पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः । तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ १४ ॥ मामुपत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् । नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धि परमां गताः ॥ १५ ॥ सम० नव्हे इतर मी ऐशा चित्तें मातें स्मरे सदा । पार्था सुलभ मी त्याला योग जो नित्य योजिला ॥ १४ ॥ मातें पावोनियां जन्म दुःखाचें घर नश्वर । न पावती पुन्हां संत थोर जे गति पावले ॥ १५ ॥ आर्या - मी अन्य नव्हे ऐशा चित्तें जो स्मरतसे सदा मातें । पार्था सुलभ तया मी योग जो नित्य योजिला त्यातें ॥ १४॥ मातें पावुनि पुनरपि नश्वर जें जन्मदुःखबीज कृषी । पावति ते न महात्मे गेले जे परम सिद्धिलागि ऋषी ॥ १५ ॥ ओव्या-चित्त ठेविजे माझे ठायीं । जे मज ध्याती नित्य पाहीं । तयां मी सुलभ होईं । योगयुक्त म्हणूनि पार्था १४ योगयुक्त जे पावले मज । तयांसि पुनर्जन्म नाहीं सहज । ऐसें हें आहे चोज । थोर गति पावल्याचें ||१५|| जे विषयांसि तिळांजळी देऊनी । प्रवृत्तीवरी निगड वाउनी । मातें हृदयीं सूनी । भोगिताती ॥ २४ ॥ परि भोगितया आराणुका । भेटणें नाहीं क्षुधादिकां । तेथ चक्षुरादि रंकां । कवण पाडु ||२५|| ऐसे निरंतर एकवटले | जे अंतःकरणी मजशी लिगटले । मीचि होऊनि आटले । उपासिती ॥ २६ ॥ तयां देहावसान जैं पावे । तैं तिहीं मातें स्मरावें । मग म्यां जरी पावावें । तरि उपास्ति ते कायसी ॥ २७ ॥ पैं रंकु एक आडलेपणें । काकुळती धांव गा धांव म्हणे । तरि तयाचिये ग्लानी धांवणें । काय न घडे मज ॥ २८ ॥ आणि भक्तांही तेचि दशा । तरी भक्तीचा सोस कायसा । म्हणऊनि हा ध्वनी ऐसा। न वाखाणावा ॥ २९ ॥ तिहीं जे वेळीं मी स्मरावा । ते वेळीं स्मरला की पावावा । तो आभारुही जीवा । साहवेचि ना ॥ १३० ॥ तें ऋणवैपण देखोनि आंगीं । मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागीं । भक्तांचिया तनुत्यागीं । परिचर्या करीं ॥ ३१ ॥ देहवैकल्याचा वारा । झणें लागेल या सकुमारां । म्हणोनि जे विषयांना मारून आणि बंधक कर्मप्रवृत्तीला खोड्यांत अडकवून, मला निरंतर हृदयांत वागवून माझ्या स्वरूपाचें सुख उपभोगितात, २४ आणि हा सुखोपभोग सेवीत असतां ज्यांना तहानभूकही भासत नाहीं, मग डोळे वगैरे इतर मिरकुटांची गोष्टच बोलावयास नको, २५ अशा प्रकारें जे निरंतर माझ्या स्वरूपांत एकाग्रपणे मिसळलेले आहेत, जे अंतर्यामीं माझ्याशी लगटून मत्स्वरूप होऊन राहिले आहेत, २६ त्यांनी देहपातसमयीं माझें स्मरण केलें तरच मी त्यांना पावावें, असें जर होईल, तर मग उपासनेची महती ती काय राहिली ? २७ अरे, एकादा दीन प्राणी संकटांत सांपडून, “धांव रे, धांव, नारायणा, !” म्हणून माझा काकुळतीनें धांवा करील तर मी त्याच्या दुःखानें कळवळून त्याच्या साहाय्यासाठीं धांवणें करणार नाहीं काय ? २८ आणि एकनि भक्तांचीही जर मी अशी अवस्था होऊं दिली, तर मग भक्तीची हौस कोणाला राहील बरं ? म्हणून मी म्हणतों, कीं अशा प्रकारच्या शंकेला तूं क्षणमात्रही आपल्या चित्तांत थारा देऊ नकोस. २९ अरे, ते भक्त ज्या वेळीं माझं स्मरण करतील, त्याच वेळीं मीं धांव ठोकून त्यांच्याजवळ सिद्ध झाले पाहिजे; अरे, त्यांच्या त्या एकनिष्ठ उपासनेचा भार एवीं मला सहनच व्हावयाचा नाहीं ! १३० ते भक्तीचं ऋण माझ्या शिरावर असल्यामुळे ते फेडण्यासाठी भक्तांच्या अंतकाळीं त्यांच्या सेवेला मी मोठ्या लगबगीनं सिद्ध होतो. ३९ कदाचित् या माझ्या कोमट सोमळ भक्तांना शरीराच्या दुर्बलपणानें १ खोडा, शंखला,