पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा २४३ तरि ऐकें गा सुभटा । पातलिया मरणाचा मोजिवटा | पांचै आपलालिया वाटा । निघती अंतीं ॥ ८ ॥ ऐसा वैरिपडिला प्रयाणकाळीं । बुद्धीतें भ्रमु न गिळी । स्मृति नव्हे आंधळी । न मरे मन ॥ ९ ॥ हा चेतनावर्गु आघवा । मरण दिसे टवटवा । परि अनुभविलिया ब्रह्मभावा । गवसणी होऊनि ।। २१० ।। ऐसा सावध हा समवायो । आणि निर्वाणवेन्हीं निर्वाहो । हें तरीच घडे जरी सावावो । अम्मीचा आथी ॥ ११ ॥ पाहें पां वारेन कां उदकें । जैं दिवियाचें दिवेपण झांके । तैं असतीच काय देखे । दिठी आपुली ॥ १२ ॥ तैसें देहांतींचेनि विपमवातें । देह आतंवाहेरि लेप्मातें । तैं विझोनि जाय उजितें | अमीचें तें ॥ १३ ॥ ते वेळीं प्राणासि प्राणु नाहीं । तेथ बुद्धि असोनि करील काई । म्हणोनि अमीवीण देहीं । चेतना न थरे ॥ १४ ॥ अगा देहींचा अग्नि जरी गेला । तरी देह नव्हे चिखलु वोला । वायां आयुष्यवेळ आपुला । अंधारें गिंवसी ॥ १५ ॥ आणि मागील स्मरण आघवें । तें तेणें अवसरे सांभाळावें । मग देह त्यजूनि मिळावें । स्वरूपीं कीं ॥ १६ ॥ तंव तया देहश्लेष्माचे चिखलीं । चेतनाचि बुडोनि गेली । तेथ मागिली पुढली हे ठेली । आठवण ॥ १७ ॥ म्हणोनि आधी अभ्यासु जो केला । तो मरण न येतां निमोनि गेला । जैसें ठेवणें न दिसतां मालवला । दीपु अर्जुना, ऐक, मृत्यूची तंद्री आली म्हणजे पंचमहाभूतें आपापल्या वाटेनें शेवटीं निघून चालतीं होतात. ८ असा देहविसर्जनाचा काळ ओढवला असतांही बुद्धि भ्रांत होत नाहीं, स्मृति आंधळी बनत नाहीं, आणि मनही मरत नाहीं; ९ तर ब्रह्मस्वरूपाच्या अनुभवाचें कवच लाभल्यामुळे हा पंचप्राण नांवाचा चेतनासमूह उलट टवटवीत होतो. २१० अशा प्रकारें अंतरिंद्रियांचा समुदाय टवटवीत असून, ती प्राणप्रयाण घडेपर्यंत टिकावीं, असं होण्याला शरीरगत अग्नि ( म्हणजे उष्णता ) सोबत असणं अगदीं अवश्य आहे. ११ असें पहा, वान्याने किंवा पाण्याने ज्योत विझून जर दिव्याचे दिवेपण म्हणजे प्रकाश देण्याचें सामर्थ्य लोपलें, तर, आपली दृष्टि जरी चांगली असली, तरी ती काय पाहील बरें ? १२ त्याचप्रमाणे देहपाताचे वेळच्या भयंकर वातप्रकोपानें, देह वाहर कफानें व्याप्त झाला असतां, जेव्हां शरीरगत उष्णतेची कळा विझून जाते, १३ तेव्हां प्राणांतच प्राण राहात नाहीं, मग बुद्धीची गोष्ट कशाला पाहिजे ? एवं शरीरगत उष्णतेवांचून देहांत जीवनतत्त्व राहूच शकत नाहीं. १४ अरे, या देहांतली उष्णताच नाहींशी झाली, मग हा देह कसला ? याला चिखलाचा ओला गोळा म्हणावं. अशा स्थितीत आयुष्याचा काळ अंधारांत सांपडून फुकट जातो. १५ तेव्हां, या अवस्थेत मागील स्मरण जागतें ठेवावें आणि देह सोडून आत्मस्वरूपीं मिसळून जावें, १६ असें मनांत आणावें, तोच कफादिकांनीं चिखल बनलेल्या त्या देहांतील जीवनकळाच नष्ट होते आणि मागली व पुढली सर्व आठवण बुजून जाते. १७ म्हणून ज्याप्रमाणें धनाचा ठेवा दृष्टीस पडण्यापूर्वीच हातांतला दिवा मालवावा, तसा आधी केलेला योगाभ्यास मरण १ धुंदी, तंद्री २ ओढवला. ३ समूह ४ प्राणप्रयाण घडेपर्यंत ५ सोबती, सहाय.