पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी हातींचा ॥ १८ ॥ आतां असो हें सकळ । जाण पां ज्ञानासि अनि मूळ । तया अग्नीचें प्रयाणीं बळ | संपूर्ण आथी ॥ १९ ॥. अग्निर्ज्योतिरहः शुक्कुः षण्मासा उत्तरायणम् । तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥२४॥ सम- अग्निही ज्योतिही दिन पक्षही शुक्ल मास सा । उत्तरायण हा मार्ग वेदज्ञा ब्रह्मलोकंचा ॥ २४ ॥ आर्या - पण्मास उत्तरायण अभि दिन ज्योति शुकपक्ष असे । तेथें प्रयाणकर्ते ब्रह्म ब्रह्मज्ञ पावतात असे ॥ २४ ॥ ओवी - दिवस आणि शुक्लपक्ष दैवत अभी । पण्मास उत्तरायण जाणोनी । तेथें जाती देह त्यजुनी । ते ऐक्य होती ब्रह्म जाण आंतु अग्निज्योतीचा प्रकाशु । वाहेरी शुक्लपक्षु आणि दिवस । आणि सा मासांमाजीं मासु । उत्तरायण || २२० ।। ऐशिया समयोगाची निरुती । लाहोनि जे देह ठेविती । ते परब्रह्मचि होती । ब्रह्मविद ||२१|| अवधारीं गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा । तेवींचि हा उजू मार्ग स्वर्पुरा । यावया पैं ।। २२ ।। एथ अग्नि हैं पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हैं दुसरें । दिवस जाणें तिसरें | चौथें शुक्लपक्ष || २३ || आणि सामास उत्तरायण । तें वरचील गा सोपान । येणें सायुज्यसिद्धिसदन | पावती योगी ॥ २४ ॥ हा उत्तम काळु जाणिजे । यातें अर्चिरादि मार्ग म्हणजे । आतां अकाळु तोही सहजें । सांगेन आईक ॥ २५ ॥ 1 धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् । तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते २५ सम० - धूमरात्रि कृष्णपक्ष मास सा दक्षिणायन । चंद्रामृत अशा मार्गे योगी पावोनि जन्मतो ॥ २५ ॥ आर्या-षण्मास दक्षिणायन धूम निशा कृष्णपक्ष संयोगी । तेथेंचि फिरे कर्मठ चांद्रमसज्योति पावुनी योगी ॥ २५ ॥ ओवी - कृष्णपक्ष, रात्री, धूम, जाण । दैवत एक दक्षिणायन । योगी जे त्यजिती प्राण । त्यां पुनरावृत्ति होय ॥२५॥ । तरि प्रयाणाचिया अवसरें । वातश्लेष्मां सुभरें । तेणें अंतःकरणीं आंधारें । कोंदलें ठाके ॥ २६ ॥ सर्वेंद्रियां लांकुड पडे । स्मृति भ्रमामाजी येण्याच्या पूर्वीच नष्ट होतो. १८ सारांश, ज्ञानाला मूळ आधार शरीरगत उष्णतेचा आहे, आणि प्राणप्रयाणकाळी या शरीरस्थ अग्नीचें पुरोपूर बळ असावें लागतें. १९ तेव्हां शरीराच्या आंत अग्निज्योतीचा प्रकाश असून, बाहेर शुद्ध पक्ष, दिवस आणि उत्तराय- णाच्या सहा महिन्यांपैकी कोणता तरी महिना, २२० अशा प्रकारें सर्व चांगले योग जुळले असतां, जे देहत्याग करतात, ते ब्रह्मज्ञानी ब्रह्मस्वरूपास पावतात. २१ अर्जुना, लक्षांत घे, कीं, या योगाचें इतकं माहात्म्य आहे, आणि हाच मोक्षाच्या गांवीं जाण्याचा सरळ मार्ग आहे. २२ या मार्गातली पहिली पायरी शरीरगत अग्नि, दुसरी त्या अग्नीची ज्योति, तिसरी दिवसाची वेळ, चवथी शुद्ध पक्ष, २३ आणि उत्तरायणाचे सहा महिने ही या जिन्याची वरची पायरी होय. या पांच पाय-यांच्या मार्गानें योगीजन ऐक्याच्या मोक्षसदनाला पोचतात. २४ म्हणून हा देहपातास उत्तम समय समजावा, यालाच 'अर्चिरादि ' मार्ग म्हणतात. आतां, देहत्यागाला अयोग्य काळ कोणता, तेंही सांगतों, ऐक. २५ मरणकाळीं वायुकफांचा प्रक्षोभ होऊन अंतःकरणांत काळोखी दाटते. २६ सारीं इंद्रियें १ अनुकूल परिस्थितीची २ मोक्षस्थळाला. ३ वरची पायरी.