पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा २४५ बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण || २७ ॥ अनीचें अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये । तेणें चेतना गिवसिली ठाये । शरीरींची ॥ २८ ॥ जैसें चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ | मग गडद ना उजाळ । ऐसें झांवेळे होये ॥ २९ ॥ कां मरे ना सावध । ऐसें जीवितासि पडे स्तब्ध | आयुष्य मरणाची मर्याद- । वे ठाकी || २३० ॥ ऐसी मनबुद्धिकरणीं । सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी । तेथ जन्में जोडलिये वोहणी | युगचि बुडे ॥ ३१ ॥ हां गा हातींचं जे वेळीं जाये । ते वेळीं आणिका लाभाची गोठी के आहे । म्हणऊनि प्रयाणीं तंव होये । येतुली दशा || ३२ | ऐसी देहाआंतु स्थिति । वाहेरि कृष्णपक्षु वरि राती । आणि सा मासही वोडवती । दक्षिणायन ॥ ३३ ॥ इये पुनरावृत्तीची राणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं । तो स्वरूपसिद्धीची कहाणी | कैसेनि आइके || ३ || ऐसा जयाचा देह पडे | तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणें घडे । मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये ।। ३५ ।। आम्हीं अकाळ जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा । आणि हाचि धूर्ममार्ग गांवा । पुनरावृत्तीचिया ॥ ३६ ॥ येर तो अर्चिरादि मार्ग | तो वसैता आणि अलगु । सावियाँ स्वस्थं चांगु | निवृत्तीवरी ॥ ३७ ॥ अशा लांकडासारखी जड होतात, स्मृति भ्रमून जाते, मन भडकतें, आणि प्राणाचा कोंडमारा होतो. २७ शरीरस्थ अग्नीचें तेज जातें, आणि नुसता धूर सर्वत्र पसरतो, आणि त्यामुळे शरीरांतील जीवनकळा गुरफटून राहाते. २८ जसें चंद्राआड काळें दाट अभ्र यावें, मग धड काळोखही नसतो आणि धड उजेडही नसतो असें झुंजुक होतें, २९ तसें, मेला पण नाहीं आणि सावध पण नाहीं, असें एक प्रकारचें स्तब्धत्व जीवाला येतें आणि आयुष्य मरणाच्या मेरेवर येऊन थबकतें. २३० रीतीनें मन, बुद्धि, आणि इंद्रियें, यांचा धुराने चोहींकडून कोंडमारा झाला म्हणजे जन्मभर आयास करून मिळविलेला लाभ वायां जातो. ३१ आणि जेव्हां हातीं आलेलेच गमावलें जातें तेव्हां नवीन कमावण्याची गोष्टच बोलावयास नको. एकंदरीत प्राणप्रयाणसमयीं अशी दुर्दशा होत. ३२ ही झाली शरीराच्या आंतील अवस्था; बाहेरची परिस्थितीही अशीच प्रतिकूल, म्हणजे वद्य पक्ष, तशांत रात्रिसमय, आणि त्यांतही दक्षिणायनाच्या सहा मासांपैकीं एक मास; ३३ अशा प्रकारचीं जन्ममरणाचा फेरा चालू ठेवणारीं लक्षणें ज्याच्या प्राणप्रयाणाच्या काळी एकत्र जुळलीं असतील, त्याच्या कानाला ब्रह्मस्वरूपप्राप्तीची कथा कशी बरें ऐकूं येईल ? ३४ अशा दुर्दशेत ज्या पुरुषाचा देहपात होतो, तो योगी असला तर त्याला चंद्रलोकापर्यंत जाणें घडतें, आणि मग कांहीं काळानंतर तो पुन्हां घडघडत इहलोकींच्या संसारास येतो. ३५ आम्हीं ज्याला प्राणप्रयाणाचा 'अकाळ ' म्हटला, तो हाच. जन्ममरणाच्या येरझारांच्या गांवाला पावणारा तो हाच 'धूम्रमार्ग' होय. ३६ दुसरा जो 'अर्चिरादि' नांवाचा मार्ग, तो जागता, निराळा, स्वतंत्र, सर्व प्रकारें शांतिसुखाचा, आणि नीट निवृत्तीपर्यंत ( म्हणजे मोक्षापर्यंत ) पोंचणारा आहे. ३७ १ धुकट, झुंजुक, २ प्रवाह, मार्ग. ३ साधनें, लक्षणे. ४ कथा. ५ जागता. ६ अगदी निराळा, स्वतंत्र. ७ स्वयंसिद्ध. ८ शांति सुखाचा,