पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा २४७ नैते सृती पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन । तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥ २७ ॥ सम० - जाणोनि मार्ग हे दोनी आत्मयोगीं न मोहती । अर्जुना होय तूं तस्मात् योगयुक्तचि सर्वदा ॥ २७ ॥ आर्या-या दोहीं मागांतें जाणुनि योगी न वश्य मोहास । यास्तव सवां काळीं करिं तूं योगास काम दोहास ॥ २७ ॥ ओवी - दोन्ही आहेत सृती । यांस योगी जाणती । ते मोहातें न पावती । यास्तव योगयुक्त होय अर्जुना ॥ २७ ॥ ते वेळीं म्हणितलें हैं नव्हे । वायां अवचटें काय पावे । देह त्यजूनि वस्तु होआवें । मार्गेचि कीं ॥ ४७ ॥ तरी आतां देह असो अथवा जावो । आम्ही तो केवळ वस्तूचि आहों । कां जे दोरीं सर्पत्व वावो । दोराचिकडुनी ॥ ४८ ॥ मज तरंगपण असे कीं नसे । ऐसें हैं उदासी कहीं प्रतिभासे । तें भलतेव्हां जैसें तैसें । उदकचि कीं ॥ ४९ ॥ तरंगाकारें न जन्मेचि । ना तरंगलोंपें न निमेचि । ते विदेही जे देहेंचि । वस्तु जाहले ॥ २५० ॥ आतां शरीराचें तयाचिया ठाई । आडनांवही उरलें नाहीं । तरि कोणें काळें काई । निमे तें पाहें पां ॥ ५१ ॥ मग मार्गातें कासया शोधावें । कोणें कोठून जावें । जरी देशकालादि आघवें । आपणचि असे ॥५२॥ आणि हां गा घटु जे वेळीं फुटे । ते वेळीं तेथींचं आकाश लागे नीट वाटे । वाटा लागे तर गगना भेटे । एन्हवीं काय चुके ॥ ५३ ॥ पाहें ऐसें हन आहे । कीं तो आकारुचि जाये । येर गगन तें गगनींचि आहे | घटत्वाहि आधीं ॥ ५४ ॥ ऐसिया वोधाचेनि सुरवाडें । मार्गामार्गाचें सांकडें । तया सोहंसिद्धां न पडे | योगियांसी ॥ ५५ ॥ याकारणें पांडुसुता । तुवां " त्या देहपाताच्या वेळीं आपण म्हटल्याप्रमाणें कांहीं सर्व गोष्टी घडत नाहींत, अकस्मात् दैवयोगानें जें मिळावयाचे असेल, तेंच हेतूशिवाय मिळते; मग यांतील एकाच मार्गाने जाऊन आपण ब्रह्मस्वरूप व्हावें, हें तरी कसें घडणार ? " ४७ अशी शंका येते, म्हणून तर देह जावो अथवा राहो, आम्ही ब्रह्मस्वरूपच आहों; कारण दोरावर जो सर्पाचा आभास होतो, त्यालाही मूळ कारण दोरच असतो; ४८ आपल्या ठिकाणीं तरंगपण आहे किंवा नाहीं, याचें भान पाण्याला कधीतरी होते का ? तें आपले कोणत्याही वेळीं, म्हणजे तरंग असतांना व नसतांनाही, केवळ जळस्वरूपच असतें; ४९ तें तरंगाच्या उद्भवाबरोबर उत्पन्न होत नाहीं, किंवा तरंगनाशावरोवर नष्ट होत नाहीं; त्याचप्रमाणें जे देहधारण करीत असतांच ब्रह्मस्वरूप होतात, त्यांनांच 'विदेही' म्हणावें २५० आतां अशा विदेही पुरुषांच्या ठिकाणीं जर देहाचें नांवगांवही उरलें नाहीं, तर त्यांच्यासंबंधें कोणत्यातरी काळीं मरणें हें शक्य आहे का ? ५१ मग त्यांनी मार्ग कसला शोधावयाचा आणि कोट्न कोठें व केव्हां जावयाचें ? कारण सर्व देशकाळ त्यांना आत्मरूपच झालेले असतात. ५२ आणि असें पहा, ज्या वेळी घट फुटतो, त्या वेळीं त्या घटांतील आकाश सरळ वाटेला लागलें तरच तें आकाशतत्त्वांत मिळते, नाहींतर तें चुकतें, असें कां कधीं होतें ? ५३ अरे, खरी गोष्ट अशी आहे कीं, घटनाशाबरोबर केवळ आकाराचा नाश होतो, पण मूळ आकाश हैं घटाकार उत्पन्न होण्याच्याच पूर्वी होतें, आणि घटनाशानंतरही ते तसेच असतें. ५४ तेव्हां अशा ब्रह्मज्ञानानें जे ब्रह्मस्वरूप झाले, त्या योग्यांना, मार्ग कोणता आणि अमार्ग कोणता याचें संकट कधींच पडत नाहीं. ५५ म्हणून अर्जुना, तूं निरंतर