पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी योनीचे । लक्ष दिसती ॥ २६ ॥ येरी जीवभावाचिये पालविये । कांहीं मर्यादा करूं न ये । पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ॥ २७ ॥ म्हणूनि कर्ता मुदल न दिसे । आणि सेखीं कारणही कांहीं नसे । माजी कार्यचि आपैसें । वाढोंचि लागे ॥ २८ ॥ ऐसा करितेनवीण गोचरु । अव्यक्तीं हा आकारू । निपजे जो व्यापारु । तया नाम कर्म ॥ २९ ॥ अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् । अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥ ४ ॥ सम० – अधिभूत क्षरतनू जीवात्मा अधिदैवत । बिंबत्या प्रतिबिंबाचा देहींच अधियज्ञ मी ॥ ४ ॥ आर्या - अधिभूत क्षरतनु हे अक्षर अधिदैव होय अधिकारी । अधियज्ञ मीच देहीं जीवांचा पाळणार उपकारी ॥ ४ ॥ ओंवी-क्षर तें अधिभूत । जीवात्मा अधिदैवत । आदि अनंत सर्वांत । अधियज्ञ देहीं मी ॥ ४ ॥ 1 आतां अधिभूत जें म्हणिपे । तेंहि सांगों संक्षेपें । तरी होय आणि हारपे । अभ्र जैसें ॥ ३० ॥ तैसें असतेपण आहाच । नाहीं होइजे हैं साच । जयांतें रूपा आणिती पांचपांच | मिळोनियां ॥ ३१ ॥ भूतांतें अधिकरून असे । आणि भूतसंयोगें तरि दिसे । जे वियोगवेळे भ्रंशे । नामरूपादिक ॥ ३२ ॥ तयातें अधिभूत म्हणिजे । मग अधिदैवत पुरुष जाणिजे । जेणें प्रकृतीचें भोगिजे । उपार्जिलें ॥ ३३ ॥ जो चेतनेचा चक्षु | जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु । जो देहास्तमानीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा ॥ ३४ ॥ जो परमात्नाचि परि दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा । म्हणोनि स्वप्नाचिया वोरैवारा । संतोषें शिणे ॥ ३५ ॥ जीव येणें नांवें । जयातें होणाऱ्या भूतमात्राच्या लक्षावधि जाति दिसतात. २६ एरवीं पाहिलें, तर जीवपणाच्या या अंकुरांना कांहीं संख्येची किंवा भेदभावाची मर्यादा घालतां येत नाहीं, परंतु मूळ शोधूं गेलें म्हणजे हें सर्व त्या शून्यब्रह्मापासून संभवलें आहे, असें आढळते. २७ म्हणून मुदलांत कर्ताच आधीं सांपडत नाहीं, शिवाय या सृष्टीला कांहीं कारणही दिसत नाहीं, पण मधल्यामध्येच हें सृष्टिरूप कार्य आपोआप झपाट्याने वाढू लागतें ! २८ अशा प्रकारें कर्त्यावांचूनच निराकार ब्रह्मावर हा जो इंद्रियगम्य आकाराचा ठसा पडतो, त्याला 'कर्म' हें नांव आहे. २९ आतां ' अधिभूताचें ' थोडक्यांत निरूपण करतों. जसें अभ्र प्रकट होतें आणि लोप पावतें, ३० तसें जें दिखाऊ आहे पण खरोखर नाशवंत आहे, जें पंचमहाभूतांच्या अंशांच्या परस्पर मिश्रणाने बनले आहे, ३१ जें भूतांचा आश्रय धरून व त्यांच्याशी मेळावा करून भासमान होतें, पण नामरूपादिकांनी विशिष्ट असें जें, भूतसंयोग बिघडतांच नष्ट होतें, ३२ त्याला ' अधिभूत' म्हणतात. ' अधिदैवत' म्हणजे पुरुष समजावा. हा प्रकृतिमायेनें जें जें उत्पन्न केलें जातें, त्याचा त्याचा उपभोग घेतो. ३३ हा पुरुषच चैतन्याचा म्हणजे बुद्धीचा डोळा आहे, हाच इंद्रियांच्या प्रांतांतील मुख्य अधिकारी, आणि, देह मावळला म्हणजे संकल्पविकल्परूपी पांखरें ज्यावर विसंबतात तो हाच वृक्ष होय. ३४ हा ' अधिदैवत' नांवाचा पुरुष मूळचा परमात्माच खरा, परंतु परमात्म्याहून जरा निराळा झालेला आहे; कारण, याला अहंकारनिद्रेची गुंगी आल्यामुळें या स्वमतुल्य मायेच्या खटपटींत हर्षशोकांना अनुभवतो. ३५ ज्याला सामान्यतः १ खटपटीत, दगदगीत. जीव '