पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा २३५ आत्मबोधाचे पांजिरां । सूयें तयांतें ॥ ३२ ॥ वरि आपुलिया स्मरणाची वाइली । ह्रींवऐसी करीं साउली । ऐसेनि नित्य बुद्धि संचली । मी आणीं तयांतें ॥ ३३ ॥ म्हणोनि देहांतींचे सांकडें । माझियां कहींचि न पडे । मी आपुलियांतें आपुलीकडे । सुखेचि आणीं ॥ ३४ ॥ वरचील देहाची गर्वेसणी फेडुनी । आहाच अहंकाराचे रज झाडुनी । शुद्ध वासना निवडुनी । आपणां मेळवीं ॥ ३५ ॥ आणि भक्तां तरी देहीं । विशेष एकैवकीचा ठाव नाहीं । म्हणऊनि अव्हेरू करितां कांहीं । वियोग ऐसा न वाटे ॥ ३६ ॥ ना तरी देहांतींचि मियां यावें । मग आपण यांतें न्यावें । हेंही नाहीं जे स्वभावें । ते आधीचि मज मीनले ॥ ३७ ॥ येरी शरीराचिया सलिलीं । असतेपण हे साउली | वांचूनि चंद्रिका ते ठेली | चंद्रींचि आहे ॥ ३८ ॥ ऐसे जे नित्ययुक्त । तयांसि सुलभ मी सतत । म्हणऊनि देहांती निश्चित | मीच होती ॥ ३९ ॥ मग क्लेशतरूची वाडी । जे तापत्रयामीची सगंडी । जे मृत्युकाकासि कुरोंडी | सांडिली आहे ॥ १४० ॥ जें दैन्याचें दुभतें | जें महाभयातें वाढवितें । जें सकळ दुःखाचें पुरतें | भांडवल ॥ ४१ ॥ जें पीडा होईल, या भीतीनं आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यांत त्यांस मी सुरक्षित ठेवतों, ३२ आणि त्यांच्यावर आत्मस्मरणाची शांत व शीतळ सावली करतों, आणि अशा प्रकारें मी त्यांना त्यांची बुद्धि निरंतर स्थिर व शांत करून देतों. ३३ म्हणून, माझ्या भक्तांना देहावसानकाळींचें संकट मुळींच बाधत नाहीं. त्या माझ्या जिवलगांना मी आपल्या स्वरूपात सहजच आणतों. ३४ त्यांच्यावर असलेलें शरीराचे बाह्य कवच काढून टाकून, खोट्या अहंभावाची धूळ झाडून, आणि शुद्ध वासनेला निर्लेप राखून, त्यांना मी आपल्या स्वरूपांत मिळवून घेतो. ३५ शिवाय, भक्तांनाही देहासंबंधें ऐक्याचा आपलेपणा फारसा वाटत नसल्यामुळे, त्याचा त्याग करतांना त्यांना वियोगाचे दुःख होत नाहीं. ३६ त्याप्रमाणेच देहपात झाल्यावरच मीं त्यांच्या सन्निध यावें आणि त्यांना आत्मस्वरूपाला न्यावें हेंही कांहीं त्या भक्तांच्या चित्तांत नसतं, कारण देहधारी असतांनाच ते माझ्या रूपांत मिसळलेले असतात. ३७ खरोखर पाहिलें, तर त्यांचं जगांतील अस्तित्व म्हणजे शरीररूपी पाण्यांतील केवळ पडच्छायाच होय. जलांत प्रतिबिंबित झालेलें चांदणं जसें जल नाहींसें झालें म्हणजे केवळ चंद्राचे ठायीं सत्यत्वानें असतें, तसेंच हैं शरीररूपी जल ओसरून नाहींसें झालें, म्हणजे ते सत्यत्वानं आत्मस्वरूपींच असतात. त्यांचं जगांतील अस्तित्व खरें नसून, तें प्रतिबिंबासारखं असतें, आणि त्याचें खरें स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूपच होय. ३८ अशा रीतीनं जे निरंतर मनूप झालेले असतात, त्यांना मी नेहमींच अनायासें प्राप्त होतों, म्हणून देहावसानीं ते माझ्या रूपाला पावतात, यांत शंका नाहीं. ३९ मग जं शरीर केशवृक्षांचं आगर आहे, जें आध्यात्मिक, आधिदैविक, व आधिभौतिक, अशा तीन्ही तापांची केवळ शेगडीच आहे, जें मृत्युरूपी कावळ्यास टाकलेला बटि आहे, १४० जं दैन्याला विपुल प्रसवतें, दुःखाला वाढवतें व सर्व १ शांत, २ शीतळ अशी, ३ स्थिर. ४ आच्छादन, कवव. ५ ऐक्याचा. ६ शेगडी, ७ बलि