पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४० सार्थ श्रीज्ञानेश्व अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् । यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ २१ ॥ पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया । यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥ १२॥ सम० – जो अक्षर निराकार तो श्रेष्ठगति बोलिजे । न येति जेथ जे गेले माझे परम धाम तें ॥ २१ ॥ तो तो अद्वैतभक्तीनें पार्था पुरुष पाविजे । ज्याच्या स्वरूपीं हीं भूतें ज्याणं हे व्यापिले जग ॥ २२ ॥ आर्या - अव्यक्त अक्षरहि जो परमा गति म्हणति त्यासि अनघा रे । तें माझें धाम परम ज्यातें पावुनि न येति माघारे ॥२१॥ तो परम पुरुष सखया सुलभ असे जो अनन्य भक्तीनें । भूर्ते ज्यांत जयानें हें सर्व व्याप्त जाण युक्तीनें ॥२२॥ ओव्या-अव्यक्त अक्षर ऐसे बोलती। तीच माझी परम गति । तेथें पावलिया पुढती । तयां जन्म नाहीं ॥ २१ ॥ तो परम पुरुष जाण पार्था । तया भक्ति पाविजे तत्वतां । भूर्ती प्रपंच निरुता । ज्यानें जग व्यापिलें ॥ २२ ॥ जयातें अव्यक्त म्हणों ये कोडें । म्हणतां स्तुति हैं ऐसें नावडे । जें मनबुद्धी न सांपडे । म्हणऊनियां ॥ ७२ ॥ आणि आकारा आलिया जयाचें । निराकारपण न वचे । आकारलोपें न विसंचें । नित्यता गा ॥ १८० ॥ म्हणोनि अक्षर जें म्हणिजे । तेवींचि म्हणतां बोधुही उपजे । जयापरौता पैसे न देखिजे । यालागीं परमगति जें ॥ ८१ ॥ परि आघवा इहीं देहपुरीं । आहे निजेलियाचे परी । जे व्यापारु करवी ना करी । म्हणऊनियां ॥ ८२ ॥ एहवीं जे शारीरचेष्टा । त्यांमाजी एकही ने ठेके गा सुभटा । दाही इंद्रियांचिया वाटा | वाहतचि आहाती ॥ ८३ ॥ उकलूनि विषयांचा पेटीं । होत मनाचा चोहटा । तो सुखदुःखाचा राजवांटा । भीतराहि पावे ॥ ८४ ॥ परि रावो पहुडलिया सुखें । जैसा देशींचा व्यापारु न ठके । प्रजा आपुलालेनि अभिलाखें । करितचि असती ॥ ८५ ॥ तैसें बुद्धीचें हन जाणणें । कां मनाचें घेणेंदेणें । इंद्रियांचें करणें । स्फुरण वायूचें ॥ ८६ ॥ हे देहक्रिया आघवी । न करितां होय बरवी । जैसा न चलवितेनि रवी । लोकु ज्याला कौतुकाने समजुतीसाठीं पाहिजे तर 'अव्यक्त ' म्हणावें, परंतु हें वर्णन ज्याच्यासंबंधें योग्य वाटत नाहीं, कारण तें मनाच्या व बुद्धीच्या आटोक्यांतच येत नाहीं, ७९ आणि आकार धारण केला असतांही ज्याचें निराकारपण लोपत नाहीं, व आकाराचा लोप झाला असतांही, जें शाश्वतपणानें राहातें. १८० 6 या कारणास्तव ज्याला अक्षर' म्हणतात; आणि या नांवानेंच त्याच्या नाशरहितपणाचा बोध होतो, व ज्याच्या पलीकडे वाटच खुंटत असल्यामुळें ज्याला 'परमगति' म्हणतात, ८१ परंतु जें या सर्व देहरूपी पुरांत निजल्यासारखे आहे, कारण तें कोणतेही कर्म करवीत नाहीं किंवा करीत नाहीं, ८२ तरीपण, अर्जुना, शरीराचे जे व्यापारव्यवहार आहेत, त्यांपैकी एकही खळत नाहीं, दाही इंद्रियांचे मार्ग सारखे वाहात आहेत; ८३ मनाच्या चव्हाट्यावर विषयांची बाजारपेठ उघडून तेथल्या सुखदुःखाचा राजभाग आंत राहणाऱ्या जीवालाही लाभतो. ८४ परंतु राजा सुखानें घोरत पडला, म्हणून जसा देशांतला व्यापारव्यवहार खुंटत नाहीं, प्रजाजन आपापल्या आवडीप्रमाणें उद्योग करीतच असतात, ८५ त्याचप्रमाणें बुद्धीचें जाणणें, मनाची देवघेव, इंद्रियांचीं कर्मों, वायूचे चलनवलन, ८६ इत्यादि देहाचे व्यापार, ज्यानें न करवितांच, नीटपणे चालत राहातात; सूर्याने न चालवितांही जसे लोक आपल्यापरी चालत १ योग्य वर्णन वाढत नाही. २ विस्कटत. ३ प्रदेश, मार्ग. ४ कारण. ५ खुंटत नाहीं. ६ पेठ, बाजार.