पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते । एकया यात्यनावृत्तिमन्यया वर्तते पुनः ॥ २६ ॥ सम० - शुक्ल कृष्ण गती ऐशा विश्वाच्या शाश्वता बन्या पहिलीनें न ये जन्मा दुसरीनें फिरे पुन्हा ॥ २६ ॥ आर्या-ज्या शुकुकृष्णगति त्या विश्वाच्या मान्य जाग शाश्वत रे । एकीनें जन्मा ये दुसरीनें मुक्त होउनीच तरे ॥ २६ ॥ ओवी - शुक्लकृष्ण या दोनी गती । ज्ञान अज्ञान यांसि म्हणती । एक गतीपासूनि होय मुक्ती । एकैकरून जन्म घरी २६ ऐशिया अनादि या दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा । म्हणवूनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ॥ ३८ ॥ कां जे मार्गामार्ग देखावे । सा लटिकें वोळखावें । हिताहित जाणावें । हिताचिलागीं ॥ ३९ ॥ पाहे पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथावीं । कां सुपंथ जाणोनियां अडवीं । रिगवत असे ॥ २४० ॥ जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडूं शके । तेविं जो उजू वाट देखे। तो अव्हांटा न वचे ॥ ४१ ॥ म्हणोनि फेडें । पारखावें खरें कुडें । पारखिलें तरी नं पंडे । अवसरें कहीं ॥ ४२ ॥ एव देहांती थोर विपम । या मार्गाचें आहे संभ्रम | जन्में अभ्यासिलियाचें हन काम | जाईल वायां ॥ ४३ ॥ जरी अर्चिरादि मार्ग चुकलियां । अवचटें धूम्रपंथें पडिलियां । तरी संसारपांती जुतलियां । भवंतचि असावें ॥ ४४ ॥ हे सायास देखोनि मोटे । आतां कैसेनि पां एकवेळ फिटे । म्हणोनि योगमार्ग गोमटे | शोधिले दोन्ही ॥ ४५ ॥ तंव एकें ब्रह्मत्वा जाइजे । आणि एके पुनरावृत्ती येजे। परि दैवगत्या जो लाहिजे । देहांती जेणें ॥२६॥ याप्रमाणें 'शुक्ल' व ' कृष्ण, ' किंवा 'अर्चिरादि ' व ' धूम्र, अशा योगी जनांच्या दोन वाटा अनादि काळापासून चालत आलेल्या आहेत. यांपैकीं एक वाट सरळ आहे, आणि दुसरी आडवळणाची आहे, म्हणून मी बुद्धयाच त्यांचें विस्तृत वर्णन करून तुला दाखविलें आहे. ३८ यांत हेतु असा आहे कीं, सुमार्ग, कुमार्ग, पहावे; खऱ्याखोट्याचा निर्णय करावा; हिताहित समजून घ्यावे; आणि आपले कल्याण साधावें. ३९ असें पहा, चांगली धड नौका दृष्टीस पडत असतां, कोणीतरी अथांग पुरांत उडी घालील काय ? किंवा चांगला सोईचा रात्रता मार्ग ठाऊक असतां, कोणीतरी आडरानांत शिरतो काय ? २४० ज्याला अमृत व विष यांमधील भेद समजतो, तो कधी तरी अमृत टाकील का ? त्याचप्रमाणे ज्याला सरळ वाट दिसत आहे, तो आडवाटेला कधीही जाणार नाहीं. ४१ म्हणून खरे काय, खोदें काय, याची नीट पारख करावी, आणि नीट पारख केली असली म्हणजे आणीबाणीच्या वेळी कांहींही हानि घडत नाहीं. ४२ नाहींतर, देहपाताच्या वेळी मोठा अनर्थ घडेल, आणि या दोन मार्गाविषयीं भ्रांतीनें घोटाळा उडेल, आणि जन्मभर अभ्यासलेला योग फुकट जाईल. ४३ जर अंतकाळीं अर्चिरादि मार्गाची भूल झाली, आणि धूम्रमार्गाला जीव लागला, तर त्याला संसाराच्या दावणीत बांधलें जाऊन जन्ममरणाच्या फेऱ्यांत भरकटत रहावें लागेल. ४४ या अवस्थेचे महाकष्ट लक्षांत आणून, कष्ट एकदम कसे चुकावे, हे सांगण्याकरितां मला हे दोन्ही योगमार्ग स्पष्ट करून दाखवावे लागले आहेत. ४५ या दोन मार्गपैकी एकाने जीव ब्रह्मस्वरूपाच्या थोरवीला पोचतो, तर दुसऱ्यानें तो जन्ममृत्यूच्या फेऱ्याच्या कचाटांत सांपडतो; पण देवयोगाने ज्याला यांपैकीं जो मार्ग सांपडेल तोच त्याचा मार्ग. ४६ १ नीट, स्पष्ट, २ नाश पावत नाहीं, ,