पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा २४१ चाले ॥ ८७ ॥ अर्जुना तयापरी । सुंतला ऐसा आहे शरीरीं । म्हणोनि पुरुपु गा अवधारीं । म्हणिपे जयातें ॥ ८८ ॥ आणि प्रकृति पतिव्रते । पडिला एकपत्नीव्रतें । येणेंही कारणें जयातें । पुरुपु म्हणों ये ॥ ८९ ॥ पैं वेदाचें बहुवपण । देखेचिना जयाचें आंगण । हें गगनाचें पांघरूण | होय देखा ॥ १९० ॥ ऐसें जाणूनि योगीश्वर । जयातें म्हणती परात्पर । जें अनन्यगतीचें घर । गिंवसीत ये ॥ ९१ ॥ जे तनू वाचा चित्तें । नाइकती दजिये गोष्टीतें । तयां एकनिष्ठेचें पिकतें । सुक्षेत्र जें ॥ ९२ ॥ हैं त्रैलोक्यचि पुरुषोत्तमु । ऐसा साच जयाचा मनोधर्मु । तया आस्तिकाचा आश्रमु | पांडवा गा ॥ ९३ ॥ जें निगर्वाचें गौरव । जें निर्गुणाची जाणीव । जें सुखाची राणीव । निराशांसी ॥ ९४ ॥ जें संतोपियां वाढिलें ताट । जें अचिंता अनाथाचें मायपोट | भक्ती उजू वाट । जया गांवा ।। ९५ ।। हैं एकैक सांगोनि वायां । काय फार करूं धनंजया । पैं गेलिया जया ठाया । तो ठावोचि होइजे ॥ ९६ ।। हिंवचिया झुळुका | जैसें हिंवचि पडे उष्णोदका । कां समोर जालिया अंर्का । तमचि प्रकाशु हाय ॥ ९७ ॥ तैसा संसार जया गांवा । गेला सांता पांडवा | होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ॥ ९८ ॥ तरी अनीमाजीं आलें | जैसें इंधनचि अनि असतात, ८७ अर्जुना, त्याप्रमाणें या शरीरांत निजल्यासारखा असल्यामुळे ज्याला पुरुष' हैं नांव देण्यांत येतें; ८८ आणि पतिव्रता जी प्रकृतिमाया तिच्या पंगस्तीस हा एकपत्नीव्रतानें गेल्यामुळेही याला 'पुरुष' हें नांव देतां येण्यासारखे आहे. ८९ आणि, वेद इतके व्यापक बुद्धीचे असतांही, त्यांना ज्याचें अंगणही दिसत नाहीं, मग प्रत्यक्ष घराची वार्ता दूरच राहिली, जें इतकें व्यापक आहे कीं गगनालाही झांकून टाकतें; १९० असें मनांत आणून ज्याला श्रेष्ठ योगिजन 6 परात्पर म्हणतात; जें एकनि एकांतिक भक्ताचें घर स्वतःच शोधीत येतें, ९१ जे कायावाचा. मनेकरून दुसऱ्या गोष्टीकडे लक्षच देत नाहींत, अशा एकनिष्ठ भक्तांचें जें निरंतर पिकणारे सुपीक शेत आहे; ९२ हें सर्व त्रिभुवन म्हणजे ब्रह्मच आहे, असा ज्याच्या मनाचा स्वाभाविक धडा झाला आहे, त्या श्रद्धावंताचा जें आरामस्थान आहे; ९३ जें निरभिमान्याला थोरपणा देतें, गुणहीनाला ज्ञान देतें, आणि निःस्पृहाला सुखाचें साम्राज्य देतें; ९४ जें संतुष्टाला अन्नाचे वाढलेलें ताट होतें, जें संसाराविषयीं निश्चिंत असलेल्या निराश्रिताचें मातेप्रमाणे रक्षण करतें, आणि भक्ति ही ज्याच्या घराला पोचण्याची सरळ वाट आहे, ९५ अर्जुना, आतां असें एकेक वर्णन करून, कशाला उगीच पाल्हाळ लावावा ? एकंदरींत, ज्या ठिकाणीं गेलें असतां जीवानें तद्रूपच होऊन जावें; ९६ थंडीच्या झुकने जसे ऊन पाणीही थंडगार होतें, किंवा समोर सूर्य आला म्हणजे जसा अंधाराचाच प्रकाश होतो, १९७ तसा ज्या स्थळीं संसार गेला असतां, त्याचा मोक्षच होतो; ९८ अथवा अग्नींत १ निजल्यासारखा. २ अधीन झाला. ३ संसाराविषयीं उदासीन असणान्या ४ थंडीच्या ५ सूर्याला. ३१