पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा २३७ स्वमींचेनि महापूरें । तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ॥ ५३ ॥ एहवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थायीयांचे धुरे । ब्रह्मभुवन गा चवरें। लोकाचळाचें ॥ ५४ ॥ जिये गांवींचा पेहारुदिवोवेरी । एका अमरेंद्राचें आयुष्य न धेरी । विळोनि पातीं उठी एकसरी । चवदाजणांची ॥ ५५ ॥ सहस्रयुगपर्यन्तमहर्यद् ब्रह्मणो विदुः । रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ १७ ॥ सम० - युग सहस्र दिवस ब्रह्म्याची रात्रिही तसी । जाणती तेथ जे गेले क्रममुक्त्यर्थं राहिले ॥ १७ ॥ आर्या - सहस्रयुगपर्यंत ब्रह्म्याचा दिवस बोलती त्याला । तो युगसहस्ररात्री विदित अहोरात्र काळवेश्याला ॥ १७ ॥ ओवी - सहस्रयुगपर्यंत । ब्रह्मयाचा दिवस होत । तैसाच रात्रीचा संकेत ही अहोरात्रिज्ञानी जाणती ॥ १७ ॥ जैं चौकडिया सहस्र जाये । तैं ठायेठावो विळेचि होये । आणि तैसेंचि सहस्रवरिये पाहें । रात्री जेथ ।। ५६ ।। येवढें अहोरात्र जेथींचें । तेणें न लोटती जे भाग्याचे। देखती ते स्वर्गीचे । चिरंजीव ॥ ५७ ॥ येरां सुरगणांची नवाई | विशेष सांगावी तेथ काई । मुद्दल इंद्राचीचि दशा पाहीं । जे दिहाचे चौदा ॥ ५८ ॥ परि ब्रह्मयाचियाहि आठां पहारांतें । आपुलिया डोळां देखते । जे आहाति गा तयांतें । अहोरात्रविद म्हणिपे ॥ ५९ ॥ अव्यक्ताद्वयक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे । रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥ १८ ॥ भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते । रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ १९॥ सम० - प्रकृतीपासुनी व्यक्ती होती ब्रह्मदिनागर्मी। लीना प्रकृतितवीं त्या होती आरंभतां निशा ॥ १८ ॥ तोचि हा ग्राम भूतांचा होतो होऊनि नासतो । रात्रीं अवश हा लीन दिनारंभींच होतसे ॥ १९ ॥ आर्या- होती दिवसारंभी अव्यक्तांतून सर्वही व्यक्ती । रात्रीच्या आरंभीं त्या होती लीन त्याचि अव्यक्तीं ॥ १८ ॥ भूतांचा संघहि हा होउनि होऊनिही सदा होतो । रात्रींत लीन होतो दिवसां उत्पन्न परवरों हो तो ॥१९॥ भव्या-अव्यक्त जे असती । ते ब्रह्मदिवसा व्यक्त होती । रात्रि झालिया प्रळय पावती । अव्यक्ताचे ठायीं ॥ १८ ॥ ही पंचभूतांची सृष्टी । उपजे जाय पुढतपुढती । नाश पावे ब्रह्मदिनांतीं । पुन्हां दिवसीं उत्पत्ति होय अर्जुना ॥ १९ ॥ नाहीं, तसे जे मट्टूपाला येऊन पोंचले, ते संसाराच्या मळानें कधींही लडबडत नाहींत. ५३ व्यवहारदृचा जें ब्रह्मभुवन या नामरूपात्मक जगाचें मस्तक आहे, चिरस्थायी गुणांत अत्यंत श्रेष्ठ आहे, व विश्वरूपी पर्वताचें अत्युच्च शिखर आहे, ५४ ज्या ब्रह्मभुवनांचा एक प्रहर दिवस होईपर्यंत एका इंद्राचेही आयुष्य टिकत नाहीं, आणि एक दिवस पुरा होतो तेवढ्या अवकाशांत चवदा इंद्रांची पंगत क्रमाक्रमानें उदयाला येऊन, तिची ओवाळणीही होते, ५५ जेव्हां चार युगांच्या हजार चौकड्या जातात, तेव्हां कोठें ज्या ब्रह्मभुवनाचा एक दिवस होतो, आणि त्याप्रमाणेंच आणखी हजार चौकड्या पार झाल्या म्हणजे एक रात्र होते, ५६ असें जेथें दिवसरात्रीचं मान आहे, तेथील भाग्यवान् पुरुष मरत नाहींत, तर ते स्वर्गातले चिरंजीव होऊन सर्व पाहात असतात ! ५७ तेथें लुंग्यासुंग्या देवगणांची गोष्ट काय सांगावी ? अहो, त्यांचा मुख्य जो इंद्र, त्या प्रत्यक्ष इंद्राचीच काय दशा उडते, पहा ! एका दिवसांत चवदा इंद्र ! ५८ परंतु ब्रह्मदेवाच्याही आठ प्रहरांच्या दिवसाला जे आपल्या डोळ्यांनी पाहतात, त्यांना ' अहोरात्रविद' हें नांव देतात. ५९ १ एक प्रहर दिवस होईपर्यन्त २ टिकते. ३ दिवसांत ४ पंक्ति, ५ दिवस,