविधान करून अपरंपार फळ मिळविलें, किंवा पुरश्चरण करून अथवा दान देऊन अपार पुण्य जोडले, ६१ तरी या सर्व पुण्यांचा समुदाय, त्यांत कर्मफळाचा बहार अगदीं उफलून आला असतांही, निर्मळ परब्रह्माच्या बरोबरीला येऊं शकत नाहीं. ६२ जं स्वर्गसुख कांट्यांत घातलें असतां ब्रह्मानंदापेक्षां वजनांत कमी भासत नाहीं; ज्या स्वर्गसुखाचीं वेद, यज्ञ, इत्यादि साधने आहेत; ६३ ज्या स्वर्गसुखाचा कधीं वीट येत नाहीं किंवा जें कधीं संपत नाहीं, किंबहुना जे भोगणाराच्या इच्छेप्रमाणें वाटेल तेवढ़ें व्यापक होतें, आणि नंतर चढत्यावाढत्या गुणानं प्रत्यक्ष ब्रह्मसुखाचे सोयरें, नव्हे जवळ जवळ सख्खे भावंडच वाहूं लागते; ६४ अशा प्रकारचें जें स्वर्गसुख इंद्रियांच्या वरकरणी संतोषामुळे, इंद्रियांतील ब्रह्मसुखाच्या