पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-२४२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जहालें । पाठीं न निवडेचि कांहीं केलें । काष्ठपण ।। ९९ ।। ना तरी साखरेचा माघौता । बुद्धिमंतपणेही करितां । परि ऊंस नव्हे पांडुसुता । जियापरी ॥ २०० ॥ लोहाचें कनक जहालें । हें एकें परिसेंचि केलें । आतां आणिक कैंचें तें गेलें । लोहत्व आणी ॥ १ ॥ म्हणोनि तूप होऊनि माघौतें । जेवीं दूधपण न येचि निरुतें । तेविं पावोनियां जयातें । पुनरावृत्ति नाहीं ॥ २ ॥ तें माझें परम | साँचोकारें निजधाम । हें आंवट तुज वैर्म । दाविजत असें ॥ ३ ॥ यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः । प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ २३ ॥ सम० - ज्या काळीं न पुन्हा जन्म योगियां जन्मही जयीं । तें सांगतों देवताही मार्गी भेटति ज्या क्रमे ॥ २३ ॥ आर्या - पडतां तनु ज्या काळीं जे पुनरावृत्ति अपुनरावृत्ती । पावति योगी कथितों त्या काळा एक दे मनोवृत्ती ॥ २३ ॥ ओंवी – ज्या काळीं योगी मरण पावोनि जन्मा न येती । आणि मरण झालिया पुनरावृत्ति होती । तें सकळ अर्जुना तुजप्रती । सांगेन मी ॥ २३ ॥ तेवींचि आणिकेंही एके प्रकारें । जाणतां आहे सोपारें । तरि देह सांडितेनि अवसरें । जेथ मिळती योगी ॥ ४ ॥ अथवा अवचटें ऐसें घडे । जे अनवसरें देह सांडे | तरि माघौतें येणें घडे । देहासी च ॥ ५ ॥ म्हणोनि कळशुद्धी जरी देह ठेविती । तरी ठेवितखेवीं ब्रह्मचि होती । एन्हवीं अकाळी तरी येती । संसारा पुढती ॥ ६ ॥ तैसें सायुज्य आणि पुनरावृत्ति । या दोन्ही अवर्सराअधीन आहाती । तो अवसरु तुजप्रती । प्रसंगें सांगों ॥७॥ पडलेले लांकूड जसें अग्निरूप होते, मग कांहींही केलें व कितीही शोधलें, तरी त्याचें लांकूडपण सांपडत नाहीं; ९९ किंवा, अर्जुना, एकदा उसाची साखर केली, म्हणजे मनुष्य कितीही बुद्धिमान् व कुशल असला, तरी जसा त्याला त्या साखरेचा ऊस करतां येत नाहीं; २०० परिसाने एकदा लोखंडाचे सोनें केलें, म्हणजे मग त्यानें कितीही खटपट केली, तरी त्याला तें नष्ट झालेलें लोहपण कसें परत आणतां येणार ? १ म्हणून, एकदां दुधाचें तूप बनलें, म्हणजे मग जसें दूधपण पुन्हां निश्वयेकरून येत नाहीं, तसें, ज्याला जाऊन मिळालें असतां, पुन्हां जन्ममरणाची आवृत्ति राहात नाहीं; २ तें माझें खरेंखरें सर्वश्रेष्ठ स्थान होय, हें माझ्या अंतरंगांतील गूढ इंगित मी तुला उघड करून दाखवीत आहे. ३ देहावसानसमयीं योगी पुरुष ज्या माझ्या स्वरूपाशीं मिसळतात, तें स्वरूप आणखी एका प्रकारानें सहज समजण्यासारखे आहे. ४ अथवा अकस्मात् असें घडून आलें कीं, भलत्याच अनुचित वेळीं देहपात झाला, तर पुन्हां देह धारण करणें अवश्य होते. ५ म्हणून, जर शास्त्रोक्त शुद्ध काळीं त्यांनी देहविसर्जन केलें, तर देविसर्जन करतांच ते ब्रह्मरूप होतात; परंतु जर अकाली देह पडला, तर ते पुन्हां जन्ममरणाच्या संसारांत गुंततात. ६ तेव्हां, 'सायुज्य' म्हणजे परब्रह्माशी एकरूप होणें आणि 'पुनरावृत्ति' म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यांत फिरून फिरून सांपडणें, हीं दोन्ही देहपाताच्या काटावर अवलंबून आहेत, म्हणून या विषयाच्या ओघांत मी तुला देहपाताच्या काळाचें तत्त्व कथन करतों. ७ १ निःसंशय. २ खरें खरें. ३ अंतःस्थ, गूढ ४ इंगित ५ सोपे ६ शुद्ध समय साधुन ७ ब्रह्मस्वरूपाशीं संपूर्ण ऐक्य. ● काळावर अवलंबून.