पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३२ सार्थ श्रीज्ञानेश्वरी उलंडूनि । जे सर्वेन्द्रियां प्रायश्चित्त देऊनि । आहाति देहाचिया वैसोनि । झाडातळीं ॥ ४ ॥ ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात | निष्कामास अभिप्रेत । सर्वदा जें ॥ ५ ॥ जयाचिया आवडी । न गणिती बह्मचर्यादि सांकडी । निष्ठुर होऊनि वापुडीं । इंद्रियें करिती ॥ ६ ॥ ऐसें जें पद । दुर्लभ आणि अगाध । जयाचिये थडिये वेद । चुबुकळिले ठेले ॥ ७ ॥ तें ते पुरुष होती । जे यापरी लया जाती । तरी पार्था हेचि स्थिती । एक वेळ सांगों ॥ ८ ॥ तेथ अर्जुनें म्हणितलें स्वामी । हेंचि म्हणावया होतों पां मी । तंव सहजें कृपा केली तुम्हीं । तरी बोलिजो कां ॥ ९ ॥ परि बोलावें तें अति सोहोंपें । तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें । तुज काय नेणों संक्षेपें । सांगेन ऐक ॥ ११० ॥ तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवे मोडे । हैं हृदयाचिया डोहीं बुडे । तैसें कीजे ॥ ११ ॥ सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च । मूर्ध्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥११॥ सम० – कोंडूनि सकळ द्वारे हृदयीं मन कोंडुनी । धरूनि मस्तकीं प्राण अनुष्ठी योगधारणा ॥ १२॥ आर्या - रोधुनि सर्व द्वारे हृदयामाजी मनासही दमुनी । ब्रह्मांडीं प्राण अणुनि अधिटुनी योगधारणेस मुनी ॥ १२ ॥ ओवी - सर्व द्वारे रोधूनी । मन हृदयीं ठेवूनी । प्राण मस्तकासि नेऊनी । अनुष्ठिती योगी योग ॥ १२ ॥ परी हैं तरी घडे । जरी संयमाचीं अखंडें । सर्वद्वारीं कवाडें । कळासती ॥ १२ ॥ तरी सहजें मन कोंडलें । हृदयींचि असेल उगलें । जैसें करचरणीं मोडलें । परिवरु न संडी || १३ || तैसें चित्त राहिल्या पांडवा । प्राणाचा 66 जे उदासीनवृत्तीनें देहाच्या सांवलीला बसले आहेत, ४ असे विरक्त पुरुषही ज्याच्याकरितां निरंतर उत्सुक झालेले असतात, आणि निरिच्छ पुरुषांनाही ज्याची इच्छा उत्पन्न होते, ५ ज्याच्या आवडीमुळे कोणी ब्रह्मचर्याच्या खडतर व्रताच्या संकटांना न जुमानतां अत्यंत कठोरपणानें इंद्रियांना निर्बळ करून सोडतात, ६ असें जें दुर्मिळ, व अचित्य, व अनंत पद, ज्याच्या कांठावरच वेद डुंबत राहिले आहेत, ७ त्या पदाला ते पुरुष पावतात, कीं जे वर सांगितल्याप्रमाणें अंतकाळीं माझें स्मरण करतात. आतां, अर्जुना, पुन्हां एकवार तुला या स्थितीचें वर्णन सांगतों. " ८ तेव्हां अर्जुन म्हणाला, महाराज, हीच विनंति तुम्हांला करण्याच्या विचारांत होतों, तों तुम्हींच ' सांगतों' म्हणून आपोआप माझ्यावर कृपा केली आहे. तर, देवा, सांगाच आतां ९ पण आपण जें बोलाल ते अगदीं सोपें असावें ! " तेव्हां त्रिभुवनाला प्रकाश देणारे श्रीकृष्ण म्हणाले, "अरे, तुझी काय मला ओळख का नाहीं ? तुला हे संक्षेपानेच सांगतों, ऐक. ११० पण मनाची बाहेर धांवण्याची स्वाभाविक खोड मोडेल आणि तें हृदयांतल्या हृदयांत खोल मुरेल, असा त्याचा आवर कर, म्हणजे झालें. ११ पण हें केव्हां व कसें घडेल, तर इंद्रियांचे सारे दरवाजे निग्रह जेव्हां कलासबंद करून टाकतो, तेव्हां मन आंतल्या आंत सहजच कोंडलें जातें आणि तें कोंडलेलें मन निमूट हृदयांतच पडून राहातें. जसें हातपाय मोडलेलें माणूस परसाव सोडून जात नाहीं, १३ तसें मन ठाणेबंद झालें, म्हणजे मग १ परसाव, घर.