पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा २३९ परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः । यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥२०॥ सम० - सत्ता निराकार तया भूतां प्रकृतिहीहुनी निराळी सर्वभूर्ती जे न नासे विश्व नासतां ॥ २० ॥ आर्या - अव्यक्तव्याहुनि भाव असे पर सनातन दुजा तो। भूतांच्या नाशही न कधींही पांडवा लया जातो ॥ २० ॥ ओवी - मायेपासूनि ईश्वर । अव्यक्त व्यक्त नित्य स्थिर । सर्व भूतांत निरंतर तो न नाशे जग नासतां ॥ २० ॥ तेथ समविपम न दिसे कांहीं । म्हणोनि भूतें हे भाप नाहीं । जेविं दूधचि जाहालिया दहीं | नामरूप जाय ॥ १७० ॥ तैंविं आकारलोपासरिसें । जगाचें जगपण भ्रंशे । परि जेथ जाहालें तें जैसें । तैसेंचि असे ॥ ७१ ॥ तैं तया नांव सहज अव्यक्त । आणि आकारा वेळीं तेंचि व्यक्त । हें एकास्तव एक सूचित । एन्हवीं दोनी नाहीं ॥ ७२ ॥ जैसें आटलिया स्वरूपें । आटलेपण ते खोटी म्हणिपे । पुढती तो घनाकारु हारपे । जे वेळी अळंकार होती ॥ ७३ ॥ ह्रीं दोन्ही जैशी होणीं । एकीं साक्षीभूत सुवणीं । तैसी व्यक्ताव्यक्ताची कर्डसणी | वस्तूच्या ठायीं ॥ ७४ ॥ तें तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत । या दोहीं भावाअतीत | अनादिसिद्ध ॥ ७५ ॥ जें हैं विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे । अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थ जैसा ॥ ७६ ॥ पाहें पां तरंग तरी होत जात । परि तेथ उदक तें अखंड असत । तेवीं भूताभावीं नाशिवंत । अविनाश जें ॥ ७७ ॥ ना तरी आटतिये अळंकारीं । नाटतें कनक असे जयापरी । तेवीं मरतिये जीवाकारी । अमर जें आहे ॥ ७८ ॥ या साम्यांत न्यूनाधिक असें कांहींच नसतें, म्हणून त्याचे ठायीं 'भूतं ' या शब्दालाही जागा नसते. जसें दूध दह्याच्या रूपाला आलें म्हणजे दुधाचें नामरूप लोपून जातें, तद्वत् जगाच्या आकाराचा साम्यांत लोप झाला, कीं, जगाचें जगपणच मावळते; तरीपण तें साकार ज्या बीजांतून उद्भवलें होतें, त्या बीजांत साम्य स्थितीत तें जसेंच्या तसेंच राहतें १७०, ७२ त्या वेळी त्याला 'अव्यक्त' हैं स्वाभाविक नांव आहे, आणि त्या अव्यक्तांतून जें आकारलें जातें, तें ' व्यक्त ' होय. हीं दोन नांवें केवळ समजुतीकरितां दिली जातात, वास्तविक पाहातां, तीं कांहीं दोन वस्तू नाहींत. ७२ जसें आटलेल्या स्वरूपांत सोन्याला 'लगड ' म्हणतात, आणि नंतर त्याचे अलंकार झाले म्हणजे तो लगडीचा बोजड आकार नाहींसा होतो, ७३ परंतु हे जसे दोन्ही विकार मूळभूत एकस्वरूप सोन्यावरच घडतात, त्याप्रमाणेंच व्यक्त आणि अव्यक्त या दोन्ही विकृति एकाच परब्रह्माच्या ठायीं होतात. ७४ परंतु तें परब्रह्म व्यक्त नाहीं, आणि अव्यक्तही नाहीं, तें नित्य नाहीं, आणि नाशवंतही नाहीं. तें या दोन्ही विकारांपलीकडचें, अनादिसिद्ध आहे. ७५ जें सर्व विश्वच होऊन राहातें, परंतु विश्व न झालें असतां जं नष्ट होत नाहीं; लिहिलेलीं अक्षरें पुसलीं, तरी जसा अर्थ पुसला जात नाहीं, ७६ किंवा लाटा उत्पन्न होतात व लोपून जातात, परंतु पाणी मात्र स्वस्वरूपानें अखंड राहते, तसं भूतांचा नाश झाला असतांही जें अविनाशी असतें; ७७ अथवा, आटणाऱ्या अलंकारांत जसें न आटणारं सोनं असतें, तसं जीवरूपी साकाराचा अंत झाला असतांही, अमरच असतें; ७८ १ लगड. २ भेदभाव, वेगवेगळेपणा.