पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा २३३ प्रणवुचि करावा । मग अनुवृत्तिपंथें आणावा । मूर्ध्निवरी ॥ १४ ॥ तेथ आकाशीं मिळे न मिळे | तैसा धरावा धारणावळें । जंव मात्रात्रय मावळे | अर्धविंवीं ॥१५॥ ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् । यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥ १३ ॥ सम० - ० है एकाक्षर ब्रह्म जपे मातें स्मरे असा । अर्चिरादि पर्थे जाय ब्रह्मासह तया गती ॥ १३ ॥ आर्या - जो प्रणवासहि जपतो मातें तैसाच नित्य जो स्मरतो मग अर्चिरादिमार्गे जाउनि सहब्रह्म या गती लभतो ॥ १३॥ ओवी - २० मिति ब्रह्म उच्चारितां । माझें स्मरण करितां । जो होय देह त्यजिता । तो पावे परम गतीस ॥ १३ ॥ तंववरी तो समीरु | निराळीं कीजे स्थिरु | मग लग्नीं जेविं ॐकारु । विंबींचि विलसे ।। १६ ।। तैसें ॐ हैं स्मरों सरे । आणि तेथेंचि प्राणु पुरे । मग प्रणवांतीं उरे । पूर्णघन जें ॥ १७ ॥ म्हणोनि प्रणवैकनाम | हें एकाक्षर ब्रह्म जो माझें स्वरूप परम | स्मरतसांता ॥ १८ ॥ यापरी त्यजी देहातें । तो त्रिशुद्धी पावे मातें । जया पावणया परौतें । आणिक पावणें नाहीं ॥१९॥ तेथ अर्जुना जरी विषायें । तुझ्या जीवीं हन ऐसें जाये। ना हें स्मरण मग होये । कायसयावरी अंतीं ।। १२० ।। इंद्रियां अनुघड पडलिया । जीविताचें सुख बुडालिया | आंतुवाहेरी उघडलिया । मृत्युचिन्हें ॥ २१ ॥ ते वेळीं वैसावेंचि कवणें । मग कवण निरोधी करणें । तेथ काह्याचेनि अंतःकरणें । प्रणव स्मरावा ।। २२ ।। तरि गा ऐशिया ध्वनी । झणें थारा देशी हो मनीं । पैं नित्य सेविला मी निदानीं । सेवकु होयें ॥ २३ ॥ प्राणवायूच्या द्वारें प्रणवाचें म्हणजे ॐकाराचें ध्यान करावें, आणि क्रमाक्रमानें त्या प्राणवायूला ब्रह्मरंधापर्यंत आणावा. १४ ब्रह्मरंधाशीं प्राणाला आणल्यावर, तेथें तो धारणेच्या बळानें असा आवरावा कीं तो ब्रह्माकाशांत मिळतो न मिळतो असा राहील. यानंतर अ-उ-म् या तीन मात्रांचा अर्धमात्रेत लय होईपर्यंत १५ तो प्राणवायु चिदाकाशांत निश्चळ करावा, म्हणजे ऐक्य प्राप्त होतांक्षणींच तो सर्व ओंकार मूळब्रह्मांत ठसलेला दिसेल. १६ असें झालें म्हणजे ओंकाराचें स्मरण खुंटतें आणि प्राणवायूही लीन होतो; यानंतर ओंकाराच्या पलीकडे असणारें केवळ शुद्ध ब्रह्मानंदस्वरूप मात्र टिकून राहातें. १७ म्हणून ओंकार हेंच माझें एकाक्षर ब्रह्मस्वरूप होय. या माझ्या स्वरूपाचें चिंतन करीत असतांना, १८ जो हा जड देह सोडतो, तो निःसंशय माझ्या शुद्ध स्वरूपाला पावतो, आणि हें स्वरूप गांठलें, म्हणजे याच्यापलीकडे गांठण्यासारखें कांहींच उरत नाहीं. १९ आतां, अर्जुना, यदा कदाचित तुझ्या चित्तांत अशी शंका उद्भवेल कीं, "अंतकाळीं हें स्मरण घडेल, असें कशावरून समजावें ? १२० इंद्रियें विस्कटून गेलीं आहेत, जीविताचें सुखसमाधान नष्ट झालें आहे, अंतर्बाह्य मृत्यूनें ग्रासल्याचीं लक्षणें स्पष्ट उमटलीं आहेत, २१ अशा वेळी आसन कोणीं मांडावें ? इंद्रियनिरोध कोणी करावा ? आणि कोणाच्या अंतःकरणानें ओंकाराचें चिंतन करावें ? हें सर्वच अशक्य !" २२ कदाचित् अशा प्रकारच्या शंकेला तूं आपल्या चित्तांत थारा देशील, पण माझें नेहमी अखंड चिंतन ठेवलें म्हणजे मी आपण होऊन अंतकाळीं दासासारखा कामाला येतो हे लक्षांत ठेव. २३ १ ओंकार. २ क्रमाक्रमानें ३ कदाचित् ४ झांपड, विस्कटलेली स्थिति ५ इंद्रियें. ३०