पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा २२५ आळविजे स्वभावें । तें अधिदैवत जाणावें । पंचायतेनींचें ॥ ३६ ॥ आतां इयेचि शरीरग्रामीं । जो शरीरभावातें उपशमी । तो अधियन्नु एथ गा मी । पांडुकुमरा ॥ ३७ ॥ येर अधिदैवाधिभूत । तेहि मीचि कीर समस्त । परि पंधेरें किडांळा मिळत । तें काय सांकें नोहे ॥ ३८ ॥ तरि तें पंधरेपण न मैळे । आणि किडाळाचियाही अंशा न मिळे । परि जंब असे तयाचेनि मेळें । तव सांकेंचि म्हणिजे ॥ ३९ ॥ तैसें अधिभूतादि आघवें । हें अविद्येचेनि पौलवें । झांकलें तंव मानावें । वेगळें ऐसें ॥ ४० ॥ तेचि अविद्येची जवनिका फिटे । आणि भेदभावाची अवधि तुटे | मग म्हणों एक होऊनि जरी आटे | तरी काय दोनी होती ॥ ४१ ॥ पैं केशांचा गुंडाळा । वरि ठेविली स्फटिकशिळा । ते वरि पाहिजे डोळां । तंव भेदिली गमती ॥ ४२ ॥ पाठीं केश परौते नेले । आणि भेदलेपण काय नेणों जाहालें । तरि डांक देऊनि सांदिलें । शिळेतें काई ॥ ४३ ॥ ना ते अखंडचि आयती । परि संगें भिन्न गमली होती । ते सारिलिया मागौती । जैसी कां तैसी ॥ ४४ ॥ तेवींच अहंभावो जाये | तरी ऐक्य तें आधींचि आहे । हेंचि साचें जेथ होये । तो अधियज्ञ मी ॥ ४५ ॥ पैं गा आम्हीं तुज । सकळ यज्ञ कर्मज । सांगितलें म्हणतात, तें हेंच या पंचभूतात्मक शरीरपिंडांतील ' अधिदैवत' समजावें. ३६ आतां या शरीरप्रांतांत जो शरीरबुद्धीचा लोप करतो, तो मी या शरीरांतील ' अधियज्ञ ' जाणावा. ३७ दुसरें जें ' अधिदैव' आणि 'अधिभूत, ' तीं दोन्ही मीच, हें खरें आहे; परंतु चोख निर्मळ सोनें हीणसाशी मिसळलें, म्हणजे तेंही हीणकस होत नाहीं का ? ३८ तरीपण तें निर्मळ सोनें कांहीं स्वतः मळत नाहीं किंवा त्या हीणकटाचा अंश होत नाहीं; परंतु जोपर्यंत तें हीणकटाशीं मिसळलेलें असतें, तोंपर्यंत हीणकसच म्हणणे योग्य आहे. ३९ त्याचप्रमाणें हें ' अधिभूत-' प्रभृति सर्व जोपर्यंत प्रकृतिमायेच्या पदरानें झांकलेलें आहे, तोंपर्यंत तें मूळब्रह्मापासून भिन्न गणलेच पाहिजे. ४० पण अविद्यामायेचा पडदा दूर झाला, भेदबुद्धीची गांठ तुटली, म्हणजे मग हें ' अधिभूत- ' प्रभृति सर्व दृश्य आटून परब्रह्माशीं साम्यत्वानें एकरूप होते; तेव्हां त्याच्यांत भेद कसा राहील बरें ? ४१ केसांच्या गुतवळांवर स्वच्छ स्फटिकाची शिळा ठेवली, तर ती डोळ्यांला भंगल्यासारखी दिसते; ४२ पण मग जर ते गुतवळ काढून घेतले, तर त्या शिळेचें भंगलेपण कोठें नाहींसें होतें कोणास ठाऊक ! ती काय डांक लावून पुन्हां सांधली जाते ? ४३ असे मुळींच नाहीं; तर ती शिव्या मूळचीच अखंड असते, मात्र गुतवळाच्या संगतीनें भंगल्यासारखी भासत होती; म्हणून ते गुतवळ दूर केल्याबरोबर ती जशीच्या तशीच अखंड राहाते. ४४ त्याप्रमाणेच 'अधिभूत-' प्रभृतीचा अहंभाव नष्ट झाला, म्हणजे त्याचें परब्रह्माशीं ऐक्य मूळचेंच आयतें असतें. हें ऐक्य ज्याच्याठायीं घडते, ताच मी ' अधियज्ञ. ' ४५ अर्जुना, हाच अभिप्राय मनांत धरून आम्ही तुला, 'कर्मापासूनच १ पंचभूतात्मक शरीराचें. २ शुद्ध सोनें. ३ हीणकठाला. ४ पदरानें. २९