पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी कां जें काज | मनीं धरूनि ॥४६॥ तो हा सकळ जीवांचा विसांवा । नैष्कर्म्यसुखाचा ठेवा । परि उघड करूनि पांडवा । दाविजत असे ॥४७॥ पहिलें वैराग्यइंधनपरिपूर्ती । इंद्रियानळीं प्रदीप्तीं । विपयद्रव्याचिया आहुती । देऊनियां ॥ ४८ ॥ मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा रवी । वेदिका रचे मांडवीं । शरीराच्या ॥ ४९ ॥ तेथ संयमामीची कुंडें । इंद्रियद्रव्याचेनि पैवाडें । यजिजती उदंडें । युक्तिघोपें ॥ ५० ॥ मग मनप्राणसंयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु । येणें संतोपविजे निर्धूमु । ज्ञानानळु ॥ ५१ ॥ ऐसेनि हें सकळ ज्ञानीं समर्पे । मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे । पाठीं ज्ञेयचि स्वरूपें । निखिल उरे ॥ ५२ ॥ तया नांव गा अधियन्नु । ऐसें बोलिला जंव सर्वज्ञु । तंव अर्जुन अतिप्रान्नु । तया पातलें तें ॥ ५३ ॥ हें जाणोनि म्हणितलें देवें । पार्था परिसतु आहासि बरवें । या कृष्णाचिया वोलासवें । येरु सुखाचा जाहला ॥ ५४ ॥ देखा बालकाचिया धणी धाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होइजे । हैं सद्गुरूचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवतिया ।। ५५ ।। म्हणोनि सात्विकां भावांची मांदी | कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं । न समातसे परी बुद्धि । सांवरूनि देवें ॥ ५६ ॥ मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा सर्व यज्ञ उत्पन्न होतात, ' असें मागें ( चवथ्या अध्यायांतील ' कर्मजान् विद्धि तान् सर्वान् ' इत्यादि श्लोकांत ) सांगितलें होतें. ४६ सर्व जीवांच्या विश्रांतीचा हा निष्काम ब्रह्मसुखाचा गुप्त ठेवा आज मी तुला उघडा करून दाखविला आहे. ४७ पहिल्या प्रथम वैराग्याचें जळण भरपूर लावून इंद्रियांचा अग्नि प्रज्वलित करावा; मग त्याच्या ज्वाळांत विषयद्रव्याच्या आहुती टाकाव्या; ४८ मग वज्रासनाची भूमि शुद्ध करून, तीवर मूलबंधाची मुद्रा हीच यज्ञवेदी या शरीरमंडपांत बांधावी. ४९ अशी सिद्धता झाल्यानंतर इंद्रियनिग्रहाच्या कुंडांत इंद्रियद्रव्याचे पुष्कळ उंडे योगरूपी मंत्राचा घोष करीत अर्पण करावे. ५० नंतर मन व प्राणवायु यांचा आवर हाच या यज्ञविधानाचा समारंभ करून, निर्मळ ज्ञानरूपी अग्नि संतुष्ट करावा. ५१ अशा रीतीनें ज्ञानाग्नींत सर्वस्व अर्पण केलें, म्हणजे तें ज्ञान ' ज्ञेय ' वस्तूंत लीन होतें, आणि मग केवळ ' ज्ञेय' च स्वरूपाने सर्वत्र उरतें. ५२ यां ज्ञेयालाच ' अधियज्ञ ' म्हणतात. " असें जो सर्वज्ञ श्रीकृष्ण बोलले, तोंच तें सर्व बुद्धिवान् अर्जुनाला तत्काळ समजलें. ५३ हें जाणून श्रीकृष्ण म्हणाले, “पार्था, नीट ऐकत आहेस ना ? " हे श्रीकृष्णांचे शब्द ऐकून, अर्जुनाला अत्यंत धन्यता वाटली. ५४ अहो, बालकाची तृप्ति पाहून आईनें तृप्त व्हावें, किंवा शिष्याचे समाधान जाणून गुरूनें समाधानयुक्त व्हावें, याचा अनुभव एक त्या मातेला किंवा त्या गुरूलाच येणार, इतरांना त्याची खरी कल्पना व्हावयाचीच नाहीं. ५५ या कारणास्तव अर्जुनाच्या पूर्वीच श्रीकृष्णांच्या देहावर सात्विक भावांची लाट उसळली, ती इतकी कीं, आवरतां आवरेना, पण श्रीकृष्णांनी कसा तरी आपल्या बुद्धीचा तोल संभाळून, ५६ ते मग पूर्णत्वास पावलेल्या १ भुई. २ उंधानें, पिंडाने ३ गर्दी, दाटी.