पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी तये ब्रह्मभुवनीं दिवसें पोहे । ते वेळीं गणना केही न समाये । ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ॥ १६० ॥ पुढती दिहांची चौपाहारी फिटे | आणि हा आकारसमुद्र आटे । पाठीं तैसाचि मग पाहांटे | भरों लागे ॥ ६१॥ शारदीयेचिये प्रवेश | अत्रें जिरती आकाशीं । मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ॥ ६२ ॥ तैसी ब्रह्मदिनाचिये आदी । हे भूतसृष्टीची मांदी | मिळे जंव सहस्रावधी । निमित्त पुरे || ६३ || पाठीं रात्रीचा अवर्सेरु होये । आणि विश्व अव्यक्तीं लया जाये । तोही युगसहस्र मोटका पाहे । आणि तैसेंचि रचे ॥ ६४ ॥ हें सांगावया काय उपपत्ति । जें जगाचा प्रळयो आणि संभूति । इये ब्रह्मभुवनींचिया होती । अहोरात्रामाजीं ॥ ६५ ॥ कैसें थोरिवेचें मान पाहें पां । जो सृष्टिबीजाचा साटोपा । परि पुनरावृत्तीचिया मापा । शीग जाहला ।। ६६ ।। एहवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा । तिये गांवींचा गा पसारा । तो हा दिनोदयीं एकसरां । मांडतु असे ॥ ६७ ॥ पाठीं रात्रीचा समो पावे । आणि अपैसाचि सांवे । म्हणिये जेथींचें तेथ स्वभावें । साम्यासि ये ॥६८॥ जैसें वृक्षपण बीजासि आलें । कीं मेघ हें गगन जाहालें । तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ॥ ६९ ॥ त्या ब्रह्मलोकांत जेव्हां दिवस उजाडतो, तेव्हां ज्याची गणनाही करतां येत नाहीं, असें हैं निराकार ब्रह्माचें नामरूपात्मक साकार विश्व बनतें. १६० नंतर त्या ब्रह्मभुवनांतील दिवसाचे चार प्रहर पुरे झाले, म्हणजे ह्या नामरूपात्मक साकार विश्वाचा पसारा एकदम ओसरतो, आणि, पुन्हां जेव्हां तेथें दिवस उजाडतो, तेव्हां हा पसारा पुन्हां मांडूं लागतो. ६१ शरद् ऋतूचा प्रारंभ झाला म्हणजे अभ्र आकाशांतल्या आकाशांत विरून जातात, आणि पुढें ग्रीष्मऋतूच्या अंतीं तीं जशीं पुन्हां उठतात, ६२ त्याचप्रमाणे या पंचभूतात्मक सृष्टीचा समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभीं उदय पावतो आणि त्या दिवसाची सहस्रयुग चौकड्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत हा सृष्टिसमुदाय अस्तित्वांत असतो. ६३ मग ब्रह्मदेवाच्या रात्रीचा समय आला, म्हणजे हैं भूतात्मक साकार विश्व अव्यक्त ब्रह्मतत्त्वांत लोपून जाते. हा ब्रह्मदेवाचा रात्रिकाळही अवघा सहस्रयुग चौकड्यांचाच आहे. तो सरला, म्हणजे नामरूपात्मक विश्वाची रचना पुन्हां पूर्वीप्रमाणेच होते. ६४ ह्या सांगण्यांतला मतलब काय ? तर ह्या ब्रह्मभुवनाच्या एका दिवसरात्रीत जगाचा उदय व प्रय होतो. ६५ या ब्रह्मभुवनाचा व्याप इतका मोठा आहे, कीं, त्यांत सर्व विश्वाचें बीज सांठवलेलें आहे, तरी पण जन्ममरणाच्या फेऱ्याच्या मापट्यांत या ब्रह्मभुवनाचीही अखेर शगि लागतेच ! ६६ खरें म्हटलें तर, अर्जुना, त्या ब्रह्मदेवाच्या नगरांतला हा विश्वरूपी बाजार दिवस उजाडल्याबरोबर मांडला जातो, ६७ आणि रात्रिकाळ पातला म्हणजे हा आपोआप उठतो, म्हणजे मूळबीजांत जेथल्या तेथेच साम्याला पावतो. ६८ ज्याप्रमाणें वृक्षपण शेवटीं बीजांत लीन होते किंवा मेघाचें पर्यवसान गगनरूपांत होतें, त्याप्रमाणें अनेकत्वाचे भेदभाव ज्या स्थितींत एकरूपानें सांठविले जातात, त्या स्थितीला 'साम्य' हें नांव आहे. ६९ १ दिवस उगवतो. २ दिवसाचे चार प्रहर. ३ समूह ४ वेळ. ५ लहान. ६ उजाडतें ७ सांदवण, भांडार ८ समय, वेळ,